Tejas Nerurkar’s Phone Photography

“फोन फोटोग्राफी चा अनोखा अंदाज

लॉकडाऊन मध्ये आपण सगळेच दिवसभर सोशल मीडिया वर काही न काही बघत असतो मग आपल्याला सोशल मीडियावर असे काही कमालीचे ब्लॅक अँड व्हाईट फोटोची अनोखी सिरीज बघायला मिळते आणि त्या फोटो मागची गंमत नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपली उत्सुकता वाढते.

सध्या सोशल मीडिया वर चर्चेचा विषय ठरलेल्या त्या “खास ब्लॅक अँड व्हाईट” फोटो मागची खास गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मराठी कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि पडद्या मागच्या काही खास लोकांच तेजस नेरुरकर ने हे भन्नाट फोटो शूट केलंय. 

प्रसिद्ध फोटोग्राफर “तेजस नेरुरकर” यांनी या फोटो मागची खास गोष्ट आमच्या सोबत शेयर केली आहे त्यांच्या कडून जाणून घेऊया या खास फोटोशूट ची भन्नाट गोष्ट….

“अशी सुचली कल्पना” 

आपल्याकडे जी प्री-प्रोडक्शन ला काम करणारी मंडळी आहेत ती घरी बसून नक्कीच काहीतरी वेगळं, कल्पक  काम करत असणार तर या गोष्टीचा विचार करून हे फोटोशूट करण्यात आलंय. आपण सगळेच लॉकडाऊन मध्ये काही न काही करतोय यातूनचं भन्नाट नवीन असं काही करायला मिळावं या विचारातून जी चित्रपटाशी निगडित लोक आहेत त्यांच्या सोबत बोलून त्यांच्या कामाची काही वेगळी बाजू आपल्याला फोटो मधून मांडता येऊ शकते का या विचारातून ही “फोन फोटोग्राफी” ची संकल्पना सुचली. हल्ली फोन फोटोग्राफी ही खूप मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ती खूप मस्त करतात म्हणून आपण सुद्धा असं काहीतरी फोन फोटोग्राफी करूया. “ब्लॅक अँड व्हाईट” फोटो या साठी कारण आपण कोरोनाच्या खूप बातम्या बघतो त्यांचे फोटो बघतो तर सगळीकडे आजूबाजूला खूप रंग आहेत. सोशल मीडिया वर खूप रंगेबेरंगी गोष्टी आपण बघतो तर मी ठरवलं थोड या रंगापासून ब्रेक घेऊन स्वतःची एक वेगळी लाईन शोधू या म्हणून ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढु असं वाटलं. थोडं हलकं फुलक काहीतरी करावं म्हणून मी ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढण्याची संकल्पना आली. माझा आता मेन कॅमेरा बंद आहे म्हणून मी आता फोनच्या कॅमेरा मधून फोटो काढतोय. अनेक वर्षांपासून फोन फोटोग्राफी करण्याची इच्छा होती एक वेगळा प्रयोग या निमित्ताने करायला मिळाला.

“म्हणून लॉकडाऊन मध्ये शूट” 

    लॉकडाऊन दरम्यान फोटोशूट करावं असं वाटलं कारण आता सगळेच घरी आहेत ते त्यांच्या त्यांच्या कामासाठी काहीतरी वेगळा विचार करतात, एक वेगळी विचार करण्याची प्रकिया या लॉक डाऊन दरम्यान होते आहे आता खूप जास्त कलाकार हे त्यांच्या पद्धतीने विडिओ करून सोशल मीडिया वर टाकतात तर या सगळ्या मधून मी एक फोटोग्राफर म्हणून काय करू शकतो हा विचार मनात आला मग ठरवलं की आता सगळेच कलाकार, दिग्दर्शक, लेखक, सिनेमॅटोग्राफर, निर्माते घरी आहेत मग आपण आता त्यांच्या सोबत काहीतरी अनोखं करू शकतो. त्यांचे फोटो काढू शकतो. मी सगळ्यांना याबद्दल सांगितलं आणि सगळ्यांनी या फोटो शूट साठी वेळ दिला आणि ते फोटो शूट मस्त झालं. एक फोटोग्राफर म्हणून मी जेव्हा इंडस्ट्रीत आलो तेव्हा यातल्या प्रत्येकाने मला मदत केली आहे त्यांना थँक्स बोलणं हा खूप छोटा शब्द होता म्हणून आम्ही ही एक अनोखी फोटो सिरीज केली. आपली इंडस्ट्री ही खूप सकारात्मक आहे तर नव्या कलाकारांना या फोटो सिरीज मधून काहीतरी वेगळं बघायला मिळेल म्हणून लॉकडाऊन मध्ये मी हे शूट केलं. 

“कल्पक विचारातून केलेलं शूट” 

       प्रत्येक कलाकार हा फार कल्पक असतो तर त्यांच्या घरी सुद्धा आपल्याला अश्या काही खास गोष्टी बघायला मिळतात. ते एक कलाकार म्हणून त्यांना एक कलेचा वेगळा गंध असतो त्यामुळे मला हे माहीत होतं की प्रत्येक कलाकारांच्या घरी काहीतरी भन्नाट असणार म्हणून या गोष्टी फोटोत छान दिसतील हे या फोटो मधून दाखवता येईल. आपल्या घरी जो एक नॅचरल सूर्यप्रकाश असतो. तर फोटोशूट करताना त्यांच्याकडे असा योग्य सूर्यप्रकाश हवा होता मग त्यांच्या घरातला बँकग्राउंड असेल, किंवा त्यातुन काही वेगळं घडवता येईल का हा विचार करून फोटो काढले. फोन फोटोग्राफी करताना त्यांच्या घरचा बॅकग्राउंड  मधून काय वेगळं घडवता येईल, त्यांच्या घरी लाईट कसा पडतो किंवा तो कसा हँडल करता येईल काही वेगळ्या प्रकारची लाईट असेल तर वेगळे फोटो काढता येतील, मला मूड कॅपचर करायला खूप आवडतात तर वेगवेगळ्या पोज मूड फोटो टिपायला मला आवडतात या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्या. फोन फोटोग्राफी करताना माझ्यासाठी ही एक काहीतरी शिकण्याची प्रक्रिया होती. प्रत्येक माणूस हा त्यांच्या पद्धतीने कसा विचार करतात तर या गोष्टी फोन फोटोग्राफी करताना डोक्यात होत्या. 

“फोन फोटोग्राफी ची अनोखी संकल्पना” 

    खूप वेळेला असं होतं की दिग्दर्शक आणि लेखक यांच्या सोबत मला फोटो शूट करायला नाही जमत तर आता वेळ सुद्धा होता म्हणून मला ही संधी मिळाली. यात फरक असा होता की कॅण्डीड फोटो काढण्याची वेगळी मज्जा, त्यांचे वेगळे मूड्स मला यातून टिपता आले. नेहमी ते शूट आणि सगळ्या गोष्टीत अडकले असतात आता सगळेच घरी आहेत तर त्यांचे काहीतरी वेगळे  कॅण्डीड मूड्स फोटो मला यातून मिळाले. मी अनेक कलाकारांचे शूट करत असतो पण या सगळ्यात लेखक, दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर यांच रोजच्या पेक्षा वेगळं काहीतरी शूट करण्याची ही संधी मला मिळाली. मराठी इंडस्ट्रीतल्या या मंडळीच सिनेकामाच्या प्री प्रोडक्शन च्या अंगाने केलेलं हे शूट होत असं म्हणायला हरकत नाही. फोन फोटोग्राफी ला या सगळ्यांनी छान प्रतिसाद दिला त्यांनी खूप उत्स्फूर्तपणे हे फोटो पोस्ट केले या साठी त्या सगळ्यांचे मनापासून आभार.

     आत्तापर्यंत तेजस ने ४० कलाकारांच फोटो शूट केलंय लवकरच आपल्याला बाकी कलाकारांचे असे कमाल फोटो बघायला मिळणार आहेत. सतीश राजवाडे, संजय जाधव, रवी जाधव, आलोक राजवाडे, जितेंद्र ठाकरे, प्रवीण तरडे, मृणाल कुलकर्णी, मनवा नाईक, विजू माने, वरूण नार्वेकर, क्षितिज पटवर्धन, केदार शिंदे, मेघना जाधव यांच्यासारख्या अनेक कलाकाराचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. तेजस नेरुरकर च्या या अनोख्या “फोन फोटोग्राफी” संकल्पनेला हा कमालीचा प्रतिसाद मिळाला आहे.

तेजस तुझ्या पुढील फोटोग्राफी प्रवासासाठी प्लॅनेट मराठी कडून खूप खूप शुभेच्छा! 

मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: