ही भूमिका माझ्यासाठी  प्रेरणादायी : शिवानी नाईक

झी मराठी वाहिनीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ हि नवीन मालिका २२ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक छोट्या पडद्यावर पदार्पण करतेय. शिवानीने आजवर अनेक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकातून आपली अभिनयाची छाप पाडली आहे. प्रोमोमध्ये आप्पीचा ठसकेबाज करारा अंदाज सगळ्यांच्याच पसंतीस उतरलाय. या मालिकेबद्दल व आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली कि, ” ही मालिका एक वेगळा विषय घेऊन येत आहे. मी ह्या मालिकेत अपर्णा सुरेश मानेची भूमिका साकारतेय. तिचे बाबा रिक्षा चालवतात. तिचं कलेक्टर होण्याचं स्वप्न आहे आणि ते ती कसं सध्या करते याचा प्रेरणादायी प्रवास ह्या मालिकेतून बघायला मिळणार आहे. अप्पी सामाजिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करून काही तरी करू पाहते आणि हि भूमिका माझासाठी खूप प्रेरणादायी आहे. या भूमिकेसाठी मी प्रचंड मेहनत घेतली असून हि भूमिका प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास शिवानीने व्यक्त केलाय.

Share your valuable opinion

%d bloggers like this: