Lockdown and Instagram Live

{"source_sid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1590151709479","subsource":"done_button","uid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1590151649111","source":"other","origin":"unknown"}

लाॅकडाऊन लाईव्ह आणि बरंच काही

संध्याकाळ झाली की हल्ली बरेच कलाकार लाईव्ह  करतात, गप्पा गोष्टी, अनुभव शेयर  होतातपण अश्या काही भन्नाट व्यक्ती आहेत ज्या या लाईव्ह मधून आपल्याला काहीतरी खास अनुभव देऊन जातात

एक माणूस आहे जो कविता वाचन करतो त्याच्या मित्रांना घेऊन सोशल मीडिया वर मैफिल जमवतो आणि आपल्याला एक सुंदर अनुभव देऊन जातो तर दुसरीकडे नव्या कलाकारांसोबत काही धम्माल गप्पा आपल्या लाईव्ह मधून लोकांसाठी घेऊन येणाऱ्या या दोन खास मित्रा बद्दल या खास लाईव्ह सेशन बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत….

“कापूस कोंड्याची गोष्ट ऐकणार का!”  

    कलाकारांची कथा ही कापूस कोंड्याच्या गोष्टी सारखी आहे. त्यांच्या स्ट्रगल ची गोष्ट ऐकण्यात कोणाला ही रस नसतो. कलाकारांची गोष्ट ही कधी ही न संपणारी असते. तर मग आपण या कलाकाराच्या गोष्टी लोकांसमोर घेऊन आलो तर या विचारातून त्यांच्या या हटके कथा लोकांनी ऐकाव्यात म्हणून “कापूस कोंड्याची गोष्ट” ही कल्पना सुचली. 

लाईव्ह वाला काय रे भाऊ?

    मी लाईव्ह वाला या इन्स्टाग्राम पेजवरून लाईव्ह येत असतो “कापूस कोंड्याची गोष्ट” हे माझ्या लाईव्ह सेशन च नाव आहे. जो इन्स्टाग्राम वरचा कलाकार आहे, जो त्यांची कला लोकांना दाखवण्यासाठी इन्स्टाग्राम चा वापर करतो त्या कलाकाराला लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी लाईव्ह वाला पेजवरून मी लाईव्ह येत असतो. आपल्याकडे अशी अनेक लोक आहेत ज्यांना काहीतरी नवीन आणि चांगल्या गोष्टी ऐकायच्या असतात तर अश्या सगळ्या लोकांसाठी मी या पेजवरून अनेक कलाकाराशी संवाद साधतो त्यांच्या कामाबद्दल गप्पा मारतो. आर्टिस्ट सोबत लाईव्ह येऊन गप्पा होतात. वेगळं असं की भन्नाट असा रॅपिड फायर राऊंड असतो, एक सिक्रेट सेगमेंट असतो. अश्या कमालीच्या गोष्टी या लाईव्ह मध्ये करतो. यामागचा हेतू हाच आहे की नव्या कलाकारांना लोकांपर्यंत पोहचवून त्यांच्या केलेबद्दल लोकांना माहिती यातून मिळते. लोकांचा याला खूप मस्त प्रतिसाद मिळतो. लॉकडाऊन नंतर सुद्धा हे लाईव्ह असचं चालू राहणार आहे. लवकरच तुम्हाला “लाईव्ह वाला” या इन्स्टाग्राम पेजवरून अनेक नव्या आणि भन्नाट कल्पक लोकांना मी भेटवणार आहे. 

लोकेश वाणी (लाईव्ह वाला) 

इन्स्टाग्राम हँडल : livevala

https://instagram.com/livevala

 “रंगते ऑनलाइन मैफिल” 

मी जेव्हा माझ्या इन्स्टाग्राम वरून लाईव्ह कविता वाचायला लागलो तेव्हा सुरुवातीला मी एकटा वाचायचो मग कधीतरी मध्ये कोणीतरी एखादा मित्र जॉईन व्हायचा. मी आठवड्या मधून २ ते ३ दिवसांनी लाईव्ह करतो. थोड्या कविता सादर करता करता मस्त मैफिल रंगते. कधी कधी माझ्या कविता किंवा मी ज्या लोकांच्या कविता वाचल्या अश्या कविता मी लोकांना ऐकवतो. आपल्याकडे खूप कवी आणि लेखक उत्तम लिहितात त्यांचं हे लिखाण त्यांच्या कविता लोकांनी ऐकाव्या या संकल्पनेतून मी हे लाईव्ह करतो. अश्या कविता ज्या वाचल्या जात नाही लोकांपर्यंत पोहचत नाही. मी जे वाचतो, ज्या कविता, गोष्टी मला आवडतात त्या गोष्टी लोकांना मी माझ्या लाईव्ह मधुन ऐकवण्याचा प्रयत्न करतो.

ज्या गोष्टी छान आहेत आणि ज्या लोकांपर्यंत पोहचत नाही अश्या कविता मी वाचण्यावर भर देतो. जे चांगलं आहे ते आपल्यासोबत लोकांनी ऐकावं हा उद्देश असतो. याला मिळणारा प्रतिसाद खूप मस्त आहे. कधी कधी गझल, कविता, लेखकांच्या गोष्टी असतात. वेगळवेगळ्या कवींच्या कविता असतात त्यात वेगळा जॉनर असतो, प्रत्येक कवीची लेखकांची लिहिण्याची अनोखी शैली असते ती लोकांनी यांच्यातून ऐकावी हा एक प्रयत्न असतो. लॉक डाऊन नंतर मी हे लाईव्ह चालू ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. यातून लोकांना खूप चांगल्या गोष्टी कळतात, वेगवेगळे लेखक कवी समजतात तर अश्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन. 

  सुशांत रिसबुड 

इन्स्टाग्राम : sitafal_sunny_side_up

https://instagram.com/sitafal_sunny_side_up

मुलाखतनेहा कदम (प्लॅनेट मराठी)

https://planetmarathi.org/ https://planettalent.org/

Share your valuable opinion

%d bloggers like this: