Planet Marathi Navratri Special : Shweta Shinde (Actress and Producer)

‘ती’चा प्रवास… : ७ (अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे)

मालिका, चित्रपट, अनेक रिअलिटी शो मधून झळकलेला चेहरा आता चक्क पडद्यामागे अख्या टीमची जबाबदारी लिलया पेलतंय. ‘लागीर झालं जी’ मालिकेच्या निमित्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलेल्या श्वेता शिंदे आज अनेक नामवंत निर्मात्यांपैकी एक आहेत. ‘प्लॅनेट मराठी’च्या नवरात्री विशेष मालिकेच्या निमित्तान जाणून घेऊया श्वेता शिंदे यांच्या याचं प्रवासाविषयी….

श्वेता शिंदे म्हणून हे नाव अभिनेत्री म्हणून अनेकांना परिचयाच होतं. विविध मालिका, चित्रपट, डान्स शो यांमधून झळकणारा हा चेहरा गेल्या काही वर्षांपासून निर्मिती क्षेत्रातही काम करतोय, नव्हे यशस्वीही होतोय. अभिनय असो किंवा निर्मिती या दोन्ही क्षेत्रात योगायोगाने आलेल्या श्वेता आज अनेक नामवंत अभिनेत्री आणि निर्मात्यांपैकी एक आहेत. दहावीपर्यंतच शिक्षण साताऱ्यात झाल्यानंतर मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केल्याचं सांगतात. एक दिवशी सहजच डोक्यात एक कथा आली ती कथा एका नामांकित वाहिनीला ऐकवली आणि तिथूनच माझ्यातील निर्मातीचा प्रवास सुरु झाला, असं श्वेता म्हणतात.

कलाकारांचं पडद्यामागचं आयुष्य फार वेगळ असतं. त्यांच्यातही स्पर्धा चालतात. स्त्री-पुरुषांमधली दरी तिथेही अंशात पाहायला मिळते. पण, गेली अनेक वर्ष अभिनेत्री आणि आता निर्माती अशा दोनही भूमिकांमध्ये वावरताना श्वेता यांना असा कटू अनुभव कधीच आला नाही असं त्या सांगतात. त्यांच्या म्हणण्यांनुसार त्यांच्या “बाईच्या शरीरात पुरुषी आत्मा” असा त्यांचा स्वभाव असल्यामुळे हे असे प्रकार त्यांच्या वाट्यालाच आले नसल्याचं त्या सांगतात. शिवाय महिला निर्माती किंवा एक महिला असल्याचं भांडवल करणं मला आवडतं नाही, असं श्वेता म्हणतात. त्यामुळे कोणीच स्त्री-पुरुष असा भेद न बाळगता जिद्दीने आणि आत्मविश्वासाने स्वतःच काम करतं राहा आणि त्यात यश मिळवण्यासाठी शर्थीचे पर्यंत करत राहा असं या यानिमित्ताने सांगतात. शिवाय निर्मिती हे असलं क्षेत्र आहे जिथे तुम्ही स्त्री अथवा पुरुष आहात या गोष्टीने काडीमात्र फरक पडत नाही असं त्या म्हणतात.

निर्मिती क्षेत्रात काम सुरु केलं त्यावेळी श्वेता यांचं बाळ लहान होतं. पण त्यातही, बाळाला सेटवर घेऊन जात त्यांनी आपल काम सुरूच ठेवल्याच त्या सांगतात. “पुरुषी, कणखर आणि बिनधास्तपणा स्वभावात असल्याचं गमक खरतर त्यांच्या स्वभावात कसं आणि का आलं हे त्यांनाही सांगता येतं नसल्याचं त्या म्हणतात. कदाचित, माझ्या आईचा हा स्वभाव मला मिळाला आहे”, असं श्वेता सांगतात. “माझे वडील गेल्यानंतर, मी माझ्या आईला स्वतःच विश्व उभारताना, त्यासाठी स्वतःला झोकून काम करताना मी तिला पाहिलंय… कदाचित त्यातूनच मी शिकत गेले आणि आज इथवर पोहोचल्याच्या भावना त्या व्यक्त करतात.

सध्या देशभरात स्त्रियांबाबतीत घडणारे प्रकार पाहता, त्यामानाने आपला महाराष्ट्र हा स्त्रियांसाठी केव्हाही सुरक्षित आहे असं श्वेता म्हणतात. हे प्रकार थांबवण्यासाठी आपल्याकडील शिक्षा अधिक कठोर झाल्याशिवाय हे प्रकार थांबणार नसल्याचं त्या म्हणतात. दुसरी गोष्ट म्हणजे, पुरुषांपेक्षा आपण स्त्रियांना खूप जास्त सौंदर्य लाभलं आहे ते सौंदर्य जपणही आपली जबाबदारी हे आपणही विसरता कामा नये, असं श्वेता म्हणतात. आपल्या सौंदर्याचा अभिमान बाळगत आपणचं ते जपलं पाहिजे असं श्वेता यांना वाटतं. अभिनय आणि मालिका विश्वातून निर्माती म्हणून सुरु झालेला श्वेता यांचा प्रवास आता हिंदी वेबसिरीज आणि इतर अनेक प्रोजेक्ट्सपर्यंत पोहचतोय. निर्मित क्षेत्रातील त्याच्या पुढील वाटचालीसाठी श्वेता यांना अनेक शुभेच्छा.

मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: