KALA GHODA FESTIVAL-

काळा घोडा @२०
   मुंबईत दरवर्षी जिथे कलांचा उत्सव साजरा केला जातो अश्या “काळा घोडा फेस्टिवल” ला येत्या २ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. १९९९ पासून या अनोख्या कलात्मक फेस्टिवलची मुहूर्तमेढ रोवली गेली. हा जरी कलाकृती आणि कलाकारी कलंदरी व्यक्तीचा उत्सव असला तरी इथे अनेक अफलातुन गोष्टी बघायला मिळतात. सगळेचं कलाकारी लोक या फेस्टिवल ची आतुरतेने वाट बघत असतात. यंदा या फेस्टिवलचं विसावं वर्ष आहे. या फेस्टिवल मध्ये व्हिजुयल आर्टस्, डान्स, संगीत, नाटक, चित्रपट, साहित्य यांच्या सोबतीने विविध इव्हेंट्स ची हि लगबग इथे तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. २ ते १० फेब्रुवारी दरम्यान हा फेस्टिवल रंगणार असून तुमच्या अनेक कलागुणांना वाव देण्यासाठी हा फेस्टिव्हल एक पर्वणी ठरणार आहे.

credit: kalaghodafestival

या वर्षी महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आहे त्यांनी देशासाठी जे योगदान दिलंय त्याला या फेस्टिवल मधून मानवंदना देण्यात येणार आहे. अनेक नव्या गोष्टींचा संगम इथे बघायला मिळतोच पण आपल्याला खूप गोष्टी या फेस्टिव्हल दरम्यान शिकायला मिळणार आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचचं लक्ष वेधून घेणाऱ्या या फेस्टिवल मध्ये यंदाचं विसाव्व वर्ष अगदी दणक्यात साजरं केलं जाणार आहे. कलांचा अनोखा उत्सव असलेल्या या फेस्टिवल ची सगळ्यांना उत्सुकता आहे .

२० वर्षांचं हे सेलिब्रेशन कोणत्या प्रकारे साजर केलं जाणार आहे हे बघू या… कलिनरी डीलाइट्स, डॉक्यूमेन्ट्री स्क्रिनिंग,  द मॅजिक ऑफ फ्लूट ( पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं खास  बासरीवादन ) , द नॅशनल हिरोज, गेट सेट ड्रोन, साहित्य, टच अ कार्ड, हिट द डान्स फ्लोर, हेरिटेज वॉक, खूप सारे कलात्मक स्टॉल आणि भन्नाट खरेदी…


१ ) अ ट्रीट फॉर द मूवी ( enthusiast ) इनथुझिएस्टीक :  “तुंबाड” आणि “बधाई हो” सिनेमाच्या कास्ट आणि टीम सोबत गप्पा रंगणार आहेत. 

pc: kalaghodafestival

२ ) पीपल कॉल्ड काला घोडा : काळा घोडा असोशियन तर्फे द पीपल्स प्लेस प्रोजेक्ट्स सह पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. फेस्टिवलचा वीस वर्षाचा इतिहास यातून उलगडणार आहे. 

३ ) डान्स इट  आऊट : पाश्चिमात्य ते भारतीय शास्त्रीय नृत्य यांचे फ्युजन या मध्ये सादर होणार आहे.

४ ) हेरिटेज वॉक : मुंबई मधली अनेक हेरिटेज ठिकाणं यातून लोकांना दाखवली जाणार आहेत.

५ ) टू डिकेड्स ऑफ मूवीज : या वर्षी वीस वर्ष पूर्ण करत असलेले सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग या फेस्टिव्हल मध्ये केलं जाणार आहे.

६ ) फँटसी लेखन शाळा : तुम्हाला लिहिण्याची आवड असल्यास ही कार्यशाळा तुमच्या लेखन कौशल्य लोकांसमोर घेऊन येण्यासाठी उत्तम संधी आहे. छोटी आणि काही तरी वेगळी फँटसी स्टोरी यात लिहायची आहे.
  अश्या प्रकारे यंदाच्या काळा घोडा फेस्टिव्हल मध्ये अनेक भन्नाट कार्यशाळा, इव्हेंट्स ची लगबग आणि शॉपिंग प्रेमींसाठी खरेदीची रेलचेल इथे तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. तुम्ही सुद्धा या कलात्मक “काळा घोडा फेस्टिवल” ला नक्की भेट द्या.

pc: kalaghodafestival

Share your valuable opinion

%d bloggers like this: