Marathi Celebrities blast on Kangana Ranaut for calling mumbai POK

कृतघ्न कंगना…

मुंबई म्हणजे अनेकांसाठी स्वप्नपूर्तीच एक महत्त्वाचं शहर. विविध राज्यांतून, प्रांतातून लोकं इथे येतात आणि स्वप्ननगरीत स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटतात. बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हे त्यापैकी एक नाव. तिच्या अनेक चित्रपटांबरोबरच सतत विविध कारणांवरून आणि वादग्रस्त वक्तव्यांवरून हे नाव चर्चेत असतं. सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पुन्हा व्यक्त व्हायला सुरुवात केली. बॉलीवूडमधील नेपोटीझम आणि घराणेशाही विरोधातील तिची मतं पाहून तिच्या चाहत्यांसह अनेकांनी तिचं कौतुकं केलं. परंतु, कंगनाने नुकत्याच केलेल्या एका ट्विटमुळे सोशल मिडीयावर तिच्या विरोधात संताप व्यक्त होतोय. जर मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर, तर कंगनाने मुंबईत येऊ नये असं म्हणणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलाखतीचा थोडा भाग ट्विटमध्ये जोडत, ‘संजय राऊत यांनी मला धमकी दिली आहे. मुंबईत परत यायचं नाही असं सांगितलंय. मुंबईच्या गल्लीबोळात स्वातंत्राच्या घोषणा आणि आताशी उघड धमकी? मुंबई मला आता पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटते?’, असं तिने या ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे. पण तिच्या या ट्विटनंतर प्रकरण चांगलचं तापलंय. मुंबईकरांच्या सडेतोड टिकेबरोबरच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी तिच्यावर टीका करत आहेत. आपण ज्या शहरात आलो ज्या शहराने आपल्याला भरभरून दिलं त्याबद्दल अशी कृतघ्न भावना व्यक्त करणाऱ्या कंगनावर मराठी कलाकार आणि पत्रकार मंडळीही चांगलेच संतापलेत. रितेश देशमुख, उर्मिला मातोंडकर, सुबोध भावे, अमृता खानविलकर, रेणुका शहाणे, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी हेमंत ढोमे, क्षिती जोग, केदार शिंदे, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, समीर विध्वंस सह पत्रकार सौमित्र पोटे, दिलीप ठाकूर, ज्ञानदा कदम, प्रेरणा जंगम, नीलिमा कुलकर्णी अशी पत्रकार मंडळीही व्यक्त झाली आहेत.

ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा.जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा. आमचं प्रेम आहे आणि आम्हाला अभिमान आहे मुंबईचा! असं म्हणतं अभिनेता सुबोध भावे व्यक्त झाला आहे.

Dear @KanganaTeam Mumbai is the city where your dream of becoming a Bollywood star has been fulfilled, one would expect you to have some respect for this wonderful city. It’s appalling how you compared Mumbai with POK! उचलली जीभ आणि लावली टाळ्याला 😡 म्हणत अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी कंगनाकडून काही चांगली अपेक्षा ठेवण चूक असल्याचं म्हटलं आहे.

अभिनेता जितेंद्र जोशीनेकृतज्ञता दाखवता येत नसेल तर कृतघ्न तरी होऊ नका.’ असं सांगणारं एक ट्वीट केलं आहे. This city is home ….. it’s where the heart n soul is ….. #ILoveMumbai म्हणत मुंबई प्रतीचं आपलं प्रेम व्यक्त केलंय.

मुंबईमला घडवणारी मुंबई! अनेकांना जगवणारी मुंबई! पोटाची खळगी भरणारी माझी मुंबई! माझा अभिमानस्वाभिमान मुंबई! या देशाची शान माझी मुंबई! (त्या कंगनीला लवकरदवाखानाद्यामहत्त्वनाही!) #ILoveMumbai #माझीमुंबई #मुंबई असं म्हणतं हेमंत ढोमेने आपला राग व्यक्त केलाय.

तर निर्माते दिग्दर्श केदार शिंदे यांनी या मुंबईने कित्येक लोकांना डोक्यावर घेतले आणि कित्येकांना पायदळीही तुडवलं! जन्मभूमी कर्मभूमी आहे ही. आई आहे ही. खाऊन भरल्या ताटात…… #निषेध #kanganavirus

अनेकांनी #Amchimumbai #ILovemumbai #आमचीमुंबई#mymumbai म्हणत कंगनाला प्रत्युत्तर दिल आहे.

http://www.planetmarathi.org

http://www.planetmarathimagazine.com

http://www.planetmarathi.com

Share your valuable opinion

%d bloggers like this: