Chef Parag Kanhere brings smiles on Policemans face by serving delicious his Own brand ‘BIGG VADAPAV’ along with Herbal Tea – Maharashtra Day Special

 (महाराष्ट्र दिन विशेष)

शेफ पराग कान्हेरेच्या नवीन ‘बिग वडापाव’चं पोलीस बांधवांकडून उदघाटन.

चटकदार वडापावच पोलिसांकडून चमचमीत कौतुक

जगभर करोनाचं सावट असताना, केवळ आपल्या सुरक्षेसाठी शासनाकडून प्रत्येक नागरिकाला घरी थांबण्याचे आदेश दिले आहेत. अशातही पोलीस प्रशासन, डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचारी, तसेच अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणारे लोकं आपल्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी झटताहेत. ‘आपण ज्या समाजात वाढलो, ज्याने आपल्यावर भरभरून प्रेम केलं, त्या समाजाचं आपणही देणं लागतो’, ही जाणीव होणं फार महत्त्वाचं असतं. समाजातील अनेक मंडळी समाजभान जपण्याचा त्यांच्यापरीने पुरेपूर प्रयत्न करत आहेत. शेफ पराग कान्हेरे हे त्यातील एक नावं. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून पराग त्याच्या पाककलेच्या जोरावर पोलीस बांधवांना त्यांच्या सध्याच्या धकाधकीतून थोडा वेळ का होईना त्यांना आनंद वाटतोय. ‘महाराष्ट्र दिना’चं अवचित्य साधून जाणून घेऊया मराठमोळ्या शेफच्या कृतज्ञते विषयी…

लॉकडाऊनची सुरुवात झाल्यापासून दिवसरात्र आपल्या संरक्षणासाठी उभ्या असणाऱ्या पोलिसांसाठी आपणही काहीतरी करावं ही भावना अनेकांच्या मनात येते. पण, स्वतः पुढाकार घेऊन समाजभान जपत काम करणारे फार कमी लोकं असतात. बिगबॉसफेम सेलिब्रीटी-शेफ पराग कान्हेरे हे त्यांपैकी एक नावं. आज करोनामुळे देशभरातील पोलीस बांधव आपल्यासाठी अहोरात्र झटताहेत हे पाहून त्यांची काळजी घेणंही आपलं कर्तव्य आहे या जाणीवेतून पराग त्याच्या परीने पोलिसांसाठी काम करतोय. पुण्यात दिवसभरात विविध ठिकाणी पहाऱ्यासाठी तैनात असणाऱ्या पोलीस बांधवांना शेफ पराग स्पेशल ‘बिग वडापाव (Bigg वडापाव) आलं-तुळशीचा चहा (हर्बल टी)’ वाटण्यास सुरुवात केली आहे. चहा प्यायल्यानंतर आणि वडापाव खाल्ल्यानंतर पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला वेगळंचं समाधान देणारं असतं असं पराग आवर्जून सांगतो. हे काम करताना पोलीस प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेऊन, त्यांनी सांगितलेल्या सगळ्या नियम आणि अटींच काटेकोर पालन करून त्याची ही सेवा गेले अनेक दिवस अविरतपणे सुरु आहे. 

पुण्याच्या झोन ३ मधील पोलीस आयुक्तालय, सोबतच सिंहगड, अलंकार, दत्तवाडी, कोथरूड, उत्तमनगर, कर्वेनगर या भागांतील पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांसाठी पराग त्याच्या नव्या बिझनेसच्या ‘बिग वडापाव’चे मोफत वितरण पराग आणि त्याचे सहकारी  गेल्या अनेक दिवसांपासून करतोय. पोलिसांकडूनही वेळोवेळी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पराग सांगतो. अलंकार  पोलीस ठाण्याच्या हद्दीत परागचं बालपण गेलं.  तिथल्या खूप आठवणी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सगळ्यांनी घरी थांबणं गरजेचं आहे. पण पोलिसांची काळजी घेणंही अत्यावश्यक असल्यामुळे आम्ही आलं-तुळशीचा चहा वाटण्यापासून  सुरुवात केली.  आपल्यासाठी देखील कुणीतरी आपुलकीने हे करत आहेत याचा आनंद पोलीस बांधवांना वाटत असल्याचे अनेकांनी परागला सांगितले.   

जगावर असं भयावह संकट येईल, अशी कल्पना कोणालाच नव्हती. त्यामुळे लॉकडाऊनच्या पूर्वीचं माझा नवा बिझनेस ‘बिग वडापाव’च्या विविध शाखा उघडण्याचं आमचं प्लानिंग झालं होतं. पण हे सगळं सुरु असताना लॉकडाऊनची घोषणा झाली आणि आमचं सारचं काम ठप्प झालं. पण मग, पोलिसांकरता काम करून ‘बिग वडापाव’ची सुरुवात करावी या कल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात केली असल्याचं पराग सांगतो. सुरुवातीला, पार्टनर कुंदन देवधरे याच्यासोबत बोलून आठवड्याचे मंगळवार आणि शुक्रवार पाचशे वडापावचं वाटप करण्यास सुरुवात केली. प्रत्येक चेकपोस्ट, आणि विविध पोलीस कार्यालयात जाऊन या सध्या वडापावचं वाटप केलं जातंय. लॉकडाऊन सुरु असेल तोवर पोलिसांना सुखावणारा चहा आणि वडापाव वाटपाच काम असचं सुरु राहणार असल्याचं पराग सांगतो. सध्य परिस्थितीत उपलब्ध मनुष्यबळ लक्षात घेऊन येत्या काही दिवसात दिवसाला साधारणतः तीन ते साडेतीन हजार ‘बिग वडापाव’ आणि चहा पोलिसांचं कौतुकं करत त्यांना सुखावणार असल्याची माहिती परागने दिली.

अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: