रविवारी पहा आपल्या आवडत्या मालिकांचे एक तासांचे विशेष भाग

झी मराठी आपल्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी तत्पर असते आणि त्यांच्या मनोरंजनात कुठेही खंड पडू देत नाही. त्यामुळे येत्या रविवारी देखील प्रेक्षकांना आपल्या लाडक्या मालिकांचे १ तासांचे विशेष भाग पाहायला मिळणार आहे.

मन उडू उडू झालं या मालिकेत सध्या इंद्रा आणि दिपूच्या लग्नाची लगबग दिसतेय. या दोघांच्या लग्नाचा थाट प्रेक्षकांना येत्या रविवारी संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळेल.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काही दिवसांपूर्वीच नेहाच्या पहिल्या नवऱ्याची म्हणजेच अविनाशची एंट्री झाली आहे. अनेकदा नेहा आणि अविनाश एकमेकांसमोर येता येता राहिले आहेत. मालिकेत येणाऱ्या भागात नेहाचा वाढदिवस साजरा होणार आहे. याच दिवशी नेहाला वाढदिवसाचं मोठ आणि धक्कादायक गिफ्ट मिळणार आहे. कारण परीचा ड्रायव्हर काकाच अविनाश असल्याचं सत्य अखेर नेहासमोर येणार आहे. अविनाशला पाहून नेहाची प्रतिक्रिया काय असेल? अविनाशच पॅलेस मध्ये येण्यामागचं कारण उघडकीस येणार का? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका माझी तुझी रेशीमगाठ रविवारी रात्री ८ वाजता.याशिवाय जयवंत वाडकर आणि त्यांच्या सौ यांच्यासोबत  बँड बाजा वरात सेलिब्रिटींचं लग्न जोरात या कार्यक्रमाचा धमाल एपिसोड रंगणार आहे. हा विशेष भाग रविवारी रात्री ९ वाजता प्रसारित होईल.

Share your valuable opinion

%d bloggers like this: