पूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम अर्थातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ १५ ऑगस्टपासून परत येतो आहे. आठवड्यातले चारही दिवस हास्यरसिकांना हा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. काही दिवसांची क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर जत्रेकरी आता रसिकांना हसवण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत. हास्यजत्रा ब्रेक घेतेय हे समजल्यावर रसिकांनी हळहळ व्यक्त केली. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखला जाणारा हा कार्यक्रम खरोखच रसिकांच्या घराघरांत पोचला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या मंचाने रसिकांना निखळ आनंद दिला आहे. हास्यजत्रेतील एकेक पात्र रसिकांना त्यांच्या घरातलं वाटतं. रसिकमायबाप प्रेक्षक कलाकारांना त्यांच्या कामामुळे ओळखतात. जेव्हा संपूर्ण जग कोवीडसारख्या महामारीने हैराण होतं, तेव्हा या कार्यक्रमानी रसिकांना दुःख, त्रास, टेन्शन सगळं विसरायला भाग पाडलं. अनेकांना हास्याचा डोस देऊन ठणठणीत बरं केलं. त्यामुळे हास्यजत्रा पुन्हा सुरू होतेय ही रसिकांसाठी पर्वणी असणार आहे. येणाऱ्या नव्या पर्वात रसिकांना अनेक गोष्टी बघायला मिळतील. नवीन सेट, स्कीटचे वेगळे विषय, नवीन पात्रं आणि बरंच काही. निवेदिका प्राजक्ता माळी हिचं ‘वाह दादा वाह’ पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. हास्यरसिक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांचं दर्जेदार परीक्षण बघायला मिळेल. समीर, गौरव, नम्रता, प्रसाद, दत्तू आणि इतर कलाकार यांचे दमदार अभिनय बघायला मिळतील. त्यामुळे हास्यजत्रा पुन्हा कधी सुरू होतेय आणि कधी रसिकांना खळखळून हसायला मिळतंय याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
prasadoak
‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते. या शनिवारच्या भागात बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे या उपस्थित राहणार असून त्यांच्या ‘कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्था, अकोले’ या संस्थेला मदत म्हणून महाराष्ट्राचे लाडके अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. त्याचबरोबर सोनी मराठी वाहिनीवरील लाडका कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यातील हास्यवीर गौरव मोरे, शिवाली परब, ओंकार भोजने, रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट हेही उपस्थित राहणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होतात. समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते. आत्तापर्यंत काजोल, तनुजा, अशोक सराफ, सुधा मूर्ती, अधिक कदम यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते. या आठवड्यात राहीबाई पोपेरे यांच्यासारखे दिग्गज व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्याबरोबर हास्यवीर असल्याने हा भाग निश्चितच रंगतदार होणार आहे. गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून त्या संकलित करणे, त्या इतरांना पेरणीसाठी देत त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे अशा पद्धतीने पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहे. बियाणांच्या बॅंकेची सुरुवात नेमकी कशी झाली इथपासून पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी त्या अनवाणी गेल्या इथपर्यंतचा सगळा प्रवास राहीबाईंनी या भागात सांगितला आहे. तर प्रसाद ओकने चित्रपटाच्या यशाची गंमत तसेच पूर्वीचे संघर्षमय दिवस अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. स्त्री कलाकारांनी कायम धाडसी भूमिका स्वीकारल्या पाहिजेत असे मत प्राजक्ता माळी हिने ‘कोण होणार करोडपती’च्या भागात व्यक्त केले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रसिद्ध कार्यक्रमातल्या हास्यवीरांनी पडद्यामागचे अनेक किस्से ‘कोण होणार करोडपती’च्या या विशेष भागात उलगडले. गौरव मोरे, शिवाली परब, ओंकार भोजने, रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट या सगळ्यांचा प्रवास आणि विशेष गुण यांची माहिती या भागात सांगण्यात आली. एरवी खळखळून हसवणारा ओंकार किती शांत आणि सामाजिक कार्याची आवड जपणारा आहे, रसिकाची मालवणी भाषेची आवड, कुठल्या स्कीटनंतर प्रसाद किस्सा सांगतो अशी अनेक गुपितं या विशेष भागात उलगडली गेली आहेत. त्याचबरोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोनी मराठीवर पुन्हा कधीपासून सुरू होणार, याबद्दलची माहितीही या विशेष भागात प्रेक्षकांना मिळणार आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे....
धर्मवीर मु.पो.ठाणे चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला! गुरुविण कोण दाखवील वाट! गुरुमहिमेचं महात्म्य सांगणारी ही ओळ! आपल्याकडे गुरूला...
चंद्रमुखी’ च्या निमित्ताने प्रसाद ओक – चिन्मय मांडलेकरची हॅट्रिक आपल्या मोहमयी रूपाने, घायाळ अदांनी, आणि बहारदार नृत्याने...
‘चंद्रमुखी’तील ‘चंद्रा’ने आपल्या ठसकेबाज लावणीने सर्वांना घायाळ केल्यानंतर आता चित्रपटातील आणखी एक लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे....
जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी...
‘चंद्रमुखी’तील प्रेमगीत प्रदर्शित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाची मागील अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. पहिल्याच पोस्टरमध्ये पडद्यामागे लपलेला...