संवाद साधणारा कार्यक्रम करायची इच्छा पूर्ण झाली – सुबोध भावे

‘बस बाई बस’ या कार्यक्रमातून सुबोध भावे प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीस येणार आहे. हा कार्यक्रम २९ जुलै पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात काही सुप्रसिद्ध महिला व्यक्तिमत्व उपस्थित राहणार असून सुबोध त्यांच्याशी संवाद साधणार आहे.

अशा प्रकारचा कार्यक्रम सुबोध पहिल्यांदाच करतोय त्यामुळे हा कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता व्यक्त करताना सुबोध म्हणाला, “मला काहीतरी वेगळं किंवा नवीन करायची इच्छा होती. संगीत किंवा नृत्यांच्या स्पर्धांमध्ये आत एकसुरीपणा यायला लागला आहे. मी याआधी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे पण संवादाचा कार्यक्रम मी कधीच केला नव्हता आणि तो करायची माझी खूप इच्छा होती. त्यामुळे जेव्हा मला या कार्यक्रमाची संकल्पना कळली तेव्हा मला ती खूप आवडली आणि त्वरित होकार दिला.” या कार्यक्रमात आता पर्यंत चित्रित झालेल्या भागांमधील एक किस्सा सांगताना सुबोध म्हणाला, “अमृता फडणवीस जेव्हा मंचावर आल्या होत्या तेव्हा कार्यक्रमातील महिला मंडळाने त्यांना ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारला त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी तो भाग न चुकता बघावा पण त्यांचं उत्तर ऐकून मी थक्क झालो आणि माझा त्यांच्याबद्दलचा आदर वाढला.”

Share your valuable opinion

%d bloggers like this: