‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतून अनिता दातेचं पुनरागमन

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनिता दाते हिचा हार घातलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. या फोटो सोबत ‘जो आवडतो सर्वांना’ असं कॅप्शन देखील देण्यात आलं आहे, या फोटोमुळे तिचे चाहतेच नाही तर इतर सेलिब्रिटींना देखील प्रश्न पडलाय की, नेमका या फोटो मागचा अर्थ काय?. हा फोटो शेअर करण्यामागचं कारण नुकतंच प्रेक्षकांना कळलं. नुकतंच एका नवीन मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीवर सादर करण्यात आला. नवा गडी नवं राज्य असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेद्वारे अनिता दाते पुन्हा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

या मालिकेत अनिता दाते हिचं पात्र या जगात नसल्याचे दाखवण्यात आले आहे. पण तरीही एका खोडकर भूमिकेतून ती पुन्हा एंट्री घेत आहे. या मालिकेत अनिता दाते रमाची भूमिका सादर करणार असून, आनंदीच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील दिसणार आहे. पल्लवी पाटील या मालिकेतुन टीव्ही माध्यमात पदार्पण करतेय. तर रमाच्या मुलीच्या भूमिकेत सायशा भोईर दिसणार आहे. अभिनेता कश्यप परुळेकर देखील या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसेल.  

माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेनंतर २ वर्षांनी प्रेक्षकांना त्यांची आवडती अभिनेत्री अनिता दाते हिला पुन्हा एकदा ‘नवा गाडी नवं राज्य’ या मालिकेतून एका नवीन भूमिकेत पाहायला मिळेल.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना अनिता म्हणाली, “माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील राधिका नंतर आता रमा या नवीन भूमिकेतून मी प्रेक्षकांच्या भेटीस येतेय याचा मला अतिशय आनंद आहे. रमा हे पात्र मालिकेत हयात नाही आहे पण तरी देखल या पात्रामुळे मालिकेला एक रंजक वळण येणार आहे. त्यामुळे हि रमा साकारताना मला खूप मजा येतेय. प्रेक्षकांना राधिका सारखीच रमा देखील खूप आवडेल अशी मला खात्री आहे.”

Share your valuable opinion

%d bloggers like this: