????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????
औरंगजेबासारख्या स्वराज्यावर टपून बसलेल्या दिल्लीपती बलाढ्य मोगल पातशहाला महाराष्ट्राच्या मातीत कायमचा संपवण्यात स्वराज्यातील स्त्रिया देखील पुरुष योध्यांपेक्षा कमी नाही, हे दाखवून देणाऱ्या आणि मराठ्यांचा देदीप्यमान संग्राम असणाऱ्या भारतीय इतिहासाला पराक्रमाच्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या वीरांगना म्हणजे महाराणी छत्रपती ताराबाई. त्यांच्याच जीवनावर आधारीत ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाचा मुहूर्त आज संपन्न झाला आहे. मुंबई मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली असून या चित्रपटासाठी चित्रनगरी मध्ये भव्य सेट उभारला आहे. संपूर्ण सेट, हा इतिहासातील पराक्रमांमध्ये न्हाऊन निघाला आहे. ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि ‘मंत्रा व्हिजन’ निर्मित हा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उत्तम कथानकाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विविध विषयांवरचे दर्जेदार चित्रपट जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’ कायम अग्रेसर असतं.
हा चित्रपट जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या “मोगलमर्दीनी महाराणी ताराबाई” या ग्रंथावर आधारीत असून, “मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी” या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कोंडीराम निकम यांचे आहेत आणि राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
मराठी साम्राज्याचा औरंगजेबाच्या मनात पुन्हा दबदबा निर्माण करणाऱ्या छत्रपती ताराराणींची व्यक्तिरेखा मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारत आहे. शिवाय चित्रपटाला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात, ”छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच ह्या चित्रपटाद्वारे आपला लखलखीत इतिहास आम्ही प्रेक्षकांच्या समोर आणीत आहोत. प्रेक्षकांना हा अनोखा चित्रपट नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे.”
‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाबद्दल ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”जेव्हा पासून हा चित्रपट येतोय अशी घोषणा केली तेव्हा पासूनच तांत्रिक टीम पासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनीच या चित्रपटासाठी स्वतःला झोकून दिले आहे. इतक्या दिवसाचं अभ्यास, वर्कशॉप , प्री वर्क, ही सर्व तयारी केल्यानंतर अखेर हा चित्रपट चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे. सेटवर येण्याआधी सगळ्याच टीमने आपापल्या विभागामध्ये प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून, हा चित्रपट सर्वोत्तम कसा करता येईल, याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण टीम या विषयाला आणि चित्रपटाला योग्य न्याय देतील, यात शंका नाही. मला आनंद आहे की सोनाली सारखी गुणी अभिनेत्री ही मुख्य भूमिका साकारणार आहे. धाडस आणि शौर्य यांचे असामान्य असे मिश्रण असणाऱ्या छत्रपती ताराराणींचा अज्ञात प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा हा आमच्या संपूर्ण टीमचा उद्देश आहे.”