First RafaleWomen Fighter Pilot : Shivangi Singh

{"source_sid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1601116611905","subsource":"done_button","uid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1601116611873","source":"other","origin":"gallery"}

राफेलसह उड्डाण घेणारी पहिली महिला फायटर पायलट : शिवांगी सिंह.

‘राफेल’ची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या ‘१७ गोल्डन ॲरो स्क्वॉड्रन’मध्ये एक महिला फायटर पायलटचाही समावेश करण्यात आल्याचं नुकतंच समोर आलं होतं. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या भारतातील राफेल उड्डाण करणारी पहिली महिला फायटर पायलट ठरत आहेत. जगातील सर्वोत्तम श्रेणीच्या लढाऊ विमानांपैंकी एक असलेल्या ‘राफेल’ची पहिली महिला फायटर पायलट बनण्याचा मान शिवांगी यांना मिळाला आहे. राफेल वायुसेनेतील ‘मिग २१ बायसन’ची जागा घेताच शिवांगीही आपल्या नव्या भूमिकेत दाखल होणार आहेत.

मुळच्या उत्तर प्रदेशमधील वाराणसीची कन्या शिवांगी सध्या ‘कन्व्हर्जन ट्रेनिंग’ पूर्ण करत आहेत. ही ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर वायुसेनेच्या अंबाला बेसवर १७ गोल्डन ॲरोज स्क्वॉड्रनमध्ये त्या औपचारिक एन्ट्री घेतील. कोणत्याही पायलटला एका विमानानंतर दुसऱ्या पद्धतीच्या विमानातून उड्डाण घेण्यासाठी कन्व्हर्जन ट्रेनिंगची आवश्यकता असते. ३४० किलोमीटर प्रती तासाच्या वेगानं उडणाऱ्या आणि सर्वात जलद गतीन जमिनीवर उतरणाऱ्या जगातील सर्वात जलद विमान ‘मिग २१ बायसन’मधून त्यांनी यापूर्वी उड्डाण केलं होतं. नव्या बनावटीच आणि अत्याधुनिक ‘राफेल’ हे विमान त्यांच्यासाठी अगदीच नवीन असल्यामुळे त्यांना हे ट्रेनिंग दिलं जातंय.


शिवांगी सिंग यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण पूर्ण केल्यानंतर महिला पायलटच्या दुसऱ्या बॅचमध्ये त्या सहभागी झाल्या. २०१७ मध्ये त्या हवाईदलात सहभागी झाल्या होत्या. भारतीय हवाई दलात लढाऊ विमानांसहीत उड्डाण घेणाऱ्या १० महिला पायलट आहेत. या सर्वांनी सुपरसोनिक जेटसहीत उड्डाण घेण्याचं कठीण ट्रेनिंगही पूर्ण केलंय. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह याअगोदर राजस्थानच्या फॉरवर्ड फायटर बेसवर तैनात होत्या. इथं त्यांनी अनेकदा विंग कमांडर अभिनंदर वर्धमान यांच्यासोबत उड्डाण घेतलं होतं.


देशाच्या संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या आणि पहिली महिला फायटर बनण्याचा मान मिळालेल्या फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह यांना सलाम.

http://www.planetmarathi.org

Share your valuable opinion

%d bloggers like this: