June 5, 2023

zee marathi

आपल्याला नेहमीच भविष्यकाळात काय घडणार या विषयी कुतूहल असतं आणि भविष्य आपल्याला दिसू लागलं तर त्याचं आश्चर्यच वाटेल. अगदी असंच सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नेत्राच्या आयुष्यात घडलंय. नेत्रा भविष्यात जे घडणार आहे, त्याबद्दल बोलते.  पण लोक तिला समजून न घेता तिच्यावर दोषारोप करतात, त्यामुळे नेत्राला प्रत्येक वेळी नव्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. अशा या नेत्राची गोष्ट लवकरच झी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नायिका नेत्राला भविष्यात काय घडणार हे दिसतं. त्यामुळेच गावातली सामान्य मुलगी असूनही ती असामान्य ठरलीय. नेत्राला साक्षात त्रिनयना देवीनेच भविष्य पाहू शकण्याचं वरदान दिलंय. नेत्राला तिच्याकडील या दिव्यशक्तीचा वापर समाजाच्या भल्यासाठी करायचा आहे. परंतु तिला भविष्य दिसत असलं तरी तिचं आयुष्य सोपं नाही. तिला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. अशी ही नेत्रा वर्तमानातील आयुष्य जगताना भविष्याचा वेध कसा घेते, हे पाहणं उत्कंठा वाढवणारं असणार आहे. या मालिकेचं सादरीकरण गूढ रहस्यमय पद्धतीने करण्यात येणार असून मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे अनोखे पैलू यात उलगडले जाणार आहेत. या मालिकेत तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसंच या मालिकेत ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले,रजनी वेलणकर, अजिंक्य जोशी, जयंत घाटे, राहुल मेहेंदळे हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. किरण बिडकर आणि अभिराम रामदासी हे या मालिकेचे लेखक आहेत. तर मालिकेची निर्मिती केली आहे आयरिस Production (विद्याधर पाठारे) यांनी.
झी मराठी वाहिनीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ हि नवीन मालिका २२ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेतून...
झी मराठीवरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या रिऍलिटी शोने अवघ्या काही दिवसातच लोकप्रियता मिळवली आहे. ह्या कार्यक्रमात छोट्या...
राखी पोर्णिमा हा सण भाऊ बहिणी मधील जिव्हाळा, प्रेम आणि संरक्षणाचे प्रतिक आहे. झी मराठीवर  येत असलेल्या...
‘झी मराठी’वरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. सुबोध भावे ह्यांनी कार्यक्रमाच्या...
झी मराठी वर अप्पी आमची कलेक्टर या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. या मालिकेत अपर्णा माने...
‘झी मराठी’वरील ‘तू तेव्हा तशी’ या या मालिकेतील अनामिका व सौरभ यांची अव्यक्त प्रेम कथा प्रेक्षकांना फारच भावली आहे.या दोघांचे प्रेम फुलत असताना निल आणि राधा यांचे प्रेमही प्रेक्षकांना भूरळ घालते. यातच आता मालिका एक नविन वळण घेणार आहे. अनामिका सौरभ लग्न कधी करणार याकडे मालिकेच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले असतानाच मालिकेत अचानकपणे आश्चर्यकारक घडामोडी घडताना...
राधिका हे पात्राने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आणि हे पात्र साकारणारी अभिनेत्री अनिता दाते आता नवा गडी नवं राज्य या मालिकेत रमा या व्यक्तिरेखेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रोमोमध्ये सगळ्यांनी रमाला पाहिलं आणि या भूमिकेतूनदेखील अनिता प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करणार याची हमी प्रेक्षकांना मिळाली. फ्रेमच्या चौकटीमधली रमा मालिकेत काय रंजक वळण आणणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल पण ही भूमिका साकारणं आव्हानात्मक आहे का याबद्दल बोलताना अनिता म्हणाली, “मी साकारत असलेली रमा ही फोटोफ्रेममधून बोलणार आहे. जी व्यक्ती अस्तित्वात नाही, जिवंत नाही ती जिवंतपणे साकारण्याचा प्रयत्न मी करतेय. फ्रेममधून बोलणं काही अवघड नाही. ते सहज आहे. फक्त इथे देहबोलीतून प्रतिक्रिया देता येत नाही. एका चौकटीत काम करावं लागतंय. अशी भूमिका करणं म्हणजे आव्हानच आहे. कमीत कमी साधनामधून जास्तीत जास्त गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि मलाही उत्सुकता आहे की, मी हे कसं साकार करणार आहे .त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी एक आव्हान आहे.”