STAR OF THE WEEK- 31 Pranit Shilimkar
प्रणित चा फिटनेस फंडा आणि “फिटनेस टॉक विथ प्रणित” चा हा अनोखा प्रवास जाणून घेऊ या प्लॅनेट मराठी मॅगझिन च्या “स्टार ऑफ दी वीक” मध्ये.
संपूर्ण नाव : प्रणित प्रकाश शिलिमकर
जन्मठिकाण : पुणे
वाढदिवस : २९ मे १९९४
शिक्षण : १०वी पास
सुरुवात झाली अशी की मी १० वीत असताना माझं वजन जास्त वाढलं, थोडा जाड झालो तर मग मनात विचार आला की आता कॉलेज ला जाणार तर थोडं फिट राहून बॉडी मेंटेन करावी. या एका छोट्याशा गोष्टी मुळे मी जिम ला सुरुवात केली. जिम करताना माझी यातली आवड वाढत गेली आणि तेव्हा मी डिप्लोमा ला ऍडमिशन घेतली पण माझ्याकडून ते काही पूर्ण झालं नाही. मग वयाच्या १८ व्या वर्षी मी फिटनेस ट्रेनर म्हणून जॉब ला लागलो.
“म्हणून फिटनेस ट्रेनर झालो”
या क्षेत्रात खूप जास्त ज्ञान आहे. आपण लोकांना थोडं फार बदलू शकतो, लोकांचे फिटनेस बद्दल चे गैरसमज दूर करू शकतो आणि यातून माझ्यासाठी एक चांगल करियरची दिशा देणारं फिटनेस हे क्षेत्र होतं. मग यावर विचार करून मी फिटनेस ट्रेनर झालो. यातून लोकांशी बोलता येईल, त्यांचे गैरसमज दूर करता येतील लोकांना फिटनेस बद्दल काही चांगल्या गोष्टी सांगता येतील म्हणून मी याची सुरुवात केली.

३७ डेज चॅलेंज हा एक लोकांसाठी बनवलेला अगदी well crafted डाएट प्लॅन आहे. हा एक डाएट प्लॅन चॅलेंज आहे. आम्ही लोकांचं वर्क आऊट आणि डाएट प्लॅन डिजाईन करतो आणि सात दिवसांनी त्यांचा डाएट प्लॅन आणि वर्क आऊट हे बदलत राहतं. यातली छान गोष्ट अशी लोकं २४ तासातले २ तास फिटनेस साठी देत असतील आणि उरलेले २२ तास ते काय करत असतील? तर फिटनेस करताना उर्वरित २२ तास हा फिटनेस त्यांच्या डोक्यात राहिला पाहिजे. जी लोक ३७ डेज चॅलेंज घेतात त्यांच्यासाठी खास आम्ही nutritionist ठेवतो. हे आहारतज्ञ त्यांच्या सोबत असतात ज्यांनी हे चॅलेंज स्वीकारलं आहे. त्यांना त्यांच्या खाण्याच्या meal चे फोटोज आम्हाला पाठवायला लागतात आणि हे फोटोला आम्ही जर हो म्हणालो तरंच ते meal घेतात. तर अश्या तऱ्हेनं त्या लोकांच्या सतत सोबत राहून हे चॅलेंज पार पडतं.
“मला मराठी इंडस्ट्रीने घडवलंय”
फिटनेस ट्रेनर म्हणून आजवरचा प्रवास खूप चांगला आहे. मला जनतेने नाही तर मराठी इंडस्ट्रीने घडवलंय. आपल्याकडे गंमत अशी आहे की लोकांना त्यांची आवडती लोकं किंवा अभिनेता/ अभिनेत्री फिटनेस बद्दल जर काही करत असतील तर लोकं त्यांना प्रोत्साहित होऊन स्वतःसाठी ते करतात. एखादी गोष्ट सेलेब्रिटीनी केली की त्याचा ट्रेंड होतो आणि मग बाकी लोकं ते फॉलो करतात. आत्ताचा तरुणवर्ग हा अनेक सेलेब्रिटींना बघून प्रोत्साहित होतो. मग डोक्यात विचार आला की जर आपण सेलेब्रिटींना फिटनेस बद्दल ट्रेन केलं तर जास्तीत जास्त लोकं हे बघतील आणि करतील. कलाकारांनी त्यांच्या प्रेक्षकांना सांगितलं की हे फॉलो करा, हे खा किंवा हे खाऊ नका तर याचा जास्त परिणाम लोकांवर होतो आणि लोकं हे फॉलो करतात म्हणून यातून मला कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा निर्माण झाली. सोशल मीडिया वरून कलाकारांना या चॅलेंज बद्दल सांगितलं गेलं आणि यातून अनेक कलाकार हे चॅलेंज घ्यायला लागले.
माझ्यासाठी ही दुहेरी जवाबदारी आहे की लोकांना फिटनेस चे धडे देऊन स्वतः फिट राहणं. माझ्यावर जास्त जवाबदारी असते, कारण जेव्हा तुम्ही लोकांना कुठल्या तरी गोष्टीची प्रसिद्धी करायला सांगता तेव्हा आपल्याला फार जागरूक राहावं लागतं की आपण स्वतः काय खातो. आपण जे बोलतो ते आपण खातो का किंवा या गोष्टी फॉलो करतो का? यामुळे स्वतःवर फार जवाबदारी असते आणि मग हे डोक्यात असल्या मुळे ते आपोआप घडलं जात आणि मग दिवस भरातून वेळ काढून कुठेही आणि कसही वर्क आऊट केलं जातं मग कधी वर्क आऊट नाही झालं तर मी धावायला जातो तर अश्या रीतीने दुहेरी जवाबदारी घेऊन मी स्वतः वर्क आऊट करून फिट राहतो.
माझी आवड हे नेहमीच काहीतरी वेगळं करण्याची होती. माझं मन अभ्यासात कधी रमलं नाही. मला डान्स प्रचंड आवडायचा. त्यात मी ठरवलं की आपल्याला ट्रेनर व्हायचंय मग मी डान्स कोरियोग्राफर म्हणून काम सुरू केलं आणि त्यातून जे पैसे येतील यातून मी माझी वैयक्तिक प्रशिक्षणाची फी जमा करायचो.
लोकांचा मिळणारा प्रतिसाद हा खूप मस्त आहे. सेव्हन डेज चॅलेंज असं वेल डिजाईन चॅलेंज आहे. जिथे लोकांना नक्कीच आपल्यात झालेला फरक हा जाणवतो. माझं ध्येय हेच होत की लोकांनी आठवडा भर फिटनेस फॉलो करावा आणि यातून जर सात दिवसात तुम्हाला काही तरी वेगळा फरक जाणवत असेल तर मग विचार करा एक महिन्यात काय होऊ शकतं. हेच पुढे चालू ठेवलं तर मग आपण किती फिट राहू शकतो. लोकांमध्ये फिटनेस बद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी सेव्हन डेज चॅलेंज आहे.
फिटनेस सांभाळण्याचा सगळ्यात मोठा मूलमंत्र हा आहे की लोकांनी त्यांची लाईफ स्टाईल (दैनंदिन आयुष्य) जपावं आणि त्याकडे बघावं. आपलं दैनंदिन आयुष्य जर सेट असेल तर आपल्याला फिटनेस या शब्दांची गरज नाही पडणार.
सगळ्यात आधी आपल्याला हेल्दी (पौष्टीक) आणि अनहेल्दी काय आहे यातला फरक समजायला हवा. दुसरी गोष्ट अशी एक असे पदार्थ निवडावे जे आपल्या पचन संस्थेत जास्त वेळ राहतील आणि आपली भूक भागवून आपण फिट राहू. त्यामुळे असे पदार्थ खावेत जे आपल्या पचन संस्थेत जास्त वेळ टिकतील तर अश्याने आपल्याला जास्त ऊर्जा मिळते.

लोकांनी फिट राहण्यासाठी दैनंदिन आयुष्य सुधारणं फार महत्त्वाच आहे. त्यांनी त्यांच्या खाण्याच्या, झोपण्याच्या, उठण्याचा वेळा, व्यायामाची वेळ हे सगळं ठरवून केलं पाहिजे. हे ठरवणं म्हणजे स्वतःहा सोबत एक कमिटमेंट करणं आणि ही कमिटमेंट आयुष्यभरासाठी- मरे पर्यंत असली पाहिजे. रोजच्या रोज आपण या गोष्टी केल्या तर नक्कीच आपण फिट दिसू.

Pranit Very great funda 7 days 👌