राधिका हे पात्राने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आणि हे पात्र साकारणारी अभिनेत्री अनिता दाते आता नवा गडी नवं राज्य या मालिकेत रमा या व्यक्तिरेखेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रोमोमध्ये सगळ्यांनी रमाला पाहिलं आणि या भूमिकेतूनदेखील अनिता प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करणार याची हमी प्रेक्षकांना मिळाली. फ्रेमच्या चौकटीमधली रमा मालिकेत काय रंजक वळण आणणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल पण ही भूमिका साकारणं आव्हानात्मक आहे का याबद्दल बोलताना अनिता म्हणाली, “मी साकारत असलेली रमा ही फोटोफ्रेममधून बोलणार आहे. जी व्यक्ती अस्तित्वात नाही, जिवंत नाही ती जिवंतपणे साकारण्याचा प्रयत्न मी करतेय. फ्रेममधून बोलणं काही अवघड नाही. ते सहज आहे. फक्त इथे देहबोलीतून प्रतिक्रिया देता येत नाही. एका चौकटीत काम करावं लागतंय. अशी भूमिका करणं म्हणजे आव्हानच आहे. कमीत कमी साधनामधून जास्तीत जास्त गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि मलाही उत्सुकता आहे की, मी हे कसं साकार करणार आहे .त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी एक आव्हान आहे.”
Related Stories
December 1, 2023