June 3, 2023

sachin khedekr

‘कोण होणार करोडपती मराठी’ या कार्यक्रमात शनिवारच्या विशेष भागात अवघ्या देशाला आपल्या गाण्यांनी ठेका धरायला लावणारे संगीतकार...
‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते. या शनिवारच्या भागात  ‘प्रोजेक्ट बाला’ संस्थेच्या अध्यक्षा सौम्या डाबरीवाल या उपस्थित राहणार असून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री  सई ताम्हणकर ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहे. सईबरोबर सौम्या डाबरीवालही ‘कोण होणार करोडपती’ या खेळात सहभागी होणार आहेत. या दोघी जणी नागपूर येथील  ‘विमलाश्रम घरकुल’ या संस्थेसाठी खेळणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी  होतात.  समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या  विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते. आत्तापर्यंत या भागांत काजोल, तनुजा, अशोक सराफ, सुधा मूर्ती, अधिक कदम, संदीप वासलेकर यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते. या आठवड्यात प्रसिद्ध आणि लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सौम्या डाबरीवाल या मंचावर उपस्थित राहून ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या दोघी नागपूर येथील वारांगना व त्यांची मुले यांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या ‘विमलाश्रम घरकुल’ या संस्थेसाठी खेळणार आहेत. १९९२ साली ‘विमलाश्रम घरकुला’ची स्थापना झाल्यापासून ही संस्था उपेक्षित व वंचित मुलांचं पुनर्वसन करत आहे. त्यांना समाजात सन्मानाने जगता यावं म्हणून स्वावलंबी बनवत आहे. तर ‘प्रोजेक्ट बाला’ या संस्थेच्या अंतर्गत सौम्या डाबरीवाल आणि त्यांचे सहकारी मासिक पाळी संदर्भात महिलांमध्ये जनजागृती करतात. मूळची सांगलीची असणारी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिच्या अभिनय कारकिर्दीचा सुरुवातीपासूनचा प्रवास ‘कोण होणार करोडपती’च्या या विशेष भागात  उलगडला. ‘आयुष्यात मिळालेले अनुभव हे सगळ्यात मोठे गुरू असतात’, असे मत सईने या कार्यक्रमात व्यक्त केले. वयाच्या १७ व्या वर्षी सईने काम करण्यास सुरुवात केली. सईचं सांगलीवरचं प्रेम, सांगलीच्या भाषेवर, लहेजावर असणारं प्रेम तिनी या भागात आवर्जून सांगितलं. त्याचबरोबर सई आणि तिची आई यांच्यामधले नाजूक बंधही ‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात उलगडण्यात आले. समाजकार्य आणि मनोरंजन क्षेत्र यांतले मोठं नाव असा मेळ असणारा, हा विशेष भाग निश्चितच रंगतदार ठरणार आहे.
‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते. या शनिवारच्या भागात बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे या उपस्थित राहणार असून त्यांच्या ‘कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्था, अकोले’ या संस्थेला मदत म्हणून महाराष्ट्राचे लाडके अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. त्याचबरोबर सोनी मराठी वाहिनीवरील लाडका कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यातील हास्यवीर गौरव मोरे, शिवाली परब, ओंकार भोजने, रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट हेही उपस्थित राहणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी  होतात.  समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या  विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते. आत्तापर्यंत काजोल, तनुजा, अशोक सराफ, सुधा मूर्ती, अधिक कदम यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते. या आठवड्यात राहीबाई पोपेरे यांच्यासारखे दिग्गज व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्याबरोबर हास्यवीर असल्याने हा भाग निश्चितच रंगतदार होणार आहे. गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून त्या संकलित करणे, त्या इतरांना पेरणीसाठी देत त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे अशा पद्धतीने पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहे. बियाणांच्या  बॅंकेची सुरुवात नेमकी कशी झाली इथपासून पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी त्या अनवाणी गेल्या इथपर्यंतचा सगळा प्रवास राहीबाईंनी या भागात सांगितला आहे. तर प्रसाद ओकने  चित्रपटाच्या यशाची गंमत तसेच  पूर्वीचे संघर्षमय दिवस अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. स्त्री कलाकारांनी कायम धाडसी भूमिका स्वीकारल्या पाहिजेत असे मत प्राजक्ता माळी हिने ‘कोण होणार करोडपती’च्या भागात व्यक्त केले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रसिद्ध कार्यक्रमातल्या हास्यवीरांनी पडद्यामागचे अनेक किस्से ‘कोण होणार करोडपती’च्या या विशेष भागात उलगडले. गौरव मोरे, शिवाली परब, ओंकार भोजने, रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट या सगळ्यांचा प्रवास आणि विशेष गुण यांची माहिती या भागात सांगण्यात आली.  एरवी खळखळून हसवणारा ओंकार किती शांत आणि सामाजिक कार्याची आवड जपणारा आहे, रसिकाची मालवणी भाषेची आवड, कुठल्या स्कीटनंतर प्रसाद किस्सा सांगतो अशी अनेक गुपितं या विशेष भागात उलगडली गेली आहेत. त्याचबरोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोनी मराठीवर पुन्हा कधीपासून सुरू होणार, याबद्दलची माहितीही या विशेष भागात प्रेक्षकांना मिळणार आहे.
आपल्या अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून स्पर्धापरीक्षेचे धडे देणारे नितेश कराळे गुरुजी हे आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोचले आहेत. वर्ध्यातल्या कराळे मास्तरांनी  वऱ्हाडी बोली भाषा आणि शिक्षण यांचा सुरेख मेळ घातला असून हेच मास्तर आता हॉटसीटवर बसून ‘कोण होणार करोडपती’मध्ये प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. येत्या शनिवारच्या विशेष भागात नितेश कराळे गुरुजी सहभागी होणार असून त्यांच्यासह कर्नल सुरेश पाटील  हेही सहभागी होणार आहेत. युट्यूबवर लोकप्रिय ठरलेल्या कराळे गुरुजींना या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे. ‘कोण होणार करोडपती’च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी  होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या  विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या आठवड्यातल्या विशेष भागात कराळे गुरुजी कर्नल सुरेश पाटील यांच्या ‘ग्रीन थंब एनव्हायर्नमेंटल प्रोटेक्शन ग्रूप – साथी रे’ या संस्थेसाठी खेळणार आहेत. करोना काळात शिकवणीचे वर्ग बंद होते, म्हणून वर्धा जिल्ह्यातल्या नितेश कराळे यांनी ऑनलाईन पद्धतीनी स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन देण्याचं ठरवलं. अनेक क्लिष्ट विषय सहज आणि सोप्या पद्धतीनी मांडण्याच्या कलेत त्यांचा हातखंडा आहे. त्यावर अस्सल वऱ्हाडी भाषेची फोडणी दिल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कराळे गुरुजींचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले होते. आपल्या भाषेतून संपादन केलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात राहतं, असं मत कराळे गुरुजींनी ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर व्यक्त केलं. करोनाचं संकट येण्यापूर्वी कराळे 300 विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीनं शिकवायचे. मात्र करोनामुळे शासनानी लॉकडाऊन केलं आणि सुरू असलेले क्लासेस बंद पडले. कराळे गुरुजींनीही ऑनलाईन क्लास सुरू केले. सुरुवातीला विद्यार्थ्यांना गुगल मीट, झूम अ‍ॅप यांच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला, पण तिथंही अडचणी आल्यानं त्यांनी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केले. हळूहळू त्यांचे प्रेक्षक वाढू लागले.  ज्वालामुखी शिकवताना कराळे गुरुजींची बोली अस्सल वऱ्हाडी असल्याने ‘खदखदणारा’ ज्वालामुखी, भूगोलातला लाव्हा रस, मराठीतले व्याकरण, इतिहास आणि गणित शिकवतानाही  त्यांच्या बोलीमुळे विद्यार्थ्यांना उत्तरं लक्षात राहण्यास चांगलीच मदत होते आहे. विदर्भातल्या एका मास्तरांनी वऱ्हाडी बोलीतून साध्या-सोप्या संकल्पना शिकवण्याचा विडा उचललेल्या आणि  सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय ठरलेल्या कराळे गुरुजींना हॉटसीटवर पाहणं हे मनोरंजक ठरणार आहे.
                                 जनसामान्यांचा म्हणून लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या  कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात  ‘कोण होणार  करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘कर्मवीर विशेष भागात’ कर्मवीरच्या रूपात अधिक कदम हॉटसीटवर येणार आहेत. काश्मिरी मुलींसाठी ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून लक्षणीय कामगिरी करणारे अधिक कदम या आठवड्यातले कर्मवीर आहेत.                                  अधिक कदम यांचा जन्म वारकरी संप्रदायात झाल्याने घरामध्ये लहानपणापासून आध्यात्मिक वातावरण आहे. ते पखवाज आणि मृदंग उत्तम वाजवतात. कुठल्याही भक्तीचा पाया हा कार्यकर्तृत्वाचा असतो, असे त्यांचे मत आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणात ते कायम दंग होतात. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर आषाढवारीनिमित्त एका अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन होणार आहे.  १८ दिवसांसाठी काश्मीरमध्ये गेलेले अधिक कदम तिथली परिस्थिती आणि घटना पाहून तिथेच राहिले. ज्या गावात हजारपेक्षा जास्त पुरुषांना आतंकवाद्यांनी मारले, त्या गावात ते राहिले. आतंकवादी अधिक यांना १९ वेळा घेऊन गेले आहेत. तिथे असणाऱ्या सैनिकांची वाईट अवस्था आणि यासारखे अनेक किस्से त्यांनी ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात कथन केले आहेत.                                    ‘कोण होणार करोडपती’च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी  होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या कर्मवीर विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या पर्वातल्या कर्मवीर विशेष भागात अधिक कदम सहभागी होणार आहेत. अहमदनगर ते थेट काश्मीरमधील कुपवाडा असा प्रवास करणारे अधिक कदम त्या भागात ‘अधिक भैय्या’ म्हणून प्रसिद्ध आहेत.  ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून ते काश्मिरी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलतात. कारण जम्मू-काश्मीरमध्ये फक्त स्त्रिया बदल घडवू शकतात, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आत्तापर्यंत अधिक यांच्या संस्थेने १६७ मुलींना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांची लग्नं लावून दिली आहेत तर सध्या  २३० मुली हॉस्टेलमध्ये राहून त्यांच्या आवडीचं शिक्षण घेत आहेत. अधिक कदम यांचे हे सगळे अनुभव ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावरून ऐकता येणार आहेत.