नाट्यकर्मी आणि रंगमंच कामगारांसाठी अभिनेते ‘वैभव मांगले’ यांचा मदतीचा हात.

{"source_sid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1600958701155","subsource":"done_button","uid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1600958701132","source":"other","origin":"gallery"}

मांगले मदतीत दंगले

अभिनेता वैभव मांगलेचं चित्रकलेवरचं प्रेम तुम्हा सगळ्यांना माहित असेलच. त्याने काढलेल्या विविध चित्रांचे फोटो तो वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहचवत असतो. लॉकडाऊन काळात वैभव त्याच्या गावी कोकणात होता. तिथे त्याने विविध चित्र रेखाटली. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या त्याच्या चित्रांचं अनेकांकडून कौतुकं झालं. आता या चित्रांची विक्री करून, त्यातून येणारी रक्कम गरजू रंगमंच कामगारांना मदत म्हणून देण्याचं त्यांनी ठरवलं आहे.

लॉकडाऊनची सुरुवात झाली, चित्रीकरण आणि नाटकाचे प्रयोग बंद असल्यामुळे दरम्यानच्या काळात हाताशी बराच वेळ होता. या वेळेचा उपयोग वैभवने चित्र काढण्यासाठी केल्याचं, ते सांगतात. त्याने रेखाटलेली सगळीच चित्र, त्याच्या मित्र परिवारासोबतच त्याच्या चाहत्यांनाही त्याचिऊ ही चित्र प्रचंड आवडली. सुरुवातीला कागद आणि स्टोन पेंटिंग झाल्यानंतर त्यांनी लाकडी फळ्यांवर चित्र काढायला सुरुवात केली. “ही चित्र काढताना मला खूप मजा येते, यानिमित्तानं नवनवीन कल्पना सुचतात, असं वैभव आवर्जून सांगतात. सुरुवातीला अनेक जण, ‘ही सगळी चित्र एवढी चांगली आहेत कि, आम्ही पैसे देऊन ही विकत घेण्यास तयार असल्याचं अनेकांनी त्यांना सांगितलं. पुढे दिवसागणिक लॉकडाऊनच्या दिवसांनमध्ये वाढ करण्यात आली. चित्रीकरण आणि नाटकं बंद असल्यामुळे अर्थातच, रंगमंच कामगारांच्या हातचा रोजगार थांबला होता. अखेर त्यांना मदत करण्यासाठी अनेक कलाकारांप्रमाणे वैभव मंगलेही पुढे सरसावले. त्यांनी काढलेली चित्र विकून मिळणाऱ्या पैशांतून त्यांनी या लोकांना मदत करण्याचं ठरवलं. आत्तापर्यंत त्यांनी शंभरहून अधिक चित्र काढली असून त्यांपैकी अनेक चित्रांची त्यांनी विक्रीही केली आहे. आजवर झालेल्या विक्रीतून दीड लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत मदत अनेक गरजू रंगकर्मींच्या कुटुंबाला करण्यात आली आहे.  

सिने आणि नाट्यसृष्टीतील कलाकारांच्या बरोबरीनेच अनेक प्रेक्षक आणि कालाप्रेमीही ही चित्र विकत घेत आहेत. त्यामुळे ज्यांना कुणाला वैभव यांनी काढलेली चित्र आवडली असतील, आणि ती चित्र विकत घेण्याची इच्छा असेल त्यांनी वैभव यांच्याशी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधावा.

वामाज् गॅलरी

सगळी परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर या चित्रांचं प्रदर्शन  भरवण्याचा वैभव यांचा मानस आहे. शिवाय, येत्या काळात ‘वामाज् आर्ट गॅलरी’ न नावानं त्यांची स्वतंत्र आर्ट गॅलरी सुरु करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. सध्या ही गॅलरी ऑनलाइन स्वरुपात चालत असून, लवकरच प्रदर्शनासंदर्भात माहिती मिळेल असं वैभव सांगतात. शिवाय, एका आर्किटेक्टला वैभव यांची चित्र एवढी आवडली आहेत की, त्यांनी वैभव यांना त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्समध्येही काम करण्याचं विचारलं आहे.  

या मंडळींनी अभिनेते वैभव मांगले यांच्या उपक्रमाचे कौतुकं करतं, वैभव यांच्याकडून त्यांच्या आवडीच्या कलाकृती विकत घेऊन त्यांच्या या कार्यात हातभार लावला.

अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: