‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ची वर्षपूर्तीनिमित्त प्रेक्षकांसाठी खास भेट

‘प्लॅनेट मराठी’ नेहमीच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी आणत असते. जगातील पहिल्या वहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या प्रेक्षकांच्या मनात स्थान प्रस्थापित केले आहे. येत्या ३१ ऑगस्ट रोजी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ पहिली वर्षपूर्ती साजरी करत आहे. भारतासह जगभरात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री माधुरी दिक्षितच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे लॉंचिंग करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ हे दर्जेदार आशय देत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

पहिल्या वर्षपूर्तीचे निमित्त साधत संजय जाधव दिग्दर्शित आणि प्लॅनेट मराठी निर्मित ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट १५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर झळकणार आहे. सांगितीक मैफल घडवणाऱ्या या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे हे कलाकार मुख्य भुमिकेत झळकत आहे. 

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “गेल्या वर्षी लॉंच झालेले जगातील पहिले मराठी ओटीटी म्हणुन ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ नावारूपात आले. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने गेल्या वर्षभरापासून एका पेक्षा एक दर्जेदार वेबसीरिज, वेबफिल्म तसेच शॉर्टफिल्म्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनोरंजनाची रिघ लावली आहे. ‘जुन’, ‘अनुराधा’, ‘रानबाजार’, ‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘प्लॅनेट मराठी’कडून प्रेक्षकांच्या आणखी अपेक्षा वाढल्या आहेत. येत्या आगामी वर्षात भव्य, मनोरंजनात्मक आशय प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ‘तमाशा लाईव्ह’ मधील गाण्यांना प्रेक्षकांकडून खूपच पसंती मिळत आहे. वर्षपुर्तीचे औचित्यसाधत आमचा सिनेमा ‘तमाशा लाईव्ह’ ३१ ऑगस्टपासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ वर झळकणार आहे.”

Share your valuable opinion

%d bloggers like this: