National Handloom Day

आज “जागतिक हातमाग” दिवसाच्या निमित्ताने “वोकल फॉर लोकल” चा नारा लक्षात ठेवून पुढच्या वेळी आपल्या मातीतल्या कारागिरांना थोडं तरी बळ देऊया.

Golden Waves Paithani Factory (Yeola)

      मार्च महिन्यात सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे पैठणी कारागिरांचं काम पूर्णतः ठप्प झालं. पैठणीसाठी येणारं सगळं साहित्य हे बाहेरच्या वेगवेगळ्या राज्यातून येतं आणि लॉकडाऊनमुळे सगळ्या जिल्ह्यांतर्गत आयाती – निर्यातीवर बंधनं आल्याने पैठणीसाठी कोणतंच रॉ साहित्य मिळणं बंद झालं होतं. अश्या काळात सगळ्या हातावर पोट असलेल्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली. पैठणी हे जरी महाराष्ट्राचं महावस्त्र असलं तरी ह्या साडीची मागणी असलेले खास अस्सल पैठणीची मागणी करणारे शौकीन हे भारतभरात सर्वत्र आहेत. येवला ही पैठणीची खाण आहे. येवल्याला असलेल्या हातमाग पैठणी उद्योगांना कोरोना वायरस आणि लॉकडाऊनच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करायला लागला. 

पैठणी ही प्रत्येक स्त्रीच्या कपाटात असावी असं तिचं स्वप्न असतं. खुद्द शांता शेळके सुद्धा ह्या पैठणीबद्दल “नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी” असं वर्णन करतात. निळे, जांभळे गर्द रंग, जरतारीचा पदर, पदरावर मोर, पक्षी, कमळ ह्यांचं नक्षीकाम, बारीक नक्षीचा ठसठशीत काठ, ऊन-सावलीचे रंग अश्या अनेक अंगानी एखादी पैठणी नटत असते. लग्नसराईत दिमाखात पैठणी मिरवणारी नवरी, करवली, तिची आई, सासू कोणीही असो, प्रत्येकाचं सौंदर्य खुलवणारी साडी म्हणजे अर्थात पैठणी. पण सध्याच्या ह्या लॉकडाऊनच्या काळात हातमाग उद्योगांना जी झळ सोसावी लागली त्यात पैठणीचं तयार होणं कुठेतरी हरवलं.

साधारण ५०० रुपयापासून ते लाखाच्या घरात किंमत असलेली प्रत्येक पैठणी तिच्या तिच्या अनेक वैशिट्यांमुळे प्रत्येकाच्या मनात घर करते पण ह्याच पैठणीचे भाव सध्या कैक पटीने घसरताना दिसत आहेत. लॉकडाऊनच्या सुरवातीला तयार पैठण्यांच्या विक्रीतून कामगारांचा गुजरबसर होत होता, पण विक्रीसाठी असलेल्या पैठण्यांची संख्या कमी होत गेली तशी व्यापाऱ्यांनी पैठणी घेणं बंद केलं. काही वेळेस तर कारागिरांना आहे त्या भावाला पैठणी विकायला लागत होती. घडणावळीच्या खर्चाशिवाय काहीच न मिळत व्यापारी सांगेल त्या भावाला पैठणी विकायला लागत होती. लग्नसराईत मानाचं स्थान असलेल्या पैठणीची ह्या लग्नसराईत म्हणजे पुरती पंचाईत झाली होती. जिथे लग्नचं करता येणं शक्य नव्हतं तिथे लोकं लग्नाचा बस्ताच बांधणार तरी कसा?

आपल्या घरात असलेली अगदी छोटीशी गोष्ट सुद्धा कोणीतरी बनवलेली असते. घरातलं फर्निचर, दागिने ही कोणीतरी घडवलेले असतात. मान्य आहे सध्याच्या काळात अश्या काही चैनीच्या गोष्टींवर पैसे खर्च करणं आवश्यक नाहीये आणि शक्य ही नाहीये. पण किमान पुढच्या वेळी एखादी अस्सल, आपल्या मातीत, आपल्या कारागिरांनी बनवलेली गोष्ट विकत घ्यायचा विचार मनात आला तर त्या व्यक्तीच्या कष्टाचा मान ठेऊन तरी त्यांना मोबदला देऊयात.

अतुल माळोकर – पैठणीवाले (येवला)
https://instagram.com/paithaniwale

“लॉकडाऊनमुळे पैठणी कारागिरांना आणि विक्री करणाऱ्या मंडळींना खर्च भागवणं कठीण होऊन बसलं होतं. आमचा काही कच्चा माल हा बाहेरच्या राज्यातून येतो.तो येणं बंद झालं. आहेत त्या गोष्टींचा वापर करून केलेल्या पैठण्या सोडता काहीच साधनं नसल्याने आणि ग्राहकांची मागणी कमी झाल्याने अगदीच कमी भावात आम्हाला पैठणी विकायला लागत होती. पैठणी ही पूर्णपणे हातमागावर बनत असल्याने काही पैठण्यांना तयार व्हायला २ ते ३ महिनेही जातात पण एवढं साधन ही उपलब्ध होत नव्हतं.पैठणीवाले (येवला)

अस्मिता गायकवाड – गोल्डन वेव्ज (येवला)
https://instagram.com/goldenweavespaithani

“लग्नसराईच्या मोसमात लॉकडाऊन आल्याने अचानक आवक कमी झाली. एरवी सगळ्यांची पहिली आवड असलेली पैठणी बनवणं सुद्धा कठीण झालं होतं. एरवी हा सिजन खऱ्या अर्थाने आमचा कमाईचा काळ असतो. पण त्याच काळात महामारीने सगळे मार्ग ठप्प करून टाकले होते.गोल्डन वेव्ज (येवला)स्वप्नांचा नक्षीदार प्रवास उलगडणारा ‘गोष्ट एका पैठणीची’ लवकरचं तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.

रसिका नानलप्लॅनेट मराठी

Share your valuable opinion

%d bloggers like this: