‘बेबी ऑन बोर्ड’ मधील श्रुती-सिद्धार्थच्या धमाल जर्नीला ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर आजपासून सुरुवात

‘बेबी ऑन बोर्ड’च्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांची या सीरिजविषयीची उत्सुकता अधिकच वाढली. प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम देत, ‘बेबी ऑन बोर्ड’ चे २ एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. ‘बेबी ऑन बोर्ड’च्या पहिल्या दोन एपिसोड्समध्ये प्रतीक्षा मुणगेकर म्हणजेच श्रुती व अभिजीत आमकार म्हणजेच सिद्धार्थचा त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश पाहायला मिळत आहे. गृहप्रवेश करतानाचा या जोडप्याचा आनंद, उत्सुकता यात दिसतोय. श्रुतीचे बाळंतपण सिद्धार्थने करायचे ठरवल्यावर आता एक बाबा आणि नवरा म्हणून त्याची जबाबदारी तो कशी पार पाडतो, या दरम्यान या दोघांमध्ये होणारी नोकझोक यात अधिकच रंगत आणत आहे. श्रुतीचे डोहाळे पुरवण्यापासून तिच्या प्रेग्नंन्सी डाएटपासून खाण्या – पिण्याच्या वेळेची काळजी सिद्धार्थ घेतोय. स्वतः चमचमीत, चाविष्ट पदार्थांचा त्याग करणारा, श्रुतीला मॉर्निंग वॉकला घेऊन जाणारा एक उत्तम नवरा आणि ‘डॅड टू बी’ सिद्धार्थ सर्वांनाच आवडेल. पहिल्या दोन एपिसोड्सने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्यानंतर आता उत्सुकता लागून राहिली आहे ती पुढील एपिसोड्सची.

अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” बेबी ऑन बोर्डचे पहिले दोन एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर आले असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. श्रुती व सिद्धार्थ या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. काहीतरी नवीन मजेशीर आशय ‘बेबी ऑन बोर्ड’च्या माध्यमातून घेऊन आलो आहोत आणि प्रेक्षकांना आमचा हा प्रयोग आवडत असल्याचे बघून समाधान वाटतेय. लवकरच याचे पुढील भागही प्रेक्षकांच्या भेटीला येतील.”

दिग्दर्शक सागर केसरकर म्हणतात, ” पहिल्या दोन एपिसोड्सला मिळालेला प्रतिसाद पाहून खूप आनंद होतोय. माझ्या मते, प्रत्येक नवविवाहित जोडप्याला आपली वाटणारी ही कहाणी आहे. पुढील एपिसोड्सला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याची उत्सुकता आता आम्हाला आहे.”

प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत ‘बेबी ऑन बोर्ड’ या सीरिजचे दिग्दर्शन सागर केसरकर यांनी केले आहे. निर्माते साईनाथ राजाध्यक्ष व बिना राजाध्यक्ष असून अंकित शिंदे व दिव्या घाग हे कार्यकारी निर्माते आहेत.

Share your valuable opinion

%d bloggers like this: