June 3, 2023

gashmeer mahajani

झी मराठीवरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या रिऍलिटी शोने अवघ्या काही दिवसातच लोकप्रियता मिळवली आहे. ह्या कार्यक्रमात छोट्या...
‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ हा कार्यक्रम या आठवड्यात बुधवार पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षकांसोबतच छोट्या...
‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमासाठी बच्चेकंपनी उत्सुक आहे.कारण या कार्यक्रमाचं स्वरूप काहीस वेगळं असणार आहे. चिंचि चेटकीण या कार्यक्रमात तिची जादू दाखवणार आहे आणि त्यामुळे छोट्या दोस्तांना या कार्यक्रमातून अफाट मनोरंजन मिळणार यात शंकाच नाही. सोनाली कुलकर्णी आणि गश्मीर महाजनी हे दोघे या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावणार आहेत पण या या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक कोण असेल हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे अभिनेता संदीप पाठक. आपल्या या नवीन भूमिकेबद्दल बोलताना संदीप पाठक म्हणाला, “आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यामध्ये एक लहान मुलं दडलेलं असतं आणि आपण सर्वजण बालपणात रमतो. डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम प्रेक्षकांना त्यांच्या लहानपणीच्या दिवसांना उजाळा देईल. या कार्यक्रमातील स्पर्धक खूपच टॅलेंटेड आहेत त्यामुळे मी त्यांचा डान्स हा एन्जॉय करणार आहे. तसेच स्पर्धक, चेटकीण, परीक्षक, प्रेक्षक यांच्यामधला मी सुसंवाद बनणार आहे. मंचावर एक खेळीमेळीचं वातावरण ठेवून कार्यक्रमात एक एनर्जी पेरायची जबाबदारी माझी आहे.”
झी मराठीवर लवकरच डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चिंचि चेटकीण या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून खास स्पर्धक शोधून आणतेय. पण या कार्यक्रमात परीक्षक कोण असणार हा प्रश्न सर्व प्रेक्षकांना पडला आहे. या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत एक हरहुन्नरी अभिनेता, डान्सर आणि कोरिओग्राफर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर गश्मीर महाजनी आहे. हो हे खरं आहे. आपल्या अभिनय कौशल्यासोबतच गश्मीर एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याला डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये परीक्षकाच्या खुर्चीत पाहून प्रेक्षकांना खूप आनंद होईल यात शंकाच नाही. आपल्या या जबाबदारीच्या भूमिकेबद्दल बोलताना गश्मीर म्हणाला, “हा माझा पहिलाच डान्स रिऍलिटी शो आहे ज्यात मी सहभागी होतोय आणि ते हि परीक्षकाच्या भूमिकेत, याचा मला खूप आनंद आहे. हा कार्यक्रम स्वीकारण्यामागे महत्वाचं कारण म्हणजे लहान मुलांसोबत होणारं इंटरॅक्शन. माझं लहान मुलांसोबत कनेक्शन खूप छान जुळतं. त्याचसोबत या कार्यक्रमात मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काम करताना दिसेन. प्रेक्षकांनी आता पर्यंत मला विविध चित्रपटांत पाहिलं आहे. एका अभिनेत्या पलीकडे मी एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे मला अनेकदा मला विचारणा व्हायची कि मी डान्सशी निगडित काही करणार आहे का? तर हो आता ती वेळ अली आहे. प्रेक्षकांची जी अपूर्ण इच्छा होती मला डान्सशी निगडित काहीतरी करताना पाहायची ती आता पूर्ण होईल कारण प्रेक्षकांना या कार्यक्रमात मी परीक्षण करताना, कधीतरी थिरकताना आणि डान्सशी संबंधित बोलताना दिसेन. या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करण्याचं माझं ध्येय आहे, तर लवकरच भेटू डान्स महाराष्ट्र डान्समध्ये.”