११ लाखांची पैठणी पाहण्याची उत्सुकता – आदेश बांदेकर

दार उघड वहिनी म्हणत महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारतातील तमाम वहिनींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी देऊन बांदेकर भाऊजी आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम गेली १८ वर्ष सन्मान करत आला आहे. आता होम मिनिस्टरच ‘महामिनिस्टर‘ हे नवीन पर्व ११ एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे ज्यात बांदेकर भाऊजी विजेत्या वहिनीला चक्क ११ लाखांची पैठणी देणार आहेत. याच निमित्ताने त्यांच्या सोबत साधलेला हा खास संवाद.  

आदेश बांदेकर

१. होम मिनिस्टर हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय त्याबद्दल काय सांगाल?

– होम मिनिस्टर या कार्यक्रमाने १८ वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं. या १८ वर्षांच्या प्रवासात कुठेही खंड पडला नाही. लॉकडाऊनमध्ये देखील होम मिनिस्टरने घरच्या घरी वहिनींना पैठणीचा मान दिला आहे.  

२. महामिनिस्टर या नवीन पर्वा बद्दल काय सांगाल?

– यावर्षी महामिनिस्टरच्या रूपाने एक महास्पर्धा प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे. महाराष्ट्रभर हा पैठणीचा खेळ रंगेल आणि ११ लाखांची पैठणी जिंकण्याची चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

आदेश बांदेकर

  ३. या ११ लाखांच्या पैठणीची खूप चर्चा आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?

– या पैठणीला सोन्याची जरी असेल पण हि ११ लाखांची पैठणी कशी असेल हि पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांप्रमाणेच मला देखील आहे, त्यामुळे महामिनिस्टर या नवीन पर्वासाठी मी देखील खूप उत्सुक आहे.  

४. प्रोमो मध्ये दाखवल्याप्रमाणे खरंच सुचित्राजी तुमची बॅग भारतात का?

– सुचित्रा तिची कामं आणि शूटिंग सांभाळून मला प्रवासात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी तयार ठेवते. शूटिंगसाठी माझे सतत दौरे चालू असल्यामुळे मी खूप काळापासून माझ्या घरी २४ तास कधी घालवले असल्याचे मला आठवत नाहीत. त्यामुळे सुचित्रा मला लागणाऱ्या सगळ्या वस्तूंकडे बारकाईने लक्ष ठेवते आणि ती जबाबदारी उत्तम सांभाळते असं मी म्हणेन.

सौजन्य- झी मराठी

Share your valuable opinion

%d bloggers like this: