Comedian Sushant Ghadge is exploring new ways to make people laugh

सुशांत ची काॅमेडीगिरी….. 

लॉकडाऊन मध्ये खूप कंटाळा आलाय ना??? आम्ही तुमच्यासाठी काहीतरी हटके घेऊन आलोय. काय आहे हे? ते समजलेच पण हे नक्कीच भन्नाट आणि कल्पक आहे यात शंका नाही. घरात बसून सगळेच काही न काही शिकतात. कोणी कूकिंग करतंय, कोणी आराम करतंय पण आज आम्ही तुम्हाला ज्या व्यक्ती ला भेटवणार आहोत तो त्याच्या घरी बसूनचं लोकांचं फुल्ल टू मनोरंजन करतोय. 


भाडिपाच्या स्टँडअप मधून तुम्ही त्याला पाहिलं असेलचं. याचा “विषय फारच खोल आहे” इंस्टाग्रामवर आणि युट्यूब वर तो तर एकदम कल्ला करतोय. 
स्टँडअप कॉमेडियन सुशांत घाडगे बद्दल आज आपण काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. लॉकडाऊन मध्ये तो घरी बसून लोकांना कसं हसवतोय आणि त्याचा स्टँडअपचा प्रवास त्याच्या जाणून घेऊयात.. 

“लॉकडाऊन चा पुरेपूर फायदा” 


    या लॉकडाऊन चा खूप फायदा होतो आहे. जवळपास ३ महिन्यांपूर्वी मी माझं युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं त्या सोबत मी इंस्टाग्रामवर अगदी छोटे व्हिडिओ टाकायचो पण हवा तेवढा प्रतिसाद  मिळायचा नाही. पण या लॉकडाऊन मुळे झालंय असं की ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर लोक खूप गोष्टी बघायला लागले, माझे ३ ते ४ व्हिडिओ या काळात फार व्हायरल झाले, या मुळे एक नवीन प्रेक्षकवर्ग मिळाला. लोकं इंस्टाग्रामवर वर असे अगदी १ मिनिटांचे व्हिडिओ पटकन बघू शकतात. या दरम्यान माझा “तुम्ही चुकून घरी शिवी देता” हा व्हिडिओ या लॉक डाऊन मुळे प्रचंड व्हायरल झाला आणि या लॉकडाऊन चा दुसरा असा एक मी फायदा करून घेतोय मला घरी स्वयंपाक करता येत नाही तर मोकळ्या वेळात मी हे पण शिकलो. 

“खूप स्टँडअप लिहिलंय” 


   सध्या खूप नवीन कन्टेन्ट लिहिलाय. मुळात स्टँडअप अश्या वेळी लिहिलं जात जेव्हा आपल्या आजूबाजूला काही न काही घडत असतं. कोरोनामुळे सतत काहीतरी घडतंय तर मी स्टँडअप साठी खूप नव्या गोष्टी लिहिल्या आहेत. जेव्हा लॉक डाऊन संपेल तेव्हा मी हे नक्की परफॉर्म करेन. 
“एकांकिका स्पर्धा मधून मिळालेला आत्मविश्वास” 
   लोकांना हसवू शकतो असं नाही पण एकांकिका स्पर्धांमुळे मला अंदाज आला होता की आपण एक परफॉर्मर म्हणून लोकांच मस्त मनोरंजन करू शकतो. लोकं तुम्हाला १ तास किंवा ४५ मिनिटं अगदी मस्त सहन करू शकतात हा आत्मविश्वास आला होता. जेव्हा मी खऱ्या अर्थाने स्टँडअप सुरू केलं तेव्हा लोकांना हसवायला सुरवात केली, स्टँडअप मध्ये मी किमान अर्धा तास लोकांना हसवू शकतो हा अनुभव स्टँडअप मुळे आला आणि आपण लोकांना आपल्या परफॉर्मन्स मधून खिळवून ठेवू शकतो हे एकांकिकांमधून कळलं. 
“मनोरंजनातली कल्पकता भाडिपा जपतंय” 
    भाडिपा सोबत काम करण्याचा अनुभव कमाल आहे. भाडिपा नेहमीच काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करतं. आम्ही आताच नेटफ्लिक्स वरच्या “मनी हाईस्ट” या शो ची  मराठी मध्ये पॅरडी केली आणि हा व्हिडिओ खूप जास्त लोकांना आवडला तर अश्या नवीन गोष्टी करण्याकडे भाडिपा चा कल असतो. भाडिपा ने २१ दिवस रोज नवीन व्हिडिओ प्रेक्षकांसाठी रिलीज केले आहेत. नेहमीच कोणत्या तरी वेगळ्या प्रकारे प्रेक्षकांच मनोरंजन करण्याचा माझा आणि भाडिपा चा प्रयत्न असतो ही एक गोष्ट आमच्यात सारखी आहे म्हणून मी भाडिपा सोबत काम करतोय. 

“Improvisation महत्त्वाचं कारण….” 

      व्हिडिओ मध्ये खूप improvisation असतं. मी  आधी व्हिडिओ लिहितो आणि मग परफॉर्म करतो. स्टँडअप मुळे सुधारणा या होतात आणि मी त्या ठेवतो कारण मग ते अगदीच लिहून सादर केलंय असं वाटत नाही ते सहजपणे केल्यासारखं वाटतं. 

“अनुभवलेल्या विषयांवर व्हिडिओ”


   माझ्या व्हिडिओ चे विषय हे फार ट्रेंडी असतात. मला अनेकांकडून हे नेहमीच सांगितलं जातं की प्रत्येक जण तो विषय स्वतःला रिलेट करतो यामुळे जे मी अनुभवतो आणि माझ्या आजूबाजूला जे घडतंय ते मी परफॉर्म करण्यावर माझा भर असतो. मी वैयक्तिक जे अनुभवतो ते मी लोकांना दाखवतो. व्हिडिओ मध्ये खूप आजूबाजूचे विषय असतात जसं की “जेव्हा तुम्ही चुकून घरी शिवी देता” हा व्हिडिओ असेल तर हे माझ्या बाबतीत सुद्धा झालं त्यामुळे हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला त्या नंतर “एक कुटूंब – एक सिगारेट योजना” हा व्हिडिओ केला होता तर हा व्हिडिओ खूप जास्त ट्रेंडी झाला. जे विषय मला जवळचे वाटतात त्या विषयावर मी व्हिडिओ करतो. 

“युट्युब वर एंट्री” 


   मी नुकतंच एक युट्युब चॅनेल सुरू केलं आहे. इंस्टाग्रामवर आणि युट्युब दोन्हीकडे व्हिडिओ पोस्ट करतो. लवकरच या युट्युब चे १० हजार सबस्क्रायबर होतील. मी दोन्ही कडे अगदीच ट्रेंडी विषय घेऊन व्हिडिओ करतो. मी यात “ट्राएईंग टू अंडरस्टँड” नावाचा एपिसोड करतो ज्यात छोटी प्लेलिस्ट आहे. ह्यात सोशली पॉलिटिकल ह्युमर असलेली ही प्लेलिस्ट आहे त्या सोबत लॉक डाऊन च्या काळात “ओपन लेटर” खूप व्हायरल होऊ लागलेत म्हणजे मी त्यात ओपन लेटर टू चायना, ओपन लेटर टू ट्रम्प अशी लेटर लिहितोय. जर तुम्हाला माझा हा कन्टेन्ट आवडला तर नक्की माझ्या युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 

      सुशांतचे हे भन्नाट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. सुशांत दरवेळी आपल्यासाठी असेच ट्रेंडी आणि कमालीचे कल्पक भन्नाट व्हिडिओ घेऊन येणार आहे. 

सुशांत तू लोकांची अशीच करमणूक करत रहा, नेहमी वेगळ्या विषयांवर व्यक्त होत रहा. प्लॅनेट मराठी कडून सुशांत घाडगे ला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा! 


मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी) 

Share your valuable opinion

%d bloggers like this: