‘तेजस्विनी’ची नवी निर्मिती

नव्या टॅलेंटला मिळणार संधी

उत्तम अभिनेत्री आणि यशस्वी उद्योजिका अशी ओळख असलेली तेजस्विनी पंडित आता नव्या रुपात आपल्या भेटीला येतेय. आज तिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ‘क्रिएटिव्ह व्हाइब (Creative Viibe)’ या नव्या निर्मिती संस्थेची (प्रोडक्शन हाउस) घोषणा तेजस्विनीने केली आहे. शिवाय, ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ आणि ‘क्रिएटिव्ह वाईब’च्या पहिल्या वेब-शोबद्दलही तिने यानिमित्ताने सांगितलं आहे.

‘क्रिएटिव्ह व्हाइब (Creative Viibe)’

‘मी सिंधुताई सकपाळ’, ‘तू हि रे’, ‘देवा’, ‘येरे येरे पैसा’, गैर यांसारखे चित्रपट, अनेक मालिका आणि वेबसिरीजमधून आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. अभिनयाबरोबरच एक उद्योजिका म्हणूनही ती नावारूपास आली. आता, तेजस्विनी एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहे. नेहमी पडद्यावर झळकणारा हा चेहरा निर्माती म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण करतं आहे. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने हि महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ‘क्रिएटिव्ह व्हाइब(Creative Viibe)’ असं तिच्या निर्मिती संस्थेच नाव असून, विविध वेब-शो, चित्रपट आणि मालिकांची निर्मिती याच्या माध्यमातून करणारं असल्याची माहिती तेजस्विनीने दिली.

तेजस्विनी पंडित

तेजस्विनी पंडित आणि संतोष खेर यांच्या संयुक्त विद्यमाने या निर्मिती संस्थेची सुरुवात होतं आहे. संतोष खेर हे एक उत्तम शैक्षणिक वारसा जपणारे आणि कलेची चांगली जाण व दृष्टी असणारे दुबईस्थित उद्योजक आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या ‘क्रिएटिव्ह वाईब’च्या माध्यमातून नव्या टॅलेंटला संधी देण्याचा या निर्मिती संस्थेचा मानस असल्याचं तेजस्विनी आवर्जून सांगते. नेहमीच्या विषयांपेक्षा चौकटी बाहेरचे आणि आजच्या तरुणाला आवडतील अशा कलाकृती या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारं असल्याचं मत ती यानिमित्ताने व्यक्त करते.

तेजस्विनी पंडित आणि अक्षय बर्दापूरकर

‘प्लॅनेट मराठी’चा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या ‘प्लॅनेट टॅलेंट’ची तेजस्विनीही कलाकार आहे. आता हे नाव निर्माती म्हणूनही ‘प्लॅनेट मराठी’च्या मंचावर झळकणार आहे. तेजस्विनी पंडित आणि ‘क्रिएटिव्ह व्हाइब’ त्यांची पहिलीवहिली निर्मिती असणारा वेब-शो आगामी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारं असल्याची अधिकृत घोषणाही तिने यावेळी केली. विविध माध्यमांमधून झळकणारा हा चेहरा आता निर्माती म्हणून कोणत्या नव्या गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणारं आहे, हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.

हा मंच सगळ्यांसाठी…

‘क्रिएटिव्ह वाईब’ या आमच्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून नव्या चेहऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न असेल. शिवाय, चौकटीबाहेरच्या गोष्टी आणि नवे विषय आमच्या विविध कलाकृतींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा आमचा मूळ उद्देश असेल. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या माध्यमातून आमचा पहिला वेब-शो तुमच्या भेटीला येईल. आगामी काळात मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वातही हि निर्मिती संस्था पाऊल टाकेल.

-तेजस्विनी पंडित (अभिनेत्री आणि निर्माती, क्रिएटिव्ह व्हाइब)

वाढदिवशी अनोखी भेट

आज तेजस्विनीच्या वाढदिवशी आम्ही यानिमित्ताने एक महत्त्वपूर्ण घोषणा करतं आहोत याचा आनंद आहे. आमच्या ‘प्लॅनेट टॅलेंट’चा भाग असलेली तेजस्विनी निर्माती म्हणून जगासमोर येणारं याचा अभिमान आहे. शिवाय, तिचा पहिला शो आमच्या ओटीटीच्या माध्यमातून आपल्या भेटीला येतोय हा दुग्धशर्करा योग म्हणता येईल.
-अक्षय बर्दापूरकर (सीएमडी, प्लॅनेट मराठी ओटीटी)

आनंदाचा
क्षण…

बऱ्याच वर्षांपासून मला कलाक्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा होती प्रामुख्याने निर्मिती संस्था काढायचा विचार होता. तेजस्विनीबरोबर मैत्री झाली आणि मी तिला पार्टनरशिपची विचारणा केली. तिचा होकार येताच, ‘क्रिएटिव्ह  व्हाइबचा जन्म झाला. आमच्या पहिल्याच प्रोजेक्टसाठी आम्हाला ‘प्लॅनेट मराठी’ची साथ लाभली ह्याचा फार आनंद आहे. ‘क्रिएटिव्ह व्हाइब’च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांचं उत्तमोत्तम मनोरंजन करू अशी आशा आहे.


-संतोष खेर (निर्माता, क्रिएटिव्ह व्हाइब)

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी )

Share your valuable opinion

%d bloggers like this: