Planet Marathi Navratri Special : Jayanti Waghdhare (Entertainment Correspondent and Anchor)

‘ती’चा प्रवास… : ४ (वृत्तनिवेदिका जयंती वाघधरे)

हाय फ्रेंड्स… म्हणतं मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील मजेशीर किस्से, खुमासदार मुलाखती, सिक्रेट्स आणि अशी बरीच गपशप आपल्यापर्यंत पोहचवणारी वृत्तनिवेदिका म्हणजे जयंती वाघधरे. एरव्ही सिने तारे तारकांच्या आगामी चित्रपट आणि त्यांच्या आयुष्याबद्दल दिलखुलास गप्पा मारणारी जयंती ‘प्लॅनेट मराठी’च्या नवरात्री विशेष मालिकेच्या निमित्तान स्वतःच्या आयुष्यावर ‘स्पॉट लाईट’ मारतं भन्नाट फ्लॅशबॅक आपल्या समोर मांडतेय.

“हाय… फ्रेंड्स, मी जयंती वाघधरे ‘स्पॉट लाईट’मध्ये तुम्हा सगळ्याचं स्वागत…”, हे बोल आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आणि त्यामागचा आवाज मनोरंजन विश्वातील मसालेदार खबरी सांगणारा. सध्या झी चोवीस तास या प्रसिद्ध वृत्त वाहिनीच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणारी जयंती लहानपणापासून तेवढीच आत्मविश्वासाने परिपूर्ण असल्याचं सांगते. लहानपणापासूनच घरी खेळीमेळीच आणि मनमोकळ वातावरण, त्यामुळे शिक्षण किंवा करिअर बाबत दडपण असण्याचा प्रश्नचं नव्हता. अभ्यासात जेमतेम हुशार असली तरी, स्वतःवरचा विश्वास हा जयंतीला खूप काही देऊन गेला.

आई गुजराती आणि बाबा मराठी त्यामुळे घरी हिंदी भाषा बोलण्याची सवय होती. पण मित्र-परिवारामुळे मराठीबद्दलही तेवढंच प्रेम आणि जिव्हाळा. स्व‍च्छंदी स्वभावाच्या जयंतीला आपण पुढे जाऊन काय करणारं याबद्दल पुसटशीही कल्पना नव्हती. तिची बोलण्याची पद्धत आणि आत्मविश्वास पाहून घरी आलेल्या एका परिचितांकडून, “तू, पत्रकार का नाही होत…”असं विचारलं. अगदी सर्वसामान्य मुला-मुलींसारखा विचार करतं जयंतीने ही गोष्ट मनावर घेऊन मुंबईच्या के. जे सोमय्या कॉलेजमध्ये पत्रकारितेचं शिक्षण (जर्नालिझम) साठी प्रवेश घेतला. त्यात पदव्योत्तर झाल्यानंतर, खरी धावपळ सुरु झाली. त्यात मार्गदर्शन करणारही कोणी नव्हतं. अखेर एका वाहिनीसाठी काम करण्याची संधी तिला मिळाली. जाहिरात, वृत्तनिवेदन असं सगळ करत असताना ‘मी मराठी’ नावाच्या एका वाहिनीसाठी जयंतीने काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर झी चोवीस तास यावाहिनीसाठी जयंती काम करू लागली आणि आज दहा वर्षं ती या वाहिनीवरील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक आहे.

पत्रकार म्हणून काम करायचं म्हणजे कामासाठी वेळेची अनिश्चितता ठरलेली. त्यात मुलगी म्हणून घरून वेळेची बंधन, असा काही प्रकार जयंतीच्या वाट्याला आलाच नाही असं ती आवर्जून सांगते. सुरुवातीपासून सकारात्मकता आणि प्रत्येक गोष्टीत पाठीशी ठामपणे उभे राहणारे पालक जयंतीच्या या प्रवासातही तिचा मोठा आधार असल्याचं ती सांगते. मनोरंजन विश्वातील बातम्यांची खडानखडा काही असण्यासाठी वेळ ही लक्षात धरण्याची बाजू नसतेच. त्यामुळे, “मी आजवर चार वेळा बॉलीवूडचा किंग खान शाहरुखची मुलाखत घेतली आणि त्याची प्रत्येक मुलाखत ही भल्या पहाटे तीन-चार वाजताही घेतली आहे.”, असं जयंती सांगते. कधी एकटी ट्रेनने प्रवास करेन कि नाही अशा विचारात जगणाऱ्या जयंतीला या क्षेत्रामुळे अनेक गोष्टी शिकता आल्याचंही तिने सांगितलं.

तेरा-चौदा वर्ष या क्षेत्रात काम करताना महिला सहकाऱ्यांच्या बरोबरच पुरुष सहकारी मित्रांकडून मिळालेल्या उत्तम सहकार्यामुळे आजवर अनेक गोष्टी करणं शक्य झाल्याचंही ती म्हणते. शिवाय, मनोरंजन विश्वातील पत्रकार म्हणून काम करणाऱ्या महिला सर्वाधिक असल्यामुळे, खरंतर ही एक जमेची आणि प्रेरणादायी बाजू असल्याचं जयंतीने सांगितलं.

पत्रकार म्हणून काम करत असताना तुम्हाला नीटनेटक, संयमी आणि प्रसंगी कणखर असावं लागतं, ही सगळी रूपं एक स्त्रीचं लिलया पेलवू शकते, कदाचित म्हणूनच महिला पत्रकार असल्याची आणि हे माझ्यासाठी योग्य क्षेत्र असल्याचं मला नेहमी वाटतं असं जयंती सांगते.

मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: