A new travelling experience is here with all new Camping Van…

प्रवासाची अनोखी संकल्पना
भटकंती ऑन व्हील

प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो… प्रत्येक प्रवास आपल्याला दिवसागणिक समृद्ध करत असतो. आता रानवेड्या स्वप्नील पवार आणि त्याचा टीममुळे तुमचा हा प्रवास अविस्मरणीय करतील यात शंका नाही. सध्या परदेशांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या ‘कॅम्पिंग व्ह ॅन’मधून आपल्यालाही फिरता आलं तर…. वाचून आव्वाक झालात?  अधिक जाणून घेऊया रानवाटा फेम ‘स्वप्नील पवार’ याच्या खास मुलाखतीतून…

कॅम्पिंग व्ह ॅन ची कल्पना कशी सुचली? 

उ. साधारण दोन-अडीच वर्षांच्या लॉकडाऊनमुळे घरी बसून खूपच कंटाळा आला होता.  त्यात माझी महिनाभराची फिलिपिन्स ट्रीपही रद्द झाली होती. पण, खूप मोठा काळ घरी बसल्यानंतर सतत फिरण्याचे विचार डोक्यात येणाऱ्या मला कॅम्पिंग व्ह ॅन ची कल्पना सुचली. परदेशात कॅम्पिंग व्ह ॅन हा प्रकार तसा जुनाच…. त्यामुळे आपणही भारतात असा प्रयोग करून पाहूया या विचाराचं वादळ डोक्यात थैमान घालू लागल. माझी ही कल्पना मी माझ्यासारख्याच भटक्या मित्र-मैत्रीणींना सांगितली. अखेर वर्षभराच्या मेहनतीनंतर प्रवीण सारंग, वर्षा मंगेश डोंगरे, निमिष उपाध्ये, अमेय बापट आणि मी (स्वप्नील पवार) आमचं हे स्वप्नं सत्यात उतरलं. सध्या कॅम्पिंग व्ह ॅन ची प्रायोगिक पातळीवर पडताळणी सुरु आहे लवकरच ही कॅम्पिंग व्ह ॅन आपल्या भेटीला येईल.

कॅम्पिंग व्ह ॅन ची संकल्पना लोकांमध्ये रुजवण आव्हानात्मक वाटतंय का?

उ. हो, काही प्रमाणात हे खरं आहे. आपल्या देशात ही संकल्पना अगदी नवी आहे. नव्या पिढीला याबद्दल माहिती आहे. पण, आताही प्रयोग म्हणून एखाद्या गावी किंवा भटकंतीच्या ठिकाणी ही कॅम्पिंग व्ह ॅन पाहून लोकं अनेक गंमतीशीर प्रश्न विचारतात…. ‘ही रुग्णवाहिका (ऍम्ब्युलन्स) आहे का? मग, यात लाईट्स का लावल्यात..? शुटींगची गाडी आहे का…? अशा एक न अनेक प्रश्नांची उत्तर देताना दमछाक होते… पण लोकांमध्ये या कॅम्पिंग व्ह ॅनविषयी जाणून घेण्याची उच्च पाहून समधान वाटतं. हे काम करताना आव्हानही आहेतच… सुरुवात आहे ती पार्किंगच्या जागा आणि कॅम्प साईट्सची व्यवस्था पाहण्यापासून… पण हळूहळू ही संकल्पना लोकांमध्ये रुजवण्याबरोबरच इतर कामही वेग धरतील. शिवाय, कॅम्पिंग व्ह ॅनमुळे भारतात कुठेही फिरता येऊ शकेल असं आम्हाला वाटतं होतं पण, याबद्दलचे नियम मात्र बरेच कठीण आहेत. कॅम्पिंग व्ह ॅनसाठी लायसन्स नसल्यामुळे त्यासाठी आवश्यक व्ह ॅनीटी व्ह ॅनचा परवाना घ्यावा लागणारं आहे. सोबतच, राज्याबाहेर ही व्ह ॅन घेऊन जाण्यासाठीच्या नियम आणि अटी यांचाही आमचा अभ्यास सुरु आहे.

या कॅम्पिंग व्ह ॅनची खासियत काय असेल?

. येत्या काही महिन्यात आम्ही ही कॅम्पिंग व्ह ॅन प्रेक्षकांसाठी खुली करणार आहोत. त्यासाठी काही लोकेशन्सही (ठिकाणं) ठरली आहेत. पर्यटनाची ही नवी संकल्पना आपल्याकडे रुजावी यासाठी आम्ही छान कॅम्पिंगचं ठिकाणही निवडल आहे. विशेष म्हणजे या कॅम्पिंग व्ह ॅनमधील अनेक उपकरणे सौरउर्जेवर चालणारी असल्यामुळे हा एक वेगळा अनुभव ठरणारं आहे. सध्या पुढील दोन-तीन महिने ही कॅम्पिंग व्ह ॅन एका ठराविक ठिकाणी उभी असणारं आहे. या अल्हाददायक ठरणारा आहे. कॅम्पर व्ह ॅनमुळे कुठेही राहणं शक्य आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून बदलत्या काळानुसार काम करणंही आता शक्य आहे, जुन्या सगळ्या संकल्पनांना छेद देऊन प्रवासाची-जगण्याची ही नवी पद्धत अंगीकारण कॅम्पर व्ह ॅनमुळे आनंददायी होऊ शकेल याची आम्हाला खात्री वाटते.

मुलाखत : नेहा कदम 
शब्दांकन : अजय जयश्री 

Share your valuable opinion

%d bloggers like this: