Lockdown Monsoon Special with Marathi Celebrities

मुसळधार पाऊस, चहा आणि भजी! प्रत्येक पावसाळ्यात हे कॉम्बिनेशन मस्ट असतं कारण पावसाळ्यात मस्त लॉंग ड्राईव्ह, ट्रेक किंवा घरच्या खिडकीतून पाऊस अनुभवण्यात एक वेगळीच मज्जा असते.

पावसाळ्यात आपण सगळेच काही न काही प्लॅन्स करत असतो मग ते कुठेतरी फिरण्यासाठी जाण्याचा असो किंवा आपल्या गॅंग सोबत पावसात फुटबॉल खेळण्यासाठी. सगळेच घराबाहेर पडतात.

यंदा कोरोनामुळे पाऊस तुम्ही कसा अनुभवणार आहात? या पावसाळ्यात कुठेतरी जवळचं फिरून येणार की घरी राहून सुरक्षित रित्या पावसाळा एन्जॉय करणार अश्या अनेक प्लॅन्स सोबत तुमच्या काही आवडीच्या सेलिब्रिटी चे “लॉकडाऊन आणि मान्सून प्लॅन्स” बद्दल जाणून घेऊ या..

“पावसाळ्यात नवीन शूट्स”

मला पाऊस प्रचंड आवडतो मुळात पाऊस हा माझा आवडता ऋतू आहे. पहिला पाऊस, पावसातली कॉफी तसचं पावसाळ्यात मला कविता लिहायला आवडतात. पाऊस आणि पावसाबद्दल मला प्रत्येक गोष्ट आवडते. म्हणजे पावसात भिजणं, मॅगी आणि भजी खाणं या गोष्टी मला खूप आवडतात. आल्याचा चहा हा माझ्यासाठी पावसाळ्यात सुख असतं. माझं लहानपण पुण्यात गेलं तर समुद्र आणि पाण्याविषयी खूप अप्रूप वाटतं. लहानपणापासून माझे आई बाबा पावसाळ्यात मला “खडकवासला” ला घेऊन जातात. खास पावसाळ्यात तिथे जाऊन मक्याचं कणीस खाणं, चहा पिणं हा सगळा एक झोन माझा फिक्स असतो. या वेळेस चा पावसाळा नक्कीच वेगळा आहे लॉकडाऊन मुळे माझे काही प्रोजेक्ट आहेत ते पावसाळ्यात शूट होतील आधीच पावसाळा आवडतो आणि पावसाळ्यात शूट करायला मिळणारं तर या लाडक्या गोष्टी पावसाळ्यात करायला मिळतील असं वाटतंय.

अदिती द्रविड (अभिनेत्री)

“घरचा चहा आणि चिल्ल”

पावसाळ्यात मला वर्कआउट करायला खूप जास्त आवडतं कारण त्या महिन्या मध्ये शूट फार नसतात त्यामुळे मला वर्कआऊट आणि स्वतःसाठी वेळ देता येतो. पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुपारी झोपायला मिळतं ते एक वेगळंच सुख आहे. मागच्या वर्षी पासून आम्ही असं ठरवलं की पावसाळ्यात फॉरेन ट्रिप ला जायचं तर मागच्या वर्षी आम्ही फुकेत (phuket) ला फिरायला गेलो होतो, या वर्षी श्रीलंका किंवा बाली ला फिरायला जायचा प्लॅन होता. पावसाळ्यात असं विशेष काही डाएट करत नाही जर वर्कआउट असेल तसंच प्लॅन ठेवतो. पावसाळ्याची बेस्ट आठवण म्हणजे लागीरं झालं जी शूट करत असताना मी आणि राहुल शूट संपलं की महाबळेश्वर आणि पाचगणी ला फिरायला जायचो तर पावसाळ्यात हे खूप जास्त मिस करतोय. मला माझी आवडती लोकं सोबत असतील आणि पाऊस असेल तर मला कुठेही फिरायला आवडेल, असं खास डेस्टिनेशन नाही तर मला माझ्यासोबतची कंपनी फार महत्वाची आहे मग त्यांच्या सोबत घरात चहा घेत सुद्धा पावसाळ्यात मस्त चिल्ल करेन. हा पावसाळा सुरक्षित काळजी घेऊन घालवणार आहे कारण कोरोना मुळे कुठेही फिरता येणार नाही म्हणून यंदा घरात राहून सुरक्षितरित्या पावसाळा घालवणार आहे.

निखिल चव्हाण (अभिनेता)

“पाऊस म्हणजे….”

पावसाळा हा माझा सगळ्यात आवडता ऋतू त्यामुळे पावसात भिजायला, फिरायला खुप आवडतं. दरवर्षी पावसाळ्यात कुठेतरी फिरायला जातो, प्रयोगांच्या वेळी प्रवास करतो तेव्हा प्रवासातला पाऊस अनुभवयाला आवडतो. लोणावळ्याचा घाटातले धबधबे बघायला मिळतात हा प्रवासातला पाऊस अनुभवणं आवडतं. पावसाळ्यात मला एखाद्या ठिकाणी फिरायला जायला तर खूप आवडतं पण पाऊस ही अशी गोष्ट की तुम्ही कुठे ही असा घरातल्या खिडकीतून तो पाऊस तुम्ही नक्की एन्जॉय करू शकता, पावसानंतरच ते एक वातावरण खूप भारी असतं आणि पाऊस आल्यावर कसलं डाएट करायचं ना! अर्थात गरमागरम भजी, वडापाव आणि चहा हे कॉम्बिनेशन बेस्ट. चहा हे माझं आवडतं पेय आहे तर मोठा कप भरून चहा पिण्यापेक्षा मी संख्यात्मक चहा प्यायला जास्त आवडतं. पावसावरच्या कविता, गाणी आणि हा सगळा पावसाळी माहोल अनुभवयाला आवडतं. पाऊस गेल्यावर आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य येत, ढंगांचे रंग बदलतात, वातावरणात गारवा निर्माण होतो तर माझ्यामते पाऊस म्हणजे काय तर पाऊस म्हणजे मजा, पाऊस म्हणजे गारवा, पाऊस म्हणजे मस्ती आणि पाऊस म्हणजे थोडा रोमँटिजिम म्हणून पाऊस हा निसर्गातही हवा आणि प्रत्येकाच्या मनातही हवा. यावर्षी चा पाऊस कोरोनामिश्रित असला तरी आपण घरात बसून त्यांचा आनंद घेऊ या!

संदीप पाठक (अभिनेता)

“बाल्कनी आणि पाऊस”

पावसाळ्यात मी काय करते असं म्हंटल तर जेव्हा लॉकडाऊन नव्हतं तेव्हा शूट, मीटिंग, काम सुरूच होतं. मला पावसाळा हा खूप घरात बसून एन्जॉय करायला आवडतो. बाहेर कुठेतरी जाण्यापेक्षा मला घरात राहून बाल्कनीत बसून पाऊस जास्त अनुभवयाला आवडतो. मान्सून ट्रीप आणि ती पण मुंबईत असेन तर अर्थात मरीन ड्राईव्ह, बँडस्टँड आणि वरळी सी फेस इथे जाऊन पाऊसाची मज्जा अनुभवण्यात वेगळा आनंद असतो पण मला असं वाटतं की खूप सांभाळून आणि सुरक्षित रित्या आपण या मान्सून ट्रिप केल्या पाहिजे. पावसाची माझी एक आठवण म्हणजे आम्ही एका लग्नाला गेलो होतो आणि अचानक पाऊस पडायला लागला आम्ही “जे जे” च्या बाजूला होतो सगळी फॅमिली सोबत होती मग मस्त कार मधून वरळी सी फेस ला जाऊन आम्ही सगळ्यांनी मनोसोक्त पाऊस अनुभवला होता. माझ्या आठवणींमधली ही ट्रिप आहे कारण माझं संपूर्ण कुटूंब तेव्हा माझ्यासोबत होतं. पावसाळ्यातलं डाएट म्हणजे असं सगळेच चहा भजी खातात तर मी चहा पित नाही आणि मला तेलकट खायला आवडत नाही तर चहा आणि भजी हे माझ्यासाठी आऊटऑफबॉक्स आहे. माझा नेहमीच हेल्दी खाण्यावर भर असतो तर पावसाळ्यात असं खास डाएट नसतं पण पावसाळ्यात मी काही गोष्टी टाळते ते म्हणजे पालेभाज्या, काही फळं. मला गवतीचहा खूप आवडतो तर मी पावसाळ्यात नक्की गवतीचहा पिते त्यामुळे आपलं शरीर हे तंदुरुस्त राहतं. पावसाळ्यात काय खायला आवडतं तर मला वर्षाचे १२ महिने मासे खायला आवडतात पण पावसाळ्यात मासे कमी येतात तर मी अगदी विश्वासू लोकांकडून मासे घेते आणि श्रावण संपला की बोंबील मस्त येतात तर मला डाळ भात आणि बोंबील फ्राय खायला प्रचंड आवडतात. मुंबई सोडून मला “लोणवळ्यातला पावसाळा अनुभवयाला आवडतो. तिकडे पावसाळ्यात कहर असतो तर अनेकदा शूटिंग करत असताना मुंबई – पुणे करावं लागायचं तर जाताना लोणावळा क्रॉस करावं लागायचं तिकडचं वातावरण मस्त असायचं. मी आणि माझा स्टाफ कुठेतरी थांबून मस्त कॉफी प्यायचो. लॉक डाऊन मधला पावसाळा माझ्यासाठी काही वेगळा नाही कारण मला घरात बसून पावसाचा आनंद घ्यायला आवडतो फक्त मला नेहमी पावसाळ्यात असं वाटतं जे लोकं गरीब आहेत, चाळीत राहतात किंवा ज्यांना पावसाळ्यात राहण्यासाठी त्रास होतो तर तेव्हा असं वाटतं की देवा गरजे पुरता पाऊस पडू देत असं वाटतं. माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला हवा तेवढा गरजेपुरता पाऊस दे आणि बाकी सगळ्यांना या पावसाळ्याच्या खूप खूप शुभेच्छा! हॅप्पी मान्सून!

क्रांती रेडकर (अभिनेत्री, निर्माती)

मग तुमचे या पावसाळ्याचे काय प्लॅन्स आहेत?? हा लॉकडाऊन मधला पावसाळा तुमच्यासाठी कसा असणार आहे हे सांगायला विसरू नका. यंदाचा पावसाळा हा सुरक्षित रित्या घालवू प्लॅनेट मराठी च्या सगळ्या प्रेक्षकांना पावसाळ्याच्या शुभेच्छा!

नेहा कदम – प्लॅनेट मराठी

http://www.planetmarathimagazine..com

Share your valuable opinion

%d bloggers like this: