अभिनेता कश्यप परुळेकर आता ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत राघवच्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका ८ ऑगस्टपासून ‘झी मराठी’वर सुरु होणार असून मालिकेच्या हटके प्रोमोने सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. प्रोमोमध्ये सगळ्यांनी राघवला पाहिले, आनंदी त्याच्या आयुष्यात आलेली असतानाही अजूनही तो रमाच्या आठवणीत आहे. राघव आनंदीला स्वीकारू शकेल का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. ह्या मालिकेबद्दल आणि त्याच्या व्यक्तीरेखेबद्दल सांगताना कश्यप म्हणाला, ” ‘झी मराठी’बरोबर मी पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत काम करतोय. मी खूप उत्सुक आहे. पण आतापर्यंत योग येत नव्हता. राघव ह्या भूमिकेला वेगवेगळे पदर आहे, तो खूप प्रेमळ आणि कुटुंबवत्सल व्यक्ती आहे. आनंदी त्याच्या अधुऱ्या संसारात आली असतानाही तो रमाच्या आठवणीं मध्ये गुंतला आहे. जशी जशी मालिका पुढे जाईल तस तशी राघव हि व्यक्तिरेखा प्रेक्षकांना हळू हळू उलगडायला लागेल. “
Related Stories
September 27, 2023