राखी पोर्णिमा हा सण भाऊ बहिणी मधील जिव्हाळा, प्रेम आणि संरक्षणाचे प्रतिक आहे. झी मराठीवर येत असलेल्या नविन मालिकां मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपा परब-चौधरी, पल्लवी पाटील आणि धनश्री कडगावकर यांनी आपल्या भावा बरोबरच्या अतुट नात्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. पल्लवी पाटील “नवा गडी नवं राज्य” मधील आनंदी आपल्या भावा बरोबर असलेल्या प्रेमळ नात्या बद्दल सांगते की, “मी माझाच भाऊ नाही तर चुलत भावांना देखील तेवढ्याच प्रेमाने राखी बांधते, आम्ही सर्व एकत्र जमलो की धम्माल करतो. लहान असताना आपल्याला कोणीतरी राखी बांधून दादा म्हणाव असे वाटायचे ती इच्छा मग माझ्या बहिणी मला राखी बांधून दादा म्हणुन पुर्ण करायच्या. ही माझी बालपणीची आठवण अजून माझ्या स्मरणात आहे. आम्हा भावंडांच नातं खुप गोड आहे.”
अभिनेत्री दिपा परब-चौधरी ही ब-याच कालावधी नंतर “तु चाल पुढं” या नव्या मालिकेतुन आपल्या भेटीला येणार आहे. दिपा आपल्या भावा बद्दल सांगते की आमचे नाते खुप गोड आहे. तो कायम माझ्या पाठीशी उभा राहिला आहे, माझा भाऊ मला नेहमी माझ्या कामासाठी प्रोत्साहन देतो. माझे काम त्याला खूप आवडते. नवीन नवीन गोष्टी तो मला सुचवतो. या वर्षी देखील तेवढ्याच आनंदाने आणि उत्सहाने आम्ही रक्षाबंधन साजरे करणार आहोत असं सांगताना दिपा खुप खुश होती. ” तु चाल पुढं ” या नविन मालिकेतील” शिल्पी”या भुमिकेत दिसणारी प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकर लहानपणीच्या आठवणी सांगताना म्हणाली की, आम्ही लहानपणी खुप भांडायचो ,भन्नाट मस्ती करायचो पण ते तेवढ्यापुरतच. लहानपणी रक्षाबंधनाला भावाकडे मला देण्यासाठी छानशी भेट वस्तू असायची,पण मला मुद्दाम चिडवण्यासाठी एक रुपया द्यायचा. अशा मधुर आठवणी आहेत. या वर्षी कामात व्यस्त असल्यामुळे भेट होईल की नाही शंका आहे पण आम्ही नक्की रक्षाबंधन साजरे करु.