राम शेट्टी निर्मित ‘राडा’ सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न

फुल्ल ऑफ ऍक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या ‘राडा’ सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर हवा करण्यास सज्ज झाला आहे. आता क्षणाचा विलंब न करता या सिनेमाचा ट्रेलर आणि चित्रपटातील एक धमाकेदार सॉंग आजच्या या शुभदिनी प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. नुकताच चित्रपटातील कलाकारांच्या आणि गायकांच्या उपस्थितीत चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. गणेश आचार्य, हिना पांचाळ यांनी धरलेला ठेका प्रेक्षकांना नक्कीच थिरकायला भाग पाडणार यांत शंकाच नाही. दरम्यान उपस्थित रसिक प्रेक्षक यांची कौतुकाची थाप, आशीर्वाद आणि पाठिंबा हे कलाकार आणि ‘राडा’ चित्रपटासाठी उत्साहवर्धक आहे यांत शंका नाही.

उत्कंठावर्धक आणि भन्नाट वेग असलेल्या ‘राडा’ चित्रपटाचा दिमाखदार सोहळा नुकताच संपन्न झाला. राडा चित्रपटाचा ट्रेलर पाहता साऊथ चित्रपटाची पाहतोय की काय असेच वाटतेय. साऊथ स्टाईल टच असलेला हा भव्य चित्रपट आता केव्हा येणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.

राम शेट्टी निर्मित ‘राडा’ या सिनेमाचा हिरो समा म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार ‘राडा’ या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. तर राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प – पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या या चित्रपटात आकाश शेट्टीसह मिलिंद गुणाजी, संजय खापरे, गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य, निशिगंधा वाड, योगिता चव्हाण, सिया पाटील, हिना पांचाळ, शिल्पा ठाकरे या कलाकारांना पाहणे रंजक ठरणार आहे. दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही धुरा पेलवल्या आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना आणि मयुरेश केळकर यांनी सांभाळली असून गाण्याचे बोल जाफर सागर लिखित असून त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे. तर गायक जसराज, मधुर शिंदे यांनी चित्रपटातील गाण्यांना स्वरबद्ध केले आहे. तर हा भव्य ऍक्शनपट के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

ट्रेलर पाहून प्रेक्षकांची चित्रपटातबाबतची उत्सुकता आणखीनच ताणली गेली असेल यांत शंकाच नाही, त्यामुळे येत्या २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात ‘राडा’ हा सिनेमा जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पाहायला विसरू नका.

Share your valuable opinion

%d bloggers like this: