Marathi stars who pursued there education in engineering

{"subsource":"done_button","uid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1600155268801","source":"share_action_sheet","origin":"unknown","source_sid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1600155368900"}

इंजिनिअर ‘कल्ला’कार

१५ सप्टेंबर हा दिवस भारतभर ‘अभियंता दिन’ म्हणजेच ‘इंजिनिअर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय इंजिनिअर भारतरत्न प्राप्त सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आज इंजिनिअर्स डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगतोय कलाकारांमधील इंजिनिअर विषयी. इंजिनिअरींगच शिक्षण घेतलेलं असलं तरी, त्यांच्यातील अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठीत मालिका, चित्रपट, नाटक आणि वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. इंजिनिअरींग झालेलं असताही केवळ आपली आवड जपता यावी म्हणून ही मंडळी अभिनय क्षेत्राकडे वळली आणि इथेच स्थिरावली. आज जाणून घेऊयात असचं काही अवलिया इंजिनिअर कलाकारांविषयी…

आरोह वेलणकर

आरोहने पुण्याच्या एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग म्हणून मेकॅनिकल इंजिनिअरींगच शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेजमध्ये असताना आरोह एकांकिकांमध्ये काम करतं असे. एकांकिकांमध्ये काम करत असताना त्याला अभिनयासाठी अनेक बक्षिस ही मिळाली. ‘रेगे’ चित्रपटातून त्याने सिनेविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर विविध चित्रपट, नाटक, मालिका यांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचा लाडका कलाकार बनला आहे. लोकप्रिय कार्यक्रम बिग-बॉसमध्येही आरोह सहभागी झाला होता. अभिनय क्षेत्रात काम करता असला तरी घरच्या बिझनेसच्या माध्यमातून त्याचा इंजिनिअरींगशी संबंध कायम आहे. लवकरच तो ‘लाडाची मी लेक गं!’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहे.

गौतमी देशपांडे

पुण्याच्या व्हीआयआयटी कॉलेजमधून गौतमीचं मेकॅनिकल इंजिनिअरींग विषयात पदवीपर्यंतच शिक्षण झाला. २०१४ मध्ये पदवी मिळवल्यानंतर तिने एखा नामांकित कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. पण, कॉलेजमध्ये असताना एकांकिकामध्ये केलेल्या कामामुळे तिला अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. नोकरी करत असताना तिने दोन चित्रपटांमधून काम केलं. इंजिनिअरींग हे कायम माझ्या सोबत राहणारं आहे असं म्हणतं तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सध्या ती ‘माझा होशील ना..’ मालिकेत सई ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. शिवाय, गौतमी उत्तम गायिका आहे.

शशांक केतकर

शशांकने मास्टर्स ऑफ इंजिनिअरींग मॅनेजमेंटचं शिक्षण सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे पूर्ण झालं. सिडनीमध्ये असताना तो ड्युटी मॅनेजर म्हणून तिथल्या स्विमिंग स्कूलमध्ये काम करतं होता. शिवाय, तो स्वतः एक उत्तम स्विमर आहे. सिडनीमध्ये शिक्षणासाठी गेला असता, तिथल्या मराठी नाटकं आणि संगीत कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. भारतात परतल्यावर त्याने अभिनय क्षेत्रात काम करण्याचं ठरवत पुण्यातील सुदर्शन रंगमंचच्या माध्यमातून त्याचं पूर्णविराम हे पहिलं नाटकं केलं. त्यानंतर छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधून काम करण्यास त्याने सुरुवात केली. २०१३ ला ‘होणारं सून मी ह्या घरची’ या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचा लाडका श्री बनला. त्यानंतर गोष्ट तशी गंमतीची त्याचं हे नाटकं खूप गाजतंय. वनवे तिकीट, वाडा, आरोन, ३१ दिवस अशा चित्रपटांबरोबरच ‘प्लॅनेट मराठी’ निर्मित आगामी ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातही तो महत्वाच्या भूमिकेत आहे.

सागर कारंडे

त्याच्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगवर आपण भरभरून हसतो तो अभिनेता सागर कारंडे ही इंजिनिअर आहे. कम्प्युटर इंजिनिअरींगचं शिक्षण झाल्यानंतर २००२ साली त्याने अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर एका नाटकाच्या ग्रुपसोबत तो काम करू लागला आणि कालांतराने अभिनय क्षेत्रात काम करण्याचं स्वप्न घेऊन तो मुंबईत आला. अभिनयाबरोबरच, कॉमेडी आणि मिमिक्री हा त्याचा हातखंड. ‘फु बाई फु’ च्या विविध पर्वांमधून प्रेक्षकांना दिलखुलास हसवणारा सागर सध्या चला हवा येऊद्या या तुफान कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. शिवाय, विविध चित्रपट, मालिका, नाटकं आणि वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं अविराज मनोरंजन करत असतो.

ओमप्रकाश शिंदे

२००९ मध्ये सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमधून ओमप्रकाशने मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी मिळवली. त्यानंतर काही काळ त्याने नामांकित कंपनीमध्ये नोकरीही केली. पण अभिनयाचा किडा शांत बसू देतं नव्हता. अखेर आवडी पुढे निवड हरली आणि तो पूर्णवेळ अभिनय क्षेत्राकडे वळला. आसक्त कलामंचासोबत काम करताना ‘पत्र निमित्तमात्र’ आणि F1/105 या नाटकात काम केलं. २०१५ मध्ये मुंबईत येऊन त्याने मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘का रे दुरावा…’ या प्रसिद्ध मालिकेतील त्याने साकारलेला साईप्रसाद सगळ्यांना प्रचंड आवडला. त्यानंतर ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत तो डॉ. विक्रांत दळवी या प्रमुख भूमिकेतही तो झळकला. शिवाय कान्हा, डबल सीट यांसारख्या चित्रपटांमध्येही त्याने काम केलं आहे.

संकलन : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)

1 thought on “Marathi stars who pursued there education in engineering

Share your valuable opinion

%d bloggers like this: