April 19, 2024

planetmarathimagazine

बृहन्महाराष्ट्र मंडळ गेल्या पस्तीस वर्षांपासून परदेशात कार्यरत आहे. यावर्षी त्यांनी विशेष पुरस्काराची सुरुवात केली असून अक्षय बर्दापूरकर...
आपल्याला नेहमीच भविष्यकाळात काय घडणार या विषयी कुतूहल असतं आणि भविष्य आपल्याला दिसू लागलं तर त्याचं आश्चर्यच वाटेल. अगदी असंच सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नेत्राच्या आयुष्यात घडलंय. नेत्रा भविष्यात जे घडणार आहे, त्याबद्दल बोलते.  पण लोक तिला समजून न घेता तिच्यावर दोषारोप करतात, त्यामुळे नेत्राला प्रत्येक वेळी नव्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. अशा या नेत्राची गोष्ट लवकरच झी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नायिका नेत्राला भविष्यात काय घडणार हे दिसतं. त्यामुळेच गावातली सामान्य मुलगी असूनही ती असामान्य ठरलीय. नेत्राला साक्षात त्रिनयना देवीनेच भविष्य पाहू शकण्याचं वरदान दिलंय. नेत्राला तिच्याकडील या दिव्यशक्तीचा वापर समाजाच्या भल्यासाठी करायचा आहे. परंतु तिला भविष्य दिसत असलं तरी तिचं आयुष्य सोपं नाही. तिला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. अशी ही नेत्रा वर्तमानातील आयुष्य जगताना भविष्याचा वेध कसा घेते, हे पाहणं उत्कंठा वाढवणारं असणार आहे. या मालिकेचं सादरीकरण गूढ रहस्यमय पद्धतीने करण्यात येणार असून मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे अनोखे पैलू यात उलगडले जाणार आहेत. या मालिकेत तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसंच या मालिकेत ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले,रजनी वेलणकर, अजिंक्य जोशी, जयंत घाटे, राहुल मेहेंदळे हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. किरण बिडकर आणि अभिराम रामदासी हे या मालिकेचे लेखक आहेत. तर मालिकेची निर्मिती केली आहे आयरिस Production (विद्याधर पाठारे) यांनी.
‘घे डबल’ आणि ‘गोदावरी’ या दोन मराठी चित्रपटांच्या घोषणेनंतर, जिओ स्टुडिओजने त्यांच्या सलग तिसऱ्या चित्रपटची, ‘बाईपण भारी...
निर्माते शैलेंद्र केकुमार, सुजय कुट्टी, कृष्ण कुमार बी आणि सूरज शर्मा यांनी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या बंगाली कादंबरीवर...
 ‘ समायरा म्हणजे प्रोटेक्टेड बाय गॉड ‘ नावाप्रमाणेच ‘समायराचा’ प्रवास आहे. प्रश्नांच्या विळख्यात सापडलेली समायरा कशी अध्यात्माच्या...
मराठी सिनेसृष्टीतील माईलस्टोन ठरलेल्या ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटातील ‘हृदयी वसंत फुलताना…’ हे सदाबहार गीत पुन्हा नवा...
मराठी पडद्यावर विनोदी आणि धमाकेदार चित्रपटाचे लवकरच आगमन होणार आहे. आणि या चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरणार कॉमेडी...
भारताच्या विविधतेचे प्रतिनिधित्व करणारे बहुभाषिक आणि प्रादेशिक एकत्रीकरण असलेले एकमेव असे व्यासपीठ म्हणजे टाटा प्लेने नम्माफ्लिक्स, चौपाल...
पंढरीचा वास ,चंद्रभागेचे स्थान आणि विठोबाच्या दर्शनाची आस, जिथे एकत्र येते ती म्हणजे पंढरीची वारी. याच वारीचा...
‘कोण होणार करोडपती मराठी’ या कार्यक्रमात शनिवारच्या विशेष भागात अवघ्या देशाला आपल्या गाण्यांनी ठेका धरायला लावणारे संगीतकार...