October 3, 2023

planet marathi magazine

सध्या ‘टाइमपास३’ चा सर्वत्र बोलबाला आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. त्यापैकीच एक ट्रेंडिंग...
‘झी मराठी’वरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवाती पासून पसंती दर्शवली. या मालिकेतील अनामिका आणि सौरभची अव्यक्त प्रेमकथा प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. आता प्रेक्षकांना मालिकेत लवकरच एक आश्चर्यकारक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत अनामिका आणि पट्याच्या प्रेमकहाणी सोबत नील आणि राधाची प्रेमकहाणी देखील प्रेक्षकांना पाहायला आवडतेय. अनामिका सौरभ लग्न कधी करणार याकडे मालिकेच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले असतानाच मालिकेत अचानकपणे आश्चर्यकारक घडामोडी घडताना दिसणार आहेत. नुकतेच एका गाण्यासाठी मालिकेच्या कलाकारांनी नटूनथटून सेटवर हजेरी लावली. यावेळी मालिकेत एक गाणं दाखवले जाणार आहे ज्यात सर्व कलाकार सजून गाण्यावर ठेका धरताना दिसणार आहे. या गाण्याच शूटिंग नुकतंच झालं असून झाले असून हे गाणं येत्या रविवारी १ तासाच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मात्र मालिकेतला हा सोहळा नेमका कशासाठी हे अजूनही गुलदस्त्यात ठेवलेले पाहायला मिळत आहे. प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण म्हणजे अनामिका आणि सौरभचे लग्न. हा सोहळा ​त्यांच्या लग्नाचा तर नसेल ना? हे जाणून घेण्यासाठी महाएपिसोडची उत्सुकता अधिक वाढली आहे. या गाण्यासाठी वल्ली आणि अनामिका देखील एकत्र आल्या आहेत. सोबतच चंदू चिमणा चिमणीचीही जोडी गाण्यात झळकणार आहे. या विशेष भागात अनामिका आणि सौरभ प्रेक्षकांना एक सरप्राईज देणार आहेत. हे सरप्राईज काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
मागील काही दिवसांपासून मराठीपासून हिंदी सिनेसृष्टीपर्यंत सगळीकडेच ‘टकाटक २’ या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे....
ऋषी श्रीकृष्ण देशपांडे दिग्दर्शित ‘समायरा’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली असून येत्या २६ ऑगस्ट...
मराठीतील पहिला रॅपर, निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव उर्फ ‘किंग जेडी’ याने अल्पावधितच सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख...
‘बस बाई बस’ या कार्यक्रमातून सुबोध भावे प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीस येणार आहे. हा कार्यक्रम २९ जुलै...
‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ हा कार्यक्रम या आठवड्यात बुधवार पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षकांसोबतच छोट्या...
गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट आणि ‘मला सेम बाबा व्हायचंय…’ असं म्हणणाऱ्या त्याच्या मुलाची गोष्ट डॉ. सलील कुलकर्णी...
झी स्टुडिओजच्या टाइमपास ३ या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांचा सध्या समाजमाध्यमांवर एकच बोलबाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने केवळ...