Planet Marathi Navratri Special – Deepika Mhatre (Stand-up Comedian)

‘ती’चा प्रवास… : २ महिला स्टॅडअप कॉमेडीयन दिपिका म्हात्रे

घरकाम करणाऱ्या, रेल्वेमध्ये क्लिप, पिना, टिकल्या विकणाऱ्या दिपिका आज एक यशस्वी स्टॅडअप कॉमेडीयन आहे. “घरकाम करताना हवीहवीशी घरकाम करणारी बाई, इतर वेळी माणूस म्हणूनही तिचा राग केला जायचा, तिची लाज वाटायची. एवढंच काय तर त्यांच्या बसायच्या ठिकणी आम्ही घरकाम करणाऱ्या बायांनी बसणं काहीं मॅडमना आवडतं नाही. पण, माझी वेगळी बाजू मला थेट त्यांच्या हृदयात जागा मिळवून देते.” ‘प्लॅनेट मराठी’च्या नवरात्री विशेष मालिकेच्या निमित्तान स्टॅडअप कॉमेडीयन दिपिका म्हात्रे सांगतेय तिचा भन्नाट प्रवास.

दिपिका म्हात्रे हे नावं आता जवळजवळ मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकालाच परिचित झालं आहे. अनेकांना त्या आपल्यातील एक वाटतात. प्रभादेवीतल्या चाळीत जन्म झालेली दिपिका तुमच्या आमच्या सारखीचं एक सर्वसामान्य स्त्री. वडील सरकारी अधिकारी, आईची वडापावची गाडी असं हे सुखी कुटुंब. लहानपणापासूनच मुळात खोडकर आणि मस्ती-खोर असणाऱ्या दिपिका तेव्हाही समंजस होत्या. कालांतराने लग्न झालं, चारकोपला एकत्र कुटुंब पद्धतीत दिपिका यांचा सासरचा प्रवास सुरु झाला. एकत्रीत कुटुंबातून वेगळ होतं, दिपिका यांनी पती आणि मुलीसह आयुष्याचा वेगळा प्रवास सुरु करण्याचं ठरवलं. दिपिका विरारला रहायला गेल्या. त्यानंतरची काही वर्ष अगदी अलबेल सुरु असताना, माशी शिंकली. दिपिका यांच्या पतींना प्रकृतीचा विचार करता कामासाठी प्रवास करण अशक्य होतं. कुटुंबाची परिस्थिती हालाखीची बनतं होती. त्यामुळे घरगाडा चालवण्यासाठी दीपक यांनी कंबर कसली.

एजन्सीच्या मदतीने घरकाम मिळवत, एक दिवसाच्या बाळापासून ते थेट शंभरीच्या आजी-आजोबांना सांभाळून घरकाम करायला दिपिका यांनी सुरुवात केली. परिस्थितीनुसार पडेल ते काम करायला सुरुवात झाली. घरोघरी जाऊन लोणचं पापड विकणं, भाज्या विकणं, कामावर जाता येत प्रवासातल्या वेळेत रेल्वेच्या डब्यांमधून धावपळ करतं टिकल्या, पीनं, कंगवे विकणं असं काम सुरु झालं. यासाठी नालासोपारा-चर्चगेट-मालाड असा रोजचा प्रवास झाला. सकाळी नालासोपाराहून ट्रेन पकडायची चर्चगेटपर्यंत सामान विकायचं, पुन्हा चर्चगेट ते मालाड प्रवास करून घरकाम करण्यासाठी धावायचं. अशी तारेवरची कसरत सुरु झाली. “मी मेहनत करतं होते, पण त्याचा मोबदला फार कमी होता”, असं दिपिका सांगतात.

एका महिला दिनी, दिपिका घरकाम करत असलेल्या बाईनी, आपल्या घरी कामाला येणाऱ्या महिलांना घेऊन हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं. त्यांनी ही कल्पना त्यांच्या मैत्रीणीना सांगितली आणि अखेर घरकाम करणाऱ्या या हाताना एक दिवस का होईना आराम मिळाला. या कार्यक्रमात दिपिका यांनी पहिल्यांदा स्टॅडअप कॉमेडी केली. आपल्या रोजच्या कामातील मजेशीर किस्से दिपिका आपल्या सदरीकरणात मांडत होत्या आणि ते सगळ्यांना आवडतं होतं. त्याचं कार्यक्रमात आलेल्या एका नामांकित पेपरच्या पत्रकार मैत्रिणीला दिपिका यांचं सादरीकरण आवडलं आणि दुसऱ्या दिवशी दिपिका पेपरमध्ये झळकल्या. त्यानंतर अदिती मित्तल या स्टॅडअप कॉमेडीयनकडून मार्गदर्शन मिळत गेलं आणि दिपिका नावारूपास आल्या.

काम आणि घर सांभाळण्यासाठी धडपड करणाऱ्या दिपिका आता स्टॅडअप कॉमेडी क्षेत्रात स्थिरावली आहे. आधी जेवणं बनून लोकांना खुश करणाऱ्या त्या आता भन्नाट जोक्स करतं अवघ्या जगाला खळखळून हसवतात. आता त्यांनी घरकाम थांबवलंय, पण त्यांचा खडतर प्रवास प्रेरणादायी आहे.

काम करण्यासाठी हवीहवीशी वाटणारी घरकाम करणारी मावशी इतरवेळी माणूस म्हणूनही काहींना आवडतं नव्हती पण आज दिपिकाची वेगळी ओळख त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर घेऊन गेली आहे.

मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: