Happy 25th Birthday Dearest Internet

हॅप्पी पंचविशी इंटरनेट!

लॉकडाऊनच्या काळात आपल्या सगळयांना खर्या अर्थाने ज्याचा खूप जास्त आधार होता तो म्हणजे “इंटरनेट” चा !

जरा विचार करा जर इंटरनेट नसतं तर? काय झालं असतं?? इंटरनेट शिवाय आपलं आयुष्य हे अपूर्ण आहे.

आज एवढी इंटरनेट बद्दल का चर्चा तर कारण फारच खास आहे, आपल्या भारतात इंटरनेट सुविधा येऊन उद्या १५ ऑगस्ट ला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. इंटरनेटची ही पंचविशी एकदम जोरदार साजरी करायला हवी. २५ वर्षात इंटरनेट क्षेत्रात झालेली उलथापालथ आणि या मुळे आपल्या जीवनात झालेले अमुलाग्र बदल हे उल्लेखनीय आहेत. अन्न, वस्त्र, निवारा यांच्या सोबत हल्ली इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे असं म्हणायला हरकत नाही. कोरोनाच्या काळात इंटरनेट हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे हे सगळ्यांना समजलंय. इंटरनेट @२५ मध्ये आपण इंटरनेट बद्दल काही खास रंजक गोष्टी जाणून घेऊ या….

   “इंटरनेटच्या जन्माची कहाणी” 

    इंटरनेट चा जन्म कसा झाला तर ही गोष्ट थोडी रंजक आणि तितकीच भन्नाट आहे. इंटरनेट चा जन्म शीत युद्धाच्या दरमान्य झाला अमेरिकेन सोव्हिएत युनियनला टक्कर देण्यासाठी १९५८ साली ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी (aarpa) ची स्थापना केली, आपल्या दूरसंचार यंत्रणेवर हल्ला झाला तरीही आपल्या महत्त्वाच्या संदेशांची देवाणघेवाण पूर्णपणे ठप्प होऊ नये यासाठी aarpa ने पॅकेट स्वीचिंग सारख्या अनेक कल्पक संकल्पना वापरून पहिल्यांदा अमेरिकेतल्या विविध भागात असलेले चार अति महत्त्वाचे कॉम्प्युटर जोडले जाऊन aapra नेट ची निर्मिती झाली. मग पुढे इंटरनेट नेटवर्क्सच नेटवर्क वाढत जाऊन “aarpa नेट” हे इंटरनेट नावानं ओळखलं जाऊ लागलं आणि यातून “इंटरनेट” ची निर्मिती झाली.

“जगभरात आहेत एवढ्या वेबसाईट ” 

      तुम्हाला कल्पना नसेल एवढ्या वेबसाईट आज जगभरात आहेत. तब्बल १७४ कोटी वेबसाईट या आपल्या इंटरनेट वर उपलब्ध आहेत. आपण दिवसाला अनेक नवनवीन वेबसाईट ला भेटी देत असतो मग त्या कामांसाठी असो किंवा आपल्या करमणुकीसाठी. आपल्याला हल्ली एका क्लीक वर सगळं जग बघता येत. सर्च इंजिन च्या मदतीने आपण अनेक गोष्टी सहजपणे शोधू शकतो आणि या साठी इंटरनेट चा वापर केला जातो. दर सेकंदाला ८,९०० ट्विट्स केले आणि दर सेकंदाला ४,५७३ स्काईप कॉल्स केले जातात. जगाशी जोडून ठेवण्यासाठी आपल्याला हे इंटरनेट फार मदत करत. इंटरनेट चा हा वाढता वापर बघता पुढे भविष्यात देखील हा आकडा खूप वाढू शकतो. सुरवातीला महाग असणारी ही इंटरनेट सेवा आता खूप स्वस्तात उपलब्ध होते आहे.

“ऑनलाइन चा जमाना” 

इंटरनेट मुळे घरबसल्या कामं होतात हे आपण या लॉकडाऊन मध्ये अनुभवतोवआहोत पण याचं सोबतीने ई-कॉमर्स मध्ये होणारी वाढ प्रचंड आहे. ई- कॉमर्स मुळे ऑनलाइन शॉपिंग, मार्केटिंग, ऑनलाइन पेमेंट अश्या किती सुविधा आपल्याला या इंटरनेट मुळे मिळाल्या आहेत. भविष्यात “ऑनलाइन शॉपिंग” हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होणार आहे यात शंका नाही. इंटरनेट मुळे आपण जगाशी जोडले गेलो आहोत पण वाढती लोकसंख्या लक्षात घेता लोकं मोठ्या प्रमाणात इंटरनेट वापरतात. अगदी आपल्या शिक्षणापासून ते व्यवसाय अश्या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटच स्थान अढळ आहे.

“सोशल जग”

     आधी फक्त कामासाठी वापरलं जाणार इंटरनेट हे पुढे जाऊन मनोरंजनासाठी वापरलं जाऊ लागलं आणि हो एवढं नाही तर आता आपण अनेक सोशल मीडिया चा वापर करतो इंटरनेट मुळे या सोशल मीडिया ने जन्म घेतला आणि एक अनोख्या पर्वाला सुरवात झाली. इंटरनेट ने सगळ्यात जास्त धुमाकूळ घातला तो या सोशल मीडिया साईटवर आणि या सोशल मीडिया ने आपल्या सोबत सगळ्यांना भुरळ घातली. आज जगात प्रत्येक व्यक्ती सोशल मीडिया चा वापर करते. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सॲप सारख्या लोकप्रिय वेबसाईटने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि जगाशी सोशली नातं निर्माण केलं.

     आज प्रत्येक क्षेत्र हे इंटरनेट मुळे जोडलं गेलं आहे. इंटरनेट मुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचण्याची एक भन्नाट संकल्पना या निमित्ताने आपल्याला समजली. सगळ्यांशी सोशली संपर्कात राहून सॉफ्टवेअर, बँकिंग, अश्या अनेक सेवा आपल्याला घरबसल्या मिळाल्या. वर्क फ्रॉम होम पासून ते थेट शॉपिंग पर्यंत अनेक गोष्टी आपण या इंटरनेट मुळे एका क्लीक वर करू शकतो. तुम्ही अश्या कोणत्या भन्नाट गोष्टी इंटरनेट मुळे शिकलात हे सांगायला विसरू नका!

थँक्स इंटरनेट आज तुझ्या मुळे आम्ही एवढं मस्त आणि कमालीचं फास्ट आयुष्य जगतोय. हॅप्पी पंचविशी!

नेहा कदम (प्लॅनेट मराठी)

http://www.planetmarathi.org

Share your valuable opinion

%d bloggers like this: