STAR OF WEEK 39- Shashank Ketkar

अनेक गोष्टींचा शेवट पूर्णविरामाने होत असला तरी, याने मात्र ‘पूर्णविराम’ करतं त्याच्या अभिनयातील कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. पुढे विविध मालिकांमधून तो काम करत राहिला. त्यानंतर छोट्या पडद्यावर बसस्टॉपवरील प्रेमकथा उत्तम पद्धतीने रंगवत तो अनेक चाहत्यांचा लाडका ‘श्री’ बनला.
- संपूर्ण नाव : शशांक शिरीष केतकर
- जन्म तारीख आणि ठिकाण : १५ सप्टेंबर १९८५, सातारा
- शिक्षण : बीई इंस्ट्रूमेंटेशन, एमईएम (मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट), सिडनी (ऑस्ट्रेलिया)
अन् मी अभिनय करायचं ठरवलं….

शाश्वतीपेक्षा समाधान महत्त्वाचं…
वेगळी भूमिका..
‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकामध्ये मी साकारत असलेली भूमिका अत्यंत वेगळी आहे. ज्यांनी अगोदरच हे नाटकं पाहिलं असेल त्यांना मी काम करतं असलेलं नवं नाटकं पाहून या नाटकातील आणि माझ्या भूमिकेतील वेगळेपण नक्कीचं लक्षात येईल. त्यामुळे माझ्या सगळ्या भूमिकांपेक्षा हि एक वेगळी भूमिका मी करतोय. शिवाय येत्या काळात माझे दोन नवीन चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहेत.
प्रेक्षकांसाठी सर्वकाही…


दुर्लक्ष करणंचं योग्य…
अनेकदा कलाकारांना विविध कारणांसाठी ट्रोल केलं जातं. परंतु माझ्यासोबत असं ट्रोलिंग झालं तर त्याकडे दुर्लक्ष करणं मी पसंत करतो. तुम्ही प्रसिद्ध असता म्हणूनच तुमचं ट्रोलिंग होतं. त्यामुळे ट्रोलिंगला आणि ट्रोल करणाऱ्यांकडे काणा डोळा करण्यावर माझा भर असतो. पण हे ट्रोलर ज्यावेळी व्यक्तिगत जीवनावर भाष्य अथवा टिका करायला सुरुवात करतात त्यावेळी मात्र त्यांना वेळीच चोखं उत्तरही देतो.

काही गोष्टी खुपतायतं…
आपली इंडस्ट्री खूप छान आहे. परंतु इथल्या काही गोष्टी मला नक्कीचं खुपतात. आपल्याकडील पैशांच्या बाबतीत आणि वेळेच्या बाबतीत गृहीत धरलं जाणं मला न आवडणारी बाब आहे. शिवाय, प्रेक्षकांना फार गृहीत धरलं जात ही मला न पटणारी गोष्ट आहे. आपल्याकडील प्रेक्षक सुजाण आहे. त्यांनाही वेगळं आणि क्रिएटिव्ह बघायला नक्कीचं आवडतं. नेहमी वेगळं आणि उत्तमोत्तम गोष्टी बघण्याकडे त्यांचा भर असतो. पण दिग्दर्शक चौकटीबाहेर जाऊन करण्यास घाबरतो आणि प्रेक्षकही चांगल्या कलाकृतीला मुकतात याचं दु:ख वाटतं. २००० ते २०१९ हा एकोणीस वर्षांचा प्रवास हा फक्त कॅलेंडरने केला असं वाटतं. कारणं प्रेक्षकांसमोर सादर होणाऱ्या भूमिका या त्याचं-त्याचं पद्धतीच्या असतात. काळ पुढे गेला त्यानुसार समाजही बदलायला हवा आणि त्या दृष्टीने नव्या आशयाचे सिनेमे आणि मालिका त्यांना बघता याव्यात असं मला वाटतं. टेलिव्हिजन हे हा बदल घडवण्याच एक उत्तम माध्यम आहे. त्यामुळे सतत स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि कालांतराने त्यांचं सुपरवुमन होणं, अशा कथा आत्तातरी थांबायला हव्यात. त्यात मीही इंडस्ट्रीचा एक छोटा भाग आहे. हे सगळं बदलणं जरी माझ्या हातात नसलं तरी हे चित्र बदलावं असं मला वाटतं.

नव्या बिझनेसची सुरुवात…
शाळेत असल्यापासून आपलंही एक हॉटेल असावं असं एक स्वप्नं पाहिलं होतं. ते स्वप्न पूर्णही झालं. पुण्यात ‘आईच्या गावात’ या नावाने हॉटेलही सुरु केलं. इंजिनिअर त्यानंतर अभिनेता आणि मग स्वतःच हॉटेल असा वेगळा प्रवास होता. परंतु नुकतंच मी हे हॉटेल बंद केलं आहे. लवकरच एका नव्या रुपात आणि नव्या व्यवसायासह सगळ्यांसमोर येणारं आहे. फिरणं माझा आवडता छंद…

माझ्या अभिनय, होस्टिंग अश्या आवडींबरोबरीने मला कुकिंग, ट्रॅव्हलिंग, स्विमिंग करणं आवडतं. शिवाय गाण्याची आवडं आहे. वर्षातून एकदातरी फॉरेन-टूर करण्याचं मी ठरवलं आहे. यावर्षी माझी बायको प्रियांका आणि मी, आम्ही ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो. शिक्षणासाठी, मग नाटकाच्या दौऱ्यानिम्मित आणि आता फिरण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो. आतापर्यंत जगातील तब्बल वीस देश माझे फिरून झाले आहेत. आता हा एक टप्पा बघून झाला आहे. अजून बरेचं देश फिरायचे आहे. सोपा फिटनेस मंत्रमी शाकाहारी असल्यामुळे हलक-पुलक खाण्याकडे माझा अधिक भर असतो. काम झाल्यानंतर व्यवस्थित आराम करणं. वेळोवेळी जिम करणं मला आवडत.
रॅपिड फायर
- शशांक अभिनेता नसता तर?-शेफ
- शशांकची आवडती अभिनेत्री-कोंकना सेन शर्मा आणि मुक्ता बर्वे
- शशांकचा विक पॉईंट?-पेट्स (कुत्रे)
- शशांकने बनवलेली आणि आवडती डिश?-मसाला आंबोळी
- सगळ्यात अधिक वापर जाणारं app?-इंस्टाग्राम आणि गुगल