October 3, 2023

Month: July 2022

एखादा सामाजिक विषय असलेला चित्रपट प्रदर्शित व्हावा आणि त्याचे सकारात्मक पडसाद उमटावेत, याहून आनंदाची गोष्ट असूच शकत...
आई -बाबा आणि साईबाबाची शपथ असं म्हणणारा दगडू साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीच आपण दोन...
समाजात वावरताना आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात, ज्यांचा आपल्याला थांगपत्ताही नसतो आणि अगदीच या घटनांबाबत...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षं आषाढी वारीच्या शेकडो वर्षांच्या परंपरेत खंड पडला. पण विठूभेटीसाठी आसुसलेले लाखो वारकरी...
‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटातील गाण्यांना संगीतप्रेमी चांगलाच प्रतिसाद देत आहेत. आता नुकतेच शेफाली अर्थात सोनाली कुलकर्णी हिचे ‘कडक...
सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. काही अनपेक्षित उलथापालथ होत आहे. याच पार्श्वभूमीवर...
                                 जनसामान्यांचा म्हणून लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या  कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात  ‘कोण होणार  करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘कर्मवीर विशेष भागात’ कर्मवीरच्या रूपात अधिक कदम हॉटसीटवर येणार आहेत. काश्मिरी मुलींसाठी ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून लक्षणीय कामगिरी करणारे अधिक कदम या आठवड्यातले कर्मवीर आहेत.                                  अधिक कदम यांचा जन्म वारकरी संप्रदायात झाल्याने घरामध्ये लहानपणापासून आध्यात्मिक वातावरण आहे. ते पखवाज आणि मृदंग उत्तम वाजवतात. कुठल्याही भक्तीचा पाया हा कार्यकर्तृत्वाचा असतो, असे त्यांचे मत आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणात ते कायम दंग होतात. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर आषाढवारीनिमित्त एका अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन होणार आहे.  १८ दिवसांसाठी काश्मीरमध्ये गेलेले अधिक कदम तिथली परिस्थिती आणि घटना पाहून तिथेच राहिले. ज्या गावात हजारपेक्षा जास्त पुरुषांना आतंकवाद्यांनी मारले, त्या गावात ते राहिले. आतंकवादी अधिक यांना १९ वेळा घेऊन गेले आहेत. तिथे असणाऱ्या सैनिकांची वाईट अवस्था आणि यासारखे अनेक किस्से त्यांनी ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात कथन केले आहेत.                                    ‘कोण होणार करोडपती’च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी  होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या कर्मवीर विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या पर्वातल्या कर्मवीर विशेष भागात अधिक कदम सहभागी होणार आहेत. अहमदनगर ते थेट काश्मीरमधील कुपवाडा असा प्रवास करणारे अधिक कदम त्या भागात ‘अधिक भैय्या’ म्हणून प्रसिद्ध आहेत.  ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून ते काश्मिरी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलतात. कारण जम्मू-काश्मीरमध्ये फक्त स्त्रिया बदल घडवू शकतात, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आत्तापर्यंत अधिक यांच्या संस्थेने १६७ मुलींना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांची लग्नं लावून दिली आहेत तर सध्या  २३० मुली हॉस्टेलमध्ये राहून त्यांच्या आवडीचं शिक्षण घेत आहेत. अधिक कदम यांचे हे सगळे अनुभव ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावरून ऐकता येणार आहेत.
होम मिनिस्टर हा फक्त एक कार्यक्रम राहिलेला नसून या कार्यक्रमाशी तमाम वहिनींच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. नुकतंच...
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता अशोक सराफ सर्वांनाचं आपलेसे वाटतात. अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांना विनोदाचा बादशहा म्हणून ओळखलं जातं. अशोक सराफ यांनी नेहमीचं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाही त्यांच्यात असलेली ऊर्जा,  दिलखुलासपणा, अचूक विनोदाचं टायमिंग, कामात असलेली स्थिरता, अभिनयाविषयी असलेलं प्रेम अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अशोक मामांचा हा यशस्वी प्रवास मोठ्या थाटामाटात एका सोहळ्याच्या रूपात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात अशोक मामांचा दिग्गजांकडून झालेला कौतुक सोहळा आणि त्याच सोबत काही रंजक सादरीकरण देखील प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. जितेंद्रजी, एकता कपूर, सुनील गावस्कर हे देखील यावेळी उपस्थित होते.