STAR OF THE WEEK 51- Dhairyasheel Gholap

“तानाजी ” सारख्या बहुचर्चित सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप पडणारा एक तरुण अभिनेता “धैर्यशील घोलप”

अभिनयाच्या सोबतीने दिग्दर्शनात काही तरी अनोखं करणाऱ्या या तरुण कलाकाराचा प्रवास जाणून घेऊ या प्लॅनेट मराठी मॅगझीनच्या “स्टार ऑफ द वीक” मधून….

धैर्यशील घोलप

वाढदिवस : ५ जुलै १९९३

जन्मठिकाण : जुन्नर

शिक्षण : कॉम्पुटर इंजिनियर

“अविस्मरणीय अनुभवाचा तानाजी”

तानाजी चा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता. याचं सगळं श्रेय “ओम राऊत” याला जातं, कारण मला याचित्रपटामुळे एक अनोखी ओळख मिळाली आहे. तानाजी चा अनुभव माझ्यासाठी एखाद्या स्वप्नपूर्ती सारखा आहे.

“दाक्षिणात्य चित्रपट करायचा आहे, कारण….”

मला दाक्षिणात्य चित्रपटाचं बजेट, त्यांची कामं करण्याची एकंदरीत पद्धत फार आवडते. मला मल्याळम चित्रपटबघायला फार आवडतात. माझा मित्र आदित्य सरपोतदार याला सुद्धा मल्याळम चित्रपट आवडतात त्यामुळे त्याच्याकडूनअनेक चित्रपटांची यादी मला मिळते आणि मग मी हे चित्रपट बघतो. त्यामुळे भविष्यात एकदा तरी मला दाक्षिणात्यचित्रपटात काम करण्याची इच्छा आहे.

“अभिनय हे पॅशन आणि दिग्दर्शन छंद”

मी एक चित्रपट लिहितो आहे तो पूर्ण झाला की त्याचं दिग्दर्शन नक्कीच करेन. पण एवढयात माझ्याकडे जी कामंआहेत त्यावर मनापासून काम करायचंय. दिग्दर्शनाच्या दृष्टीने नक्कीच मी काही तरी वेगळं करेन. अभिनय हे पॅशन आहेतर दिग्दर्शन हा छंद, त्यामुळे काही तरी वेगळं नक्कीच करण्याचा प्रयत्न आहे.

“प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं अभ्यास करायला आवडतो”

तानाजी आणि मुंबई सागा या दोन्ही चित्रपटाचा अनुभव वेगळा होता. दोन वेगळ्यां प्रोडक्शन सोबत काम करण्याचाअनुभव होता. दोन्ही मधला एक दुवा भूषण कुमार. काम करताना वेगळेपणा जाणवतो. जॉन अब्राहम, इम्रान हष्मी यांच्यासोबत काम करताना त्यांना जवळून अनुभवण्याची संधी मला मिळली. मला प्रत्येक गोष्ट बारकाईने बघायला आवडते. फावल्या वेळात मला व्हॅनिटी मध्ये बसायला आवडत नाही, त्यामुळे या दोन कलाकारांना अनुभवणं ही एक प्रोसेसमाझ्यासाठी फार वेगळी आणि कमालीची होती.

“बबलू ते धैर्यशील”

लहानपणी पासून घरचे मला बबलू म्हणायचे, शाळेत असताना स्पोर्ट मध्ये खेळताना सगळे बबलू नावाने ‘चिअर अप’ करायचे तर ते खूप छान वाटायचं ऐकायला. सुरुवातील इंडस्ट्रीत मी माझी ओळख बबलू या नावाने करून द्यायचो मगमाझ्या २१ व्या वाढदिवसाला (मम्मा) म्हणजे हर्षदा खानविलकर हिने सांगितलं ‘बेटा बबलू नाम से तू हिरो नहीं बन सकता, तेरे असली नाम से तू कुछ कर’ हे मला खूप भावलं आणि म्हणून मग सगळीकडे मी धैर्य हे नाव लावतो.

“तरूणांईने मोठी स्वप्न बघावी”

इंडस्ट्रीत येऊ पाहणाऱ्या तरुणाईला एवढचं सांगेन खूप मोठी स्वप्न बघा आणि जे काही कराल ते मन लावून करा. तेम्हणतात ना आपण एखादी गोष्ट मनापासून केली तर नक्की पूर्णत्वास जाते, जे कराल ते मनापासून दिल से करा.

“मुडी पण तितकाच संवेदनशील”

खऱ्या आयुष्यात मी खूप मुडी आहे पण मी तेवढाच संवेदनशील सुद्धा आहे. समाजातल्या अनेक विषयांना घेऊन मीसंवेदनशील होतो. अनेक सामाजिक गोष्टींना घेऊन मी व्यक्त होतो. जसं मी तेजस्विनी पंडित च् नवरात्रीसाठी नऊ वेगळ्यासामाजिक गोष्टींवर भर देऊन केलेलं फोटोशूट. अश्या तऱ्हेने मी कुठेतरी व्यक्त होतो.

“स्मिताताई ने घडवलं”

माझी १० वी झाल्यानंतर मी “अस्मिता अकादमी” मध्ये अभिनयाचा कोर्स केला तर माझे बाबा अशोक सराफांचे खूपमोठे चाहते आहेत तर १० वीच्या सुट्टीत मी पेन ड्राईव्ह मधून अशोक मामांचे चित्रपट आणि त्यांच काम असलेल्या सीडीआणल्या मग दिवसाला एक चित्रपट असा आमचा बेत असायचा. अशोक मामांचे अनेक चित्रपट पाहिले आणि एक दिवसअचानक मला सुनीता तळवलकर यांचा फोन आला ‘अरे बबलू आपण एक नवीन सिरीयल आणि स्मिता ताई म्हणाल्याकी आपण त्यात बबलू ला घेऊ’ तर हे माझ्यासाठी फार भारी होतं आणि त्यांना माहीत होतं मी अशोक मामांचा खूप मोठाफॅन आहे तर तेव्हा मला सांगितलं की मला अशोक सराफांच्या मुलांचा रोल करायचा आहे, तर हे सगळं जुळून आलंआणि जेवढा काळ त्यांच्या सोबत काम केलं मी खूप खुश होतो कारण लहानपणी पासून माझा स्वभाव आहे आपल्याआवडणाऱ्या व्यक्तीला बारकाईने बघा, तिच्यातल्या चांगल्या गोष्टी वेचा आणि काम करा. स्मिताताई या माझ्याआयुष्यातली एक कमालीची व्यक्ती होती ज्यांनी मला कधी एक अभिनेता अशी वागणूक न देता अभिनय क्षेत्रातलीप्रत्येक गोष्ट शिकवली, म्हणून त्यांनी मला इथे घडवलंय.

“रणवीर सिंग फॅशन आयकॉन”

मला रणवीर सिंग खूप आवडतो माझं त्या व्यक्ती वर फार प्रेम आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असतोतेव्हा आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं असतं. तो ज्या प्रकारे ड्रेसिंग करतो ते फार बेस्ट आणि अनोखं असतं. माझीजवळची मैत्रीण तेजस्वीनी पंडित ही स्वतःह एक बेस्ट डिझायनर आहे तर माझी निम्म्या पेक्षा जास्त शॉपिंग तेजु करतेम्हणून ती मला डिझायनिंग चे धडे देत असते आणि माझ्या डिझायनिंग मध्ये अर्ध क्रेडिट तिला जातं.

“ड्रीम वर्क”

माझे खूप आवडते दिग्दर्शक आहेत अयान मुखर्जी, अनुराग कश्यप, संजयलीला भन्साली, राजकुमार हिराणी यासगळ्यांसोबत काम करायचं आहे. एखाद्या अभ्यासू विद्यार्थ्यांला जसा सगळा अभ्यासक्रम आवडतो तशी मला ही इंडस्ट्रीआवडते. यातल्या प्रत्येक दिग्दर्शक हा वेगळा आणि कमालीची चित्रपटाची मांडणी करतो.

स्लॅम बुक…..

आवडता अभिनेता : आमीर खान

आवडती अभिनेत्री : काजोल

आवडतं नाटक : संगीत देवबाभळी

आवडता चित्रपट : रंग दे बसंती

आवडत पुस्तक : विंग्स ऑफ फायर

आवडतं सोशल मीडिया : इंस्टाग्राम

आवडता पदार्थ : मटण

तेजस्विनी पंडित की अभिज्ञा भावे : तेजस्विनी पंडित

तानाजी की मुंबई सागा : तानाजी

अभिनय की दिग्दर्शन : अभिनय

सिंगल आहेस की कंमिटेड : सिंगल

मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: