MOTHER’S DAY SPECIAL

आपलं आणि आपल्या आईच नातं काही खास असतं. या मातृदिनी बघूया काही खास गोष्टी!
मराठी इंडस्ट्रीतील आई मुलांच्या नात्यांची काही हटके कहाणी. 
मराठी इंडस्ट्री मधील काही खास मायलेकी आणि आई-मुलांच्या जोड्यांबद्दल जाणून घेऊ या..

अभिनय आणि प्रिया बेर्डे… [रंपाट मध्ये एकत्र भूमिका]
     अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे दोघे एकाच चित्रपटात आपल्याला बघायला मिळणार आहेत. हि आई मुलाची जोडी कितपत प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या आधी अभिनय याने “ती सध्या काय करते” या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय. पण मुलगा आणि आई आता एका नव्या चित्रपटात काय कल्ला करणार हे बघायला हवं. 
 सुपर कूल आई [सखी आणि शुभांगी गोखले]    मराठी  इंडस्ट्रीत सुपर कूल आई मुलगी अशी अनोखी ओळख जपणारी हि जोडी नेमकी कोण हे तुम्हाला माहित असेलचं.  सखी गोखले आणि शुभांगी गोखले या दोघी मायलेकींची गोष्ट काही औरच आहे. यांच्या दोघीच्या स्टाईलची आणि अनेक हटके फोटो पोज च्या चर्चा अवघ्या इंडस्ट्रीत चालूच असतात.


मालिकेत एकत्र[सिद्धार्थ आणि सीमा चांदेकर]   मराठी इंडस्ट्री मधला चॉकलेट बॉय अर्थात सिद्धार्थ सीमा चांदेकर. सिद्धार्थ आणि त्याची आई सीमा चांदेकर एका नव्या मालिकेतून [जिवलगा] आई-मुलाचं नातं साकारताना आपल्याला दिसत आहेत. खऱ्या आयुष्यात हे नातं जेवढ्या सहजतेने साकारणाऱ्या या आई मुलाची टेलिव्हिजन क्षेत्रात सुद्धा तितकीचं कमालीची केमेस्ट्री पडद्यावर सुद्धा दिसत आहे.


अभिनय आणि निर्मिती सावंत…     मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील कॉमेडी क्विन निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत याने देखील मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलंय. अनेक मालिका आणि चित्रपटांतून तो आपल्या भेटीला येतो. मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांतून आपलं निखळ मनोरंजन करणाऱ्या निर्मिती सावंत यांचा मुलगा देखील या इंडस्ट्रीत प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. 


श्रिया आणि सुप्रिया पिळगांवकर…      मिर्जापूर सारख्या गाजलेल्या वेब सिरीज मधून नावारूपास आलेली नवखी अभिनेत्री श्रिया पिळगांवकर. हिंदी , मराठीचित्रपट आणि मालिकांतून काम करणाऱ्या सुप्रिया पिळगांवकर यांची सुकन्या श्रिया. श्रिया आणि  सुप्रिया यांनी आजवर अनेक वेब एपिसोड मध्ये एकत्र काम केलं आहे. या मायलेकींनी मराठीच्या सोबतीने हिंदीत सुद्धा आपल्या कामाची कलाकारी दाखवली आहे. 

@प्लॅनेट मराठी

Share your valuable opinion

%d bloggers like this: