Mumbai police is now drones to monitor the situation during lockdown.

मुंबई पोलिसांची “ड्रोन” दृष्टी..

 लॉक डाऊन मध्ये तुम्ही जर घराबाहेर पडत असाल तर जरा जपून… कारण आता मुंबई पोलीस तुमच्यावर “ड्रोन” वरून करडी नजर ठेवणार आहेत. 


या ड्रोन मधून कुठल्या ठिकाणी जास्त वर्दळ आहे, किती गर्दी आहे ही सर्व माहिती या एरियल ड्रोन मधून पोलिसांना मिळते आहे. जर तुम्ही या लॉक डाऊन मध्ये बाहेर फिरत असाल तर हा ड्रोन तुमच्यावर करडी नजर ठेवून आहे हे विसरू नका. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लॉक डाऊन वाढवण्यात आलंय, तर या लॉक डाऊन दरम्यान लोकांनी घरा बाहेर पडू नये असं आव्हान वारंवार मुंबई पोलिसांकडून केलं जातंय पण काही ठिकाणी लोक सर्रास पणे बाहेर फिरतात. या सगळ्या गोष्टीवर आता ड्रोन च्या नजरेतून लक्ष ठेवण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी मदत करण्यासाठी अनेक “ड्रोनकर” पुढे आले आहेत. आपण याच ड्रोनकर मंडळींकडून कश्या प्रकारे हे काम केलं जातंय हे  जाणून घेऊ या..


“देशसेवेसाठी आम्ही हे काम करतो” 

     ड्रोनचा खूप चांगला वापर होतो. आता सध्या आम्ही मुंबई पोलिसांसाठी काम करतो आहोत. आपल्याकडे आलेल्या कोरोना सारख्या संकटात त्यांना आम्ही मदत म्हणून हे काम करतोय. यात आम्ही ड्रोन च्या मदतीने लोकांवर लक्ष ठेवतो आहे. कुठे लोक जास्त जमतायत का, कुठे सोशल डिस्ट्ननसिंग च उल्लंघन होतंय का यावर लक्ष ठेवायचं. लोक त्यांच्या गच्चीवर येऊन खेळतात तर या सगळ्या गोष्टीवर आम्ही ड्रोन च्या साहाय्याने लक्ष ठेवतो. पोलीसांना ड्रोन मुळे याचे लाइव्ह अपडेट्स देण्याचं काम आम्ही करतो. आम्ही जे शूट करतो त्याचे सगळे अपडेट्स लाईव्ह मेन कंट्रोल रूम ला जातात आणि बॅकअप आम्ही गूगल ड्राईव्ह वरून लगेच पाठवतो जेणेकरून कुठे गर्दी होत असेल तर तिथे लगेच पोलिस कारवाई करू शकतात. सध्या आमची ५० ते ६० ड्रोनकारांची टीम मुंबई पोलिसांसाठी काम करत आहे. यात बऱ्याच वेळा स्थानिक रहिवासी शूट  करायला देत नाही तेव्हा लोकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं हीच आमची इच्छा असते. आपल्या सगळ्यांना घरात बसायचं नाही आहे, सगळ्यांना यातून बाहेर पडायचं आहे तर मी सगळ्यांना विनंती करतो की मी आपल्या भल्या साठी काम करतो तर तुम्ही घराबाहेर पडू नका. आम्ही हे सगळं काम आपल्या मुंबई पोलिसांसाठी आणि आपल्या देशासाठी करतोय.
   सौरभ भट्टीकर (ड्रोनकर) 

“तंत्रज्ञानाचा अनोखा वापर”  

     कोरोना मुळे संपूर्ण महाराष्ट्रात लॉक डाऊन झालंय, या सगळया परिस्थितीत पोलीसांनी सगळीकडे कर्फ्यु लावला, नाकाबंदी केली पण या सगळ्यात काही महत्त्वाचे रस्ते सोडून काही भाग आहेत जसं की काही अगदी गल्ली बोळ्यात असलेल्या झोपडपट्ट्या असतील जिथे पोलिसांना पटकन पोहचता येत नाही तर अश्या वेळी ड्रोन च्या सहाय्याने या गल्लीबोळ्यात किंवा झोपडपट्टीच्या भागात ड्रोन मधून नजर ठेवली जाते. ड्रोन फेडरेशन इंडिया नावाच्या कंपनी ने मुंबईत ५० ते ६० ड्रोन पायलस्टची टीम एकत्र येऊन मुंबई पोलिसांसाठी काम करत आहे. यांच्यामध्ये मुंबई पोलिसांच या साठी कौतुक करावंस वाटत कारण त्यांनी या नव्या टेक्नॉलॉजी च स्वागत केलंय. आम्हाला शूट करताना फक्त जी काळजी आम्ही ड्रोन शूट करताना घेतो तिचं काळजी इथे घ्यावी लागते. हे काम आम्ही आमच्या राहत्या ठिकाणावरून करतो. आम्हाला आमच्या घराच्या जवळून हे काम करायचं. त्यामुळे याला वेगळा असा काही खर्च येत नाही, आम्हाला फक्त जो काही ड्रोन चा मेन्टेनस असतो त्याची काळजी घ्यावी लागते. सर्वजण स्वेइच्छिने यात सहभागी होऊन देशासाठी आणि मुंबई पोलिसांसाठी काम करत आहेत. आम्ही हा सगळा डेटा पोलिसांना पाठवतो त्यामुळे त्यांना लगेच यांची माहिती मिळते, जेणेकरून पोलीस लगेच त्या ठिकाणी पोहचतात. धारावी सारख्या झोपडपट्टी मध्ये पोलिसांनी आत मध्ये पोहचता येत नाही तर ड्रोनची खूप मदत होते. प्रत्येक ड्रोन शूट करणाऱ्याला ३ ते ४ मीटर पर्यन्त जाऊन तो एरिया कव्हर करता येतो आम्ही आमच्या बिल्डिंगच्या गच्चीवर जाऊन हे काम करतो. दिवसातून २ वेळा जेव्हा लोक मॉर्निंग वॉकला किंवा संध्याकाळी भाजी आणायला जातात अश्या वेळी आम्ही ड्रोन फिरवतो. जिथे गर्दी आहे, सोशल डिस्ट्ननसिंग होत नाही अश्या ठिकाणी आम्ही ड्रोन जवळ नेऊन ड्रोन मधून त्यांचे फोटो काढतो त्यामुळे पोलिसांनी यांचे लाईव्ह अपडेट्स मिळतात. मुंबई पोलिसांनी ड्रोन सारख्या टेक्नॉलॉजी चा वापर लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी करत आहेत. भविष्यात सुद्धा अश्या या तंत्रज्ञानाचा चांगला वापर करता येईल. पोलिसांच खूप चांगलं सहकार्य या साठी होतंय आणि या तंत्रज्ञानाचा वेगळ्या प्रकारे वापर होतोय. 
  पार्थ चव्हाण (ड्रोनकर) 

     मुंबई पोलिसांनी या नव्या तंत्रज्ञानाचं स्वागत केलंय आणि नव्या पिढी सोबत त्यांचा या निमित्ताने एक वेगळं नातं तयार होतंय. या सगळ्या ड्रोनकर मंडळीच आणि मुंबई पोलिसांच यासाठी विशेष कौतुक आहे. प्लॅनेट मराठी कडून  मुंबई पोलीस आणि या सगळ्या ड्रोन कर मंडळी च्या कामाला आमचा मनाचा सलाम! 
घरीच रहा, कोरोनावर मात करा….. 


मुलाखत : नेहा कदम (प्लेनेट मराठी) 

Share your valuable opinion

%d bloggers like this: