Digital Facebook Dindi By Swapnil More

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा “देहू- पंढरपूर” मध्ये होणारी “वारी” रद्द करण्यात आली असून अश्या परिस्थिती वारकऱ्यांना आणि विठू-माऊली च्या सगळ्यां भक्तांना ही वारी “डिजिटली” अनुभवयाला मिळणार आहे. “फेसबुक दिंडी” हे पेज गेली ९ वर्ष सातत्याने अनेक वारकरी मंडळीना डिजिटल वारी घडवतात. यंदा कोरोना मुळे ही वारी सगळ्यांना व्हर्च्युअली अनुभवयाला मिळणार आहे त्याबाबद्दल जाणून घेऊ या की कशी असणार आहे ही “डिजिटल वारी”

१० वर्षांपासून अनेकांना डिजिटली वारीचं दर्शन घडवणाऱ्या “फेसबुक दिंडी” यावर्षी सुद्धा आपल्याला या वारीची सफर घडवणार आहे. फेसबुक दिंडीच्या इ-वारकऱ्यांसाठी यंदा “माझ्या आठवणीतील वारी” या अनोख्या संकल्पनेतून वारी आपल्याला सगळ्यांना भेटायला येणार आहे. या डिजिटल वारीत तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता आणि तुमचे वारीचे अनुभव, फोटोग्राफ, वारीचं कथन असे अनेक भन्नाट उपक्रम या “व्हर्च्युअल वारी” मधून आपल्याला अनुभवता येणार आहे.

फेसबुक दिंडी या पेजवरून तुम्हाला ही अनोखी वारी अनुभवता येणार असून तुम्ही सुद्धा तुमच्या ” आठवणीतली वारी “कथन करू शकता. यंदा पंढरीची वारी आणि पालखी सोहळा होणार नाही तर अश्या परिस्थिती मध्ये गेली दहा वर्षे लाखो वारकऱ्यांना इ- वारी घडवण्याची अनोखी परंपरा फेसबुक दिंडी हे पेज जपणार आहे. या सगळ्या साठी फेसबुक दिंडी ची संपूर्ण टीम अहोरात्र या साठी काम करण्यात मग्न आहे. लॉकडाऊन मुळे यंदा लाखो वारकऱ्यांची वारी चुकणार पण फेसबुक दिंडी ही डिजिटल वारी आपल्या घरी घेऊन येत आहे. त्यामुळे या डिजिटल वारीत सहभागी होऊन वारीचा अनुभव घ्यायला विसरू नका!

यंदा फेसबुक दिंडीच दहावे वर्ष आहे मागील नऊ वर्षात जे फोटो आणि व्हिडिओ शूट केले आहेत त्यातून यंदाच्या वारीचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचा आमचा प्रयन्त आहे. या सोबतीने “माझ्या आठवणीतील वारी” हा अनोखा उपक्रम घेऊन आम्ही वारकऱ्यांना डिजिटली वारीचा व्हर्च्युअल वारीचा अनुभव आम्ही देणार आहोत.

स्वप्नील मोरे (संस्थापक – फेसबुक दिंडी)

फेसबुक दिंडीच्या संपूर्ण टीम ला त्यांच्या या स्तुत्य उपक्रमासाठी प्लॅनेट मराठी कडून खूप खूप शुभेच्छा!

नेहा कदम (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: