October 3, 2023

Month: July 2022

सध्याच्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर ‘मी पुन्हा येईन’ या...
डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम झी मराठी वाहिनीवर २७ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे....
सोनी मराठी वाहिनी रसिक प्रेक्षकांसाठी सातत्याने नवनवे उपक्रम राबवत असते. असाच एक खास कार्यक्रम सोनी मराठी वाहिनी येत्या रविवारी घेऊन येते आहे. ‘होऊ दे चर्चा – अनन्या स्पेशल’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे.  ‘अनन्या’ चित्रपटाचा संपूर्ण चमू या कार्यक्रमात सहभागी होणार आहे, आणि  मनोरंजन करण्यासाठी असणार आहेत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातले हास्यवीर! ‘अनन्या’ या चित्रपटाची पहिल्या पोस्टरपासून चर्चा आहे. येत्या २२ जुलैला हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने सोनी मराठी वाहिनीवर ‘होऊ दे चर्चा – अनन्या स्पेशल’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि लेखन आपल्या खुमासदार शैलीत समीर चौघुले यांनी केले असून वनिता खरात, प्रभाकर मोरे, शिवाली परब, गौरव मोरे, चेतना भट, ओंकार भोजने हे कलाकार गावकऱ्यांच्या भूमिकेत धमाल उडवणार आहेत. ‘अनन्या’ चित्रपटातील हृता दुर्गुळे, अमेय वाघ, सुरत जोशी, ऋचा आपटे, चेतन चिटणीस, योगेश सोमण हे कलाकार आणि या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक प्रताप फड, निर्माते रवी जाधव, संजय छाब्रिया, ध्रुव दास उपस्थित राहणार आहेत.  ‘अनन्या’ एकांकिकेपासून सुरू झालेला प्रवास आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया चित्रपटाच्या टीमने उलगडून सांगितली. ‘अनन्या’ घडताना हृताने घेतलेली खास मेहनत, तिची या भूमिकेसाठी झालेली निवड, तिच्या आईबाबांच्या प्रतिक्रिया, चित्रीकरणादरम्याचे किस्से  अशा सगळ्या गोष्टींनी हा कार्यक्रम उत्कंठावर्धक होणार आहे. त्याचबरोबर हृताला एक गोड सरप्राईझ या कार्यक्रमात मिळणार आहे. इतर कलाकारांनीही त्यांच्या भूमिकेबद्दल आणि प्रवासाबद्दल अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या.  प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील आणि सहकारी यांचा नृत्याविष्कारही या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. चेतना भट हीसुद्धा आपल्या मोहक अदांनी घायाळ करणार आहे. हास्यवीरांचे विनोद कार्यक्रमाला हास्याचे रंग चढवणार आहे.
“द ग्रेट इंडियन किचन” यासारख्या बहुचर्चित तसेच अनेक मल्याळम सिनेमातून आपल्या सशक्त अभिनयाचं दर्शन घडवलेली अभिनेत्री निमिषा...
झी मराठीवर लवकरच डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चिंचि चेटकीण या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून खास स्पर्धक शोधून आणतेय. पण या कार्यक्रमात परीक्षक कोण असणार हा प्रश्न सर्व प्रेक्षकांना पडला आहे. या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत एक हरहुन्नरी अभिनेता, डान्सर आणि कोरिओग्राफर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर गश्मीर महाजनी आहे. हो हे खरं आहे. आपल्या अभिनय कौशल्यासोबतच गश्मीर एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याला डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये परीक्षकाच्या खुर्चीत पाहून प्रेक्षकांना खूप आनंद होईल यात शंकाच नाही. आपल्या या जबाबदारीच्या भूमिकेबद्दल बोलताना गश्मीर म्हणाला, “हा माझा पहिलाच डान्स रिऍलिटी शो आहे ज्यात मी सहभागी होतोय आणि ते हि परीक्षकाच्या भूमिकेत, याचा मला खूप आनंद आहे. हा कार्यक्रम स्वीकारण्यामागे महत्वाचं कारण म्हणजे लहान मुलांसोबत होणारं इंटरॅक्शन. माझं लहान मुलांसोबत कनेक्शन खूप छान जुळतं. त्याचसोबत या कार्यक्रमात मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काम करताना दिसेन. प्रेक्षकांनी आता पर्यंत मला विविध चित्रपटांत पाहिलं आहे. एका अभिनेत्या पलीकडे मी एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे मला अनेकदा मला विचारणा व्हायची कि मी डान्सशी निगडित काही करणार आहे का? तर हो आता ती वेळ अली आहे. प्रेक्षकांची जी अपूर्ण इच्छा होती मला डान्सशी निगडित काहीतरी करताना पाहायची ती आता पूर्ण होईल कारण प्रेक्षकांना या कार्यक्रमात मी परीक्षण करताना, कधीतरी थिरकताना आणि डान्सशी संबंधित बोलताना दिसेन. या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करण्याचं माझं ध्येय आहे, तर लवकरच भेटू डान्स महाराष्ट्र डान्समध्ये.”  
                              सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं सातत्यानी मनोरंजन करते आहे. १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवी कोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ ही मराठी आणि कानडी यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. या मालिकेत दोन दिग्गज अभिनेते आमनेसामने असणार आहेत. अस्सल कोल्हापुरी वेशात अभिनेते विद्याधर जोशी तर त्यांच्यावर कानडी तडका द्यायला अभिनेते अतुल काळे असणार आहेत.                               मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पहिल्या झलकमध्ये प्रेमाला भाषा नसते हे दिसलं तर कानडी आणि मराठीचा झकास तडका दुसऱ्यावेळेस बघायला मिळाला. यात आकर्षण ठरलेत नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार. अर्थातच विद्याधर जोशी आणि अतुल काळे. हे दोन्ही दिग्गज कलाकार  नव्या भूमिकांत, नव्या वेशात प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. विद्याधर जोशी यांचा अस्सल कोल्हापुरी वेश तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहे. कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. आणि त्यातही त्यांच्यातलं होणारं चुरसदार भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना आवाक करते आहे. हे भांडण रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम करेल, या कलाकारांचं ऑनस्क्रीन चुरसदार भांडण, उडणारे खटके आणि त्यांचा स्वतःचा असा एक भाषेचा ठसका प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही. या दोघांमुळे रेवथी आणि अर्जुन यांची प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे. या मालिकेत या दिग्गज कलाकरांबरोबर अभिनेत्री सीमा देशमुख आणि भारती पाटील यादेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.
अभिनेत्री दीपा परब हिने मालिका, चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमांत विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. दामिनी या सुप्रसिद्ध मालिकेतील दीपाच्या अविस्मरणीय भूमिकेनंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत मध्यावतरी भूमिकेत दिसणार आहे. दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं पण बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हो हे खरं आहे. झी मराठी वाहिनीवरील आगामी मालिका तू चाल पुढं मध्ये दीपा हि प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची. एकत्र कुटुंब असलेल्या या घरी अश्विनीलादेखील त्यांच्या नवीन घरासाठी खारीचा वाटा देण्याची इच्छा या प्रोमो मधून झळकते. या मालिकेत अभिनेत्री दीपा परब सोबतच तुझ्यात जीव रंगला मधील वाहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर देखील महत्वाची भूमिका साकारताना दिसतेय. हि मालिका १५ ऑगस्ट पासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येईल. आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना दीपा परब म्हणाली, “बऱ्याच काळानंतर मराठी दैनंदिन मालिका करताना स्वतःच्या घरी परातल्याची भावना आहे. तू चाल पुढं या मालिकेचं कथानक अतिशय सुंदर असून हि कथा गृहिणी असलेल्या अश्विनी भोवती फिरते आणि आपल्या कुटुंबासाठी ती काय करते हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल. बऱ्याच कालावधी नंतर मराठी मालिका करतेय त्यामुळे प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा भरभरून मिळेल अशी मी आशा करते. या मालिकेतील अश्विनी हि प्रत्येक गृहिणीला आपलीशी वाटेल आणि आपल्यातलीच एक कोणीतरी छोट्या पडद्यावर आपलं नेतृत्व करतेय आणि त्याचसोबत आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतेय हे त्यांना नक्कीच जाणवेल अशी मला खात्री आहे.”
‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरची जोरदार चर्चा सुरू असतानाच सर्वांना प्रतिक्षा होती की या, चित्रपटाचे...
सध्या पावसाळ्यामुळे वातावरणात सर्वत्र गारवा आहे. त्यामुळे हे गारगार वातावरण थोडे उबदार करण्यासाठी ‘तमाशा लाईव्ह’ घेऊन येत...
झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती, रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास ३’ येत्या २९ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत...