‘झी मराठी’वरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. सुबोध भावे ह्यांनी कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात हि महिलांची राखीव बस एका सुप्रसिद्ध खास व्यक्ती साठी थांबवली, आणि ती व्यक्ती म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या अमृता फडणवीस. सुबोध भावे आणि महिला मंडळ हे अमृता फडणवीसांचा जीवन प्रवास उलगडणार असून त्यांना पेचात टाकणारे काही प्रश्न देखील विचारणार आहेत. या कार्यक्रमातील महिला मंडळाने त्यांना खूप गमतीशीर प्रश्न विचारले आणि त्यांनीही तेवढ्याच खुमासदार अशी उत्तरे दिली आहेत.
या कार्यक्रमात अमृता फडणवीस ह्यांच्या बद्दल जाणून घेताना एक गोष्ट जाणवली कि त्या खूप आधुनिक विचारांच्या आहेत. कार्यक्रमातील महिला मंडळाने विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मोकळेपणाने आणि खूप मज्जेदार उत्तर दिली. यात महिला मंडळाने विचारलेल्या गळ्यातील मंगळसूत्रबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर फारच खुमासदार पणे दिले. पुढच्या सहप्रवासी ह्या प्रसंगात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे राग व्यक्त करून “आसामला नेणार का ?” अशीही विचारणा केली असताना सर्वाना खळखळून हसवले.