Why ‘Aapli Aaji’ is getting viral on social media? Here is complete information

Why ‘Aapli Aaji’ is getting viral on social media? Here is complete information

युट्यूबच्या खाऊ गल्लीत ‘आपली आजी’ची चर्चा…

सोशल मीडियावर ‘आपली आजी’ची जोरदार चर्चा…

मोबाईल, इंटरनेट, टेक्नोलॉजी आणि डिजिटल कंटेंट अशा गोष्टी म्हटल्यानंतर याभोवती फिरणारी तरुणाई आणि खेळण्याप्रमाणे त्यांच्या हातात सहज दिसणारी विविध प्रकारची गॅजेट्स आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यामुळे या जाळ्यात एखादी वयस्कर आजी तिच्या तरुण नातवंडाबरोबर युट्युबर म्हणून समोर आली तर? वाचून थोडं नवल वाटलं ना? पण यात नवल वाटून घ्यायचं काही कारण नाही. अहमदनगरच्या सुमन धामणे आणि यश पाठक या युट्यूबर आजी-नातवाच्या जोडीविषयी.

अहमदनगरच्या साकोळा कासार गावातील सुमन धामणे आणि यश पाठक ही आजी नातवाची जोडी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतेय. त्याला कारणही तसं खास  आहे. या आजीबाई आणि त्यांचा नातू यश यांनी मिळून ‘आपली आज्जी’ या नावाने एक युट्यूब चॅनल सुरू केलंय. आता तुम्ही म्हणाल यात विषेश काय? विशेष हे आहे की, आज्जी सुमन धामणे या अस्सल गावरान भाषेत भारतातील सर्वच प्रकारच्या पदार्थांबरोबरच परदेशी पदार्थ स्वतः बनवतात आणि त्यांचा नातू हे सगळं रेकॉर्डकरून आपली आज्जी या त्यांच्या युट्यूब चॅनलवर अपलोड करतो.

आजी म्हणजेच, सुमन यांचे पती पोलीसात असल्याने त्यांची वारंवार बदली व्हायची, सुमन आजी दिवसभर घरीच असायच्या. त्यांना लहानपणापासूनच जेवण बनवायची फार आवड आहे. त्यामुळे घरी बसल्याबसल्या त्या नवनवीन पदार्थ स्वतःहून बनवायला शिकल्या. त्याचबरोबर त्यांनी घरच्याघरीच वेगवेगळे मसाले बनवायला सुरूवात केली. विदर्भात आपली आज्जी या नावाने त्यांचे मसाले सुध्दा मोठ्या प्रमाणात विकले जातात. याच मसाल्याच्या ब्रँड वरून आज्जीचं वेगवेगळे पदार्थ बनवायचं कौशल्य जगासमोर घेऊन येण्यासाठी त्यांचा नातू यश याने आपली आज्जी या नावाने युट्यूब चॅनलची सुरूवात केली.

यश सध्या ११ वीत शिकायला आहे. तर त्याने वयाच्या १२ व्या वर्षापासून युट्यूब वर टेक्नोलॉजी आणि इतर विषयांवर युटूयूबवर व्हिडिओ बनवून टाकायला सुरूवात केली. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आज्जींच जेवण बनवनायचं कौशल्य आपली आज्जीच्या माध्यमातून जगासमोर आणल्यानंतर त्याला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिदास मिळाला आहे.

‘नमस्कार बाळांनो…कसे आहात तुम्ही’ असं म्हणत आजी व्हिडिओतून विविध प्रकारच्या रेसिपीस् बनवून दाखवतात. वर्षभरातच आज्जी सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्या असून त्यांना एक वेगळा चाहाता वर्ग तयार झाला आहे. आज्जीच्या व्हिडिओला लाखोंनी व्ह्यूज् मिळतात. कमी वेळात या आजी इतक्या लोकप्रिय झाल्या की त्यांचं चॅनल हॅकर्सनी हॅक देखील केलं होतं. अनेक लोकांनी यावेळी आज्जींचं समर्थन केलं आणि यश याने काही लोकांच्या मदतीने हे चॅनल परत देखील मिळवलं.

नऊवारी साडी आणि साधेपणा असून देखील आजी अल्पावधीतच सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्या आहेत. ऐरवी मराठी व्हिडिओ सोशल मीडियावर चालत नाहीत असं म्हणाऱ्या लोकांसाठी सुमन यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. मराठीपण आणि मराठी खाद्य संस्कृती सोशल मीडियावर जपणाऱ्या आणि वाढवणाऱ्या सुमन धामणे आणि त्यांचा नातू यश यांचं कौतूक करावं तेवढं कमीच..

-सुशांत वाघमारे (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: