मैत्रीची अनोखी व्याख्या सांगणार  ‘समायरा’

काही दिवसांपूर्वीच ऋषी श्रीकृष्ण देशपांडे दिग्दर्शित ‘समायरा’ या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली.  केतकी नारायणचा अव्हेंजर चालवतानाच्या धाडसी लुकने प्रेक्षकांच्या मनात घर केले. आता ‘समायरा’ची दुसरी बाजू प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकत्याच झालेल्या मैत्री दिनाच्या निमित्ताने मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून यात हिंदी वेबसीरिज आणि चित्रपटात अभूतपूर्व कामगिरी करणारा अभिनेता अंकुर राठी केतकी नारायणसोबत दिसत आहे. केतकीचा आत्मविश्वास , ध्येयापर्यंतचा असाधारण प्रवास आणि त्यात अंकुरची तिला लाभलेली प्रेमळ साथ हे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे असलेले नाते मराठी पडद्यावर एक अनोखी रंगत घेऊन येणार आहे.
          येत्या २६ ऑगस्ट रोजी ‘समायरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, आद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, या चित्रपटाची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पानट, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली असून या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत.

Share your valuable opinion

%d bloggers like this: