दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा ‘आली दिवाळी’ हा म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला

दिवाळी म्हणजे रोषणाई, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज, फटाक्यांची आतषबाजी आणि स्वादिष्ट फराळाची मेजवानी. दिवाळी म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाची लयलूट. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘सप्तसुर म्युझिक’ने ‘आली दिवाळी’ हे गाणं लाँच केलं आहे.

साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकने आली दिवाळी गाण्याची निर्मिती केली आहे. शशांक कोंडविलकर यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे. युक्ता पाटील आणि सत्यम पाटील यांनी गाणं गायलं आहे. म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन नीरव म्हात्रे यांचं असून अस्मिता सुर्वे, भरत जाधव, प्राजक्ता ढेरे, प्रणय केणी, दिव्या पाटील, पंकज ठाकूर, रश्मिता तारे, सौरभ गर्गे, बीना राजाध्यक्ष, परिणिती ठाकूर, दिव्यांश म्हात्रे, सिया पाटील, हर्षवी ठाकूर, रुपांश पाटील हे कलाकार म्युझिक व्हिडिओमध्ये झळकले आहेत.

दिवाळीच्या काळात घरोघरी असलेलं आनंद आणि उत्साहाचं वातावरण या म्युझिक व्हिडिओतून टिपण्यात आलं आहे. अतिशय उत्तम शब्द, श्रवणीय संगीत हे या गाण्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपलंसं वाटणारं हे गाणं दिवाळीच्या अनेक आठवणींना नक्कीच उजाळा देईल. त्यामुळे दिवाळीचा आनंद यंदा ‘आली दिवाळी’ या म्युझिक व्हिडिओद्वारे द्विगुणित होणार हे नक्की!

Share your valuable opinion

%d bloggers like this: