Behind The Scenes with Suyash Tilak

{"source_sid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1590308539684","subsource":"done_button","uid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1590308539659","source":"other","origin":"gallery"}

लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकार रोज लाईव्ह येऊन कोणी कविता ऐकवत आहेत तर कोणी त्यांच्या कलांमधून प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी त्यांच्या सोबत गप्पा मारायला सोशल मिडीयाच्या माध्यमातून लाईव्ह येत आहेत. प्रेक्षक आणि कलाकार ही डिजिटली एकमेकांच्या भेटीला येतात. अभिनेता सुयश टिळक हा एक खास लाईव्ह घेऊन रोज प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. “पडद्यामागचं” या अनोख्या लाईव्ह सेशन मधून तो काहीतरी भन्नाट करतोय, सुयश कडून त्यांच्या या खास लाईव्ह गप्पांबद्दल जाणून घेऊ या….

“पडद्यामागचे जादुई कलाकार” 

आपल्या इंडस्ट्रीत अशी अनेक लोकं आहेत जी पडद्यामागे काम करतात. अश्याचं दिग्दर्शक, लेखक, छायाचित्रकार, वेशभूषाकार यांच्या सोबत गप्पा मारुन त्यांच्या क्षेत्राविषयी मी जाणून घेतो. आपल्याकडे एखादा चित्रपट किंवा मालिका, नाटक उभं करण्यामध्ये अनेकांचा हातभार लागलेला असतो. अश्याच लोकांसाठी मी “पडद्यामागचं” हे लाईव्ह सेशन मी सुरू केलं. 

“खास कलाकारांसोबत गप्पा” 

या मागची संकल्पना मुळात हीच होती की आपल्याकडे मराठीत एखाद्या चित्रपटातले कलाकार हेच मीडिया समोर येतात त्यांच्या मुलाखती होतात पण हा एक प्रोजेक्ट साकारण्यात अनेक मंडळी काम करतात तर अश्या लोकांना यातून प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येऊन त्यांच्या या कामाची काय प्रक्रिया असते हे जाणून घेऊन, त्यांच्या कामातले बारकावे टिपण्याचं काम या लाईव्ह मधून करण्याचा एक प्रयत्न आहे. मी गेले १० वर्ष या इंडस्ट्रीत काम करतोय. काम करताना मला माझ्या आजूबाजूच्या लोकांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल  जाणून घ्यायला आवडतं. या लाईव्ह मधून अशी काही मंडळी असतात जी या प्रोसेसचा एक भाग असतात. त्यांच्या कडून या खास “पडद्यामागच्या गोष्टी” ऐकण्यासाठी हा खास लाईव्ह कार्यक्रम मी माझ्या सोशल मीडिया वरून करतोय. 

“नव्या कलाकारांनी यातून काहीतरी शिकावं” 

या मागचा अजेंडा हाच आहे की इंडस्ट्रीत येऊ पाहणाऱ्या नव्या कलाकारांना नवीन व्यक्तींना इंडस्ट्रीत असलेल्या विविध क्षेत्राविषयी यातून माहिती मिळते. त्यांनी इंडस्ट्रीत येताना अनेक गोष्टीचा अभ्यास करून या इंडस्ट्रीत काय वेगळं करता येईल याचा विचार करावा. इंडस्ट्रीत असलेली ही विविध क्षेत्र कोणत्या तऱ्हेने कल्पकरित्या हाताळली जातात यांच्या अनोख्या गोष्टी यातून उलगडण्याचा प्रयत्न मी करतो. आपण एक कलाकार म्हणून या प्रोसेस चा भाग असतो पण ही प्रोसेस नेमकी कशी पार पडते, त्या मागे काम करणाऱ्या या खास व्यक्तींची गोष्ट मी “पडद्यामागचं” यातून सांगतो. खूप वरिष्ठ मंडळींपासून इथे लोक काम करतात तर त्यांच्या कामाची ही अनोखी प्रक्रिया नेमकी काय असते या बद्दल आम्ही या लाईव्ह सेशन मध्ये जाणून घेयचा प्रयत्न करतो.

“पडद्यामागची प्रोसेस समजते” 

अनेक वेळा प्रोजेक्टच्या मागच्या प्रोसेस बद्दल बोलणं होत नाही. ह्या निमित्ताने त्या प्रोसेस बद्दल मी काही तंत्रज्ञांशी चर्चा करून ह्या माध्यमांचा जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय. 

“चर्चा, गप्पा आणि बरचं काही” 

ह्या निमित्ताने अभ्यासपूर्वक गोष्टी समजून घेता येतील नवीन सर्व तंत्रज्ञ व कलाकारांना. तसेच अनेक वर्ष ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच व नवीन काही विषय किंवा जुन्या प्रश्नांवर सोल्युशन्स मिळाली तर नक्कीच मदत होईल.

“उत्तम प्रतिसाद” 

जेव्हा हे लाईव्ह सुरू केलं तेव्हा पासून आज पर्यंत मी इंडस्ट्री मधल्या अनेक वरिष्ठ मंडळी पासून आताचे लेखक, दिग्दर्शक, छायाचित्रकार, व्हिडिओ एडिटर, तंत्रज्ञ मंडळी अश्या विविध क्षेत्रातील लोकांशी गप्पा मारतो. त्यांच्या कामाचे अनुभव ऐकण्यासाठी अनेक जण येतात. मराठी इंडस्ट्रीकडून आणि प्रेक्षकांकडून याला मिळणारा प्रतिसाद खूप मस्त आहे. मराठी इंडस्ट्रीत अश्या फार कमी लोकांसोबत चर्चा घडवल्या जातात तर इंडस्ट्रीत असलेले पडद्यामागचे जादुई कलाकार आणि त्यांच्या खास गप्पा या लाईव्ह सेशन मधून अनेक जण अनुभवतात. आपल्याकडे या मंडळींशी फार कमी चर्चा होतात तर अश्या लोकांना या लाईव्ह सेशन मधून प्रेक्षकांच्या भेटीला मी घेऊन येतोय. अनेकांकडून हा खूप स्तुत्य उपक्रम आहे अशी पोचपावती मिळते.

“नवीन शो करायला आवडेल” 

लॉकडाऊननंतर हे लाईव्ह सेशन कसं सुरू राहणार हे माहीत नाही पण या पडद्यामागच्या कलाकारांच्या खास गोष्टी सांगणारा एखादा शो नक्की करायचं डोक्यात आहे. मला जर अशी संधी मिळाली तर मी अश्या प्रकारचा शो नक्की करेन.

सुयश ने त्यांच्या या खास लाईव्ह सेशन मधून आजवर अनेक खास कलाकारांशी गप्पा मारल्या आहेत. सचिन दरेकर, हेमंत ढोमे, संजय जाधव, अमित फाळके, अमोल पाथरे, तेजस नेरुरकर, चिन्मय मांडलेकर, अमोल पाठारे, प्रकाश कुंटे, मकरंद माने अश्या अनेक दिगग्ज कलाकारांच्या सोबतीने हे लाईव्ह पुढे सुद्धा असंच चालू राहणार आहे आणि अजून अनेक खूप पाहुणे मंडळी आणि त्यांच्यापडद्यामागच्या भन्नाट गप्पा ऐकायला मिळणार आहेत.

https://www.youtube.com/user/suyashvt/videos

मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी) 

Share your valuable opinion

%d bloggers like this: