Eco Friendly Ganpati Bappa By Art Director Sumit Patil

प्रत्येकाच्या घरी बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. यंदा हा उत्सव सरकारच्या नियमांच पालन करून साजरा केला जाणार आहे. दरवर्षी मुंबईत गणपतीचा एक वेगळा माहोल बघायला मिळतो. तर एकीकडे चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झाले आहेत. कोकणात गणेशोत्सव हा वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो तिकडे या सणाचा उत्साह काही औरच.

आज आपण अश्याच कोकणातल्या गणपतीची खास झलक बघणार आहोत. हा फक्त गणेशोत्सव नसून यातून पर्यावरणाच्या संवर्धनासाठीचा एक खास प्रयत्न केला आहे. कला दिग्दर्शक “सुमीत पाटील” याच्या कल्पेनेतुन कोकणात हा गणेशोत्सव खास होतोय. सुमीतकडून या गणेशोत्सवाचं वेगळेपण जाणून घेऊ या..

पर्यावरणपूरक बाप्पा!!

कोकणातल्या कुडाळ येथील माणगाव मध्ये गणेशोत्सव हा यावर्षी काहितरी खास तऱ्हेनं साजरा केला जाणार आहे. कला दिग्दर्शक सुमीत पाटील यानी त्याच्या कल्पनेतून साकारलेल्या गणेशोत्सवाचे काही खास विडिओ तयार केले आहे. कोकणातील गणेशोत्सव हा प्रत्येक कोकणी माणसांसाठी जिव्हाळ्याच्या विषय असतो. पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणारा गणेशोत्सव नक्की कसा असतो यांचा एक सोहळा सुमीत च्या विडिओ मधून अनुभवयाला मिळतो. गणेशोत्सवाची परंपरा कोकणात वर्षानुवर्षे मोठ्या भक्तीभावाने आणि आपुलकीने जपली जाते. गणपतीचं पारंपरिक स्वागत, रात्रभर जागून केलेली भजन, गणपतीची खास आरास, आरती अश्या कित्येक गोष्टी इथे जपल्या जातात.

सुमीत ने गणपती साठी खास कोकणात विडिओ शूट केले आहेत आणि ते आपल्या समोर तो घेऊन आला आहे. कोकणात होणारा हा गणेशोत्सव आणि त्या मागची वर्षानुवर्षे जपली जाणारी परंपरा, कलेची जाण आणि निसर्गाच्या सानिध्यात साजरा केला जाणारा हा खास गणेशोत्सव यांची ओळख आजच्या पिढीला करून देण्यासाठी आणि पुढे ही परंपरा अशीच जपली जावी या साठी केलेला हा खास प्रयत्न आहे. पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या आवाहनाला साद दिली आहे. येणाऱ्या पिढीला सत्ता, संपत्ती पेक्षा आराधनेच्या या सवयीची शिकवण देण्याची गरज आहे.

“मुळात या वर्षीचा उत्सव जसा आनंदाचा असायला हवा तसाच तो आरोग्यउत्सव सुद्धा असायला पाहिजे. घरच्या घरी बरं होण्यासाठी काही खास ट्रिक्स असतात पण आपण त्याकडे लक्ष देत नाही आपण प्रत्येक वेळी डॉक्टर वर अवलंबून असतो. आपण आपलं आयुष्य कोणावर तरी अवलंबून राहून जगतोय. घरी बरं होण्यासाठी काही गोष्टी या घरात असायला हव्यात रोजच्या वापरात या गोष्टी वापरल्या पाहिजे तर या गोष्टी मी त्या बाप्पाच्या डेकोरेशन मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा आपण एखादा उत्सव साजरा करतो तेव्हा आपण आनंदात असतो पण त्याचं सोबतीने आपण आरोग्यदायी असायला हवं म्हणून आपण देवाला सांगत असतो की आम्हाला चांगलं आरोग्य दे तर आपल्याला चांगलं आरोग्य देणाऱ्या बाप्पाचा उत्सव हा आरोग्यमय गोष्टीने साजरा करायला हवा म्हणून हा विडिओ मी तयार केला. यातून अजून एक संदेश द्यायचा होता तो म्हणजे पर्यावरण पूरक, पर्यावरण स्नेही उत्सव कसा साजरा करू शकतात हे गावातल्या लोकांना सांगायचं होत आणि लोकांना हे कळलं. थर्माकोलचा वापर टाळून आपल्या आजूबाजूला असलेल्या असंख्य गोष्टीमधून सहज-सुंदर डेकोरेशन करता येत हे या निमित्ताने सांगता आलं. माणगाव च्या संपूर्ण टीम चे आभार ज्यांनी या विडिओ साठी कष्ट घेतले मदत केली त्यांना खूप धन्यवाद. यंदाचा उत्सव हा पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी होऊ देत हीच इच्छा बाप्पा पूर्ण होऊ देत.” – सुमीत पाटील (कलादिग्दर्शक)

यंदाचा गणेशोत्सव हा पर्यावरणाच्या सानिध्यात साजरा करू या आणि चला तर संकल्प करूया पर्यावरण रक्षणाचा वसुंधरेशी वेगळं नात जपून तिची समृद्धी जपण्याचा आपण प्रयत्न करू या!

गणपती बाप्पा मोरया! मंगल मुर्ती मोरया!

मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: