The first ever Marathi OTT platform launching soon. Keep your self updated with one click. – प्रश्न तुमचे, उत्तर ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ चे


प्रश्न तुमचे, उत्तर ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ चे

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ या  मराठमोळ्या ओटीटी माध्यमाची घोषणा झाली आणि अल्पावधीच सगळ्यांमध्ये याविषयी चर्चा रंगू लागली. सोशल मीडियावर तर या चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळालं. रसिक मायबाप प्रेक्षक, कलाकार, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ अशा अनेकांनी ‘प्लॅनेट मराठी’च्या आणि ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या सोशल मीडिया पेजवर प्रश्नांची सरबत्ती उडवली. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर आम्हाला काय नवीन पाहायला मिळणार? आमचा सिनेमा ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर दाखवता येईल का? आम्हला निर्मितिसाठी ‘प्लॅनेट मराठी’ मदत करेल का? आम्हाला सिनेमा अथवा लघुपटाची कथा ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’पर्यंत पोहोचवायची असेल तर कोणाला संपर्क करावा? अशा अनेक प्रश्नांना प्लॅनेट मराठी ओटीटीच्या टिमने उत्तरं दिली आहेत.

प्लॅनेट मराठी ओटीटी केव्हा लॉन्च होणार आणि ते कोण-कोणत्या स्वरुपात प्रेक्षकांसाठी उपलब्ध होईल?

–    टेक्नोलॉजी, कंटेंट अशा सगळ्याचा विचार करता ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ या वर्षाअखेरपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. परंतु, प्लॅनेट मराठी ओटीटीचा महत्त्वपूर्ण भाग असलेले ‘डिजिटल थिएटर’ सप्टेंबरच्या अखेरपर्यंत प्रेक्षकांसाठी खुलं करण्यात येईल. डिजिटल थिएटर म्हणजे, एखादा चित्रपट जसा शुक्रवारी प्रदर्शित झाल्यावर तो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात, अगदी तसंच डिजिटल थिएटरवर चित्रपट प्रदर्शित केले जातील. त्यामुळे चित्रपटाचा फर्स्ट-डे-फर्स्ट-शो तुम्हाला घरबसल्या तुमच्या कुटुंबासोबत पाहता येणार आहे. ‘पे-पर-व्ह्यू’ तत्वावर हे थिएटर चालणार असून,  विशेष म्हणजे एकदा तिकीट काढल्यावर एका ठराविक वेळेपर्यंत तुम्हाला या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला संपूर्ण कुटुंबाचं तिकीट काढण्याचीही आवश्यकता भासणार नाही. एका तिकिटावर संपूर्ण कुटुंब आपल्या आवडत्या चित्रपटाचा आनंद लुटू शकणार आहेत. तूर्तास, या डिजिटल थिएटरवर चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला एका लिंक वरून जाऊन ऑनलाईन तिकीट काढून चित्रपट पाहता येणार आहे. प्लॅनेट मराठी ओटीटीची सुरुवात झाल्यानंतर मात्र आयओएस आणि ॲनड्रॉइड ॲपच्या स्वरुपात डिजिटल थिएटर आणि ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वरील इतर अनेक कार्यक्रमांचा तुम्हाला आनंद एका क्लिकवर घेता येणार आहे.

आमच्याकडील कंटेंट जर, प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित करण्याची आमची इच्छा असेल तर त्या संदर्भात कोणाला संपर्क साधता येईल? याची प्रक्रिया काय असेल?

–    प्लॅनेट मराठी ओटीटीवर काय कंटेंट असावा आणि तो लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल याचे निर्णय प्लॅनेट मराठी ओटीटीचे सीईओ अभिनेते दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री घेतील. तुमचा कंटेंट (व्हीडीओ, पीपीटी, मजकूर) स्वरुपात तुम्ही content@planetmarathi.com वर पाठवता येईल. तुमचा ईमेल आमच्यापर्यंत पोहचल्यानंतर पंधरा दिवस किंवा एक महिन्यात तुम्हाला त्यावर उत्तर पाठवलं जाईल. या कालावधीत तुम्हाला उत्तर आलं नाही तर हताश होण्याची गरज नाही. कारण, कदाचित प्लॅनेट मराठी ओटीटीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (म्हणजेच मार्च-मे २०२१) तुमच्या कंटेंटचा विचार केला जाईल. परंतु, प्रत्येक मेलला आणि त्यालील कंटेंटला योग्य न्याय देण्याचं काम प्लॅनेट मराठी ओटीटी नक्की करेल, अशी खात्री अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी व्यक्त केली आहे.

प्लॅनेट मराठी ओटीटी चित्रपट अथवा लघुपटाच्या निर्मितीसाठी मदत करेल का?

–    नक्कीच! ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’अंतर्गत प्लॅनेट मराठी ओरीजनलची सुरुवात लवकरच होईल. प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमातून नवीन कंटेंटची निर्मित करणं, हा या मागील मूळ उद्देश. एखाद्या चित्रपटाची अथवा वेबसिरीजची कथा आवडल्यास त्या चित्रपटांना अथवा वेबसिरीजना प्लॅनेट मराठी ओटीटी निर्मितीसाठी मदत करेल. अर्थात हा निर्णय संपूर्णतः टीमवर अवलंबून आहे.

प्लॅनेट मराठी ओटीटीवर कोणत्या प्रकारच्या कंटेंटला प्राधान्य दिलं जाईल?

–    सध्या उपलब्ध ओटीटी माध्यमांपेक्षा आमची निवड प्रक्रिया आणि कंटेंट ठरवण्याची पद्धत जरा वेगळी असणार आहे. संपूर्णतः मराठी भाषेत आणि प्रेक्षकांना रुचेल अशा कंटेंटवर अधिक भर दिला जाईल. कथेची गरज ओळखून त्या दृष्टीने केलं गेलेलं चित्रीकरण किंवा संकल्पनांचा योग्य वापर याकडे अधिक लक्ष दिलं जाईल. शिवाय, तुमच्याकडे उपलब्ध कंटेंट आमच्याकडे पाठवायचा असल्यास आणि त्याची निवड झाल्यास, आवश्यक त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणं बंधनकारक आहे. शिवाय मराठी वेबसिरीजवर अधिकाधिक भर दिला जाणार आहे.

प्लॅनेट मराठी ओटीटीच्या कोणत्याही चित्रपट, वेबसिरीज, इतर शो मध्ये काम करण्याची इच्छा असल्यास आम्हाला तशी संधी मिळेल का?

–    कोणत्याही नव्या चित्रपट, लघुपट अथवा वेबसिरीजचं चित्रीकरण सुरु होणार असल्यास त्या साठी आवश्यक पात्रांची कास्टिंगसंदर्भातील पोस्ट तुम्हाला आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि प्लॅनेट मराठी ओटीटी ची वेबसाईट यांवर उपलब्ध केली जाईल. सोबत आवश्यक त्या नियम आणि अटी दिल्या जातील. तुम्ही त्यातील कोणत्या पात्रासाठी योग्य आहात याचा विचार करून आमची टीम तुमच्यापर्यंत पोहचेल. शिवाय, आमच्या टीममध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी येत्या काळात अनेक संधी असतील. त्याबरोबर ‘प्लॅनेट मराठी’चा महत्त्वपूर्ण भाग असणाऱ्या ‘प्लॅनेट टॅलेंट’च्या माध्यमातून कलाकार मंडळींही आमच्याशी जोडले जाऊ शकतात. येत्या काळातील विविध प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याची संधीही यानिमित्ताने मिळणार आहे.

https://www.facebook.com/PlanetTalentManagement/

प्लॅनेट मराठी ओटीटीवर मराठीसह इतर भाषेतील कंटेंट पाहायला मिळेल का?

–    कंटेंट इतर भाषांमधला असला तरी तो मराठी भाषेत डब स्वरुपात प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येईल. ‘म मानाचा, म मराठीचा’ म्हणत सुरु केलेल्या या पहिल्यावहिल्या मराठी ओटीटीमाध्यमावर मराठीपण जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल.  

प्लॅनेट मराठी ओटीटी आणि प्लॅनेट मराठीचं अधिकृत ॲप लवकरचं आपल्या मोबाईल फोनवरील ॲप-स्टोअरवर उपलब्ध होईल. तोवर प्लॅनेट मराठी ओटीटी बद्दल अधिक माहितीसाठी आणि याबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटवर आपली आवश्यक ती महिती भरून ‘Keep me Notify’ वर क्लिक करायला विसरू नका. आता मिळवा सगळे अपडेट्स केवळ एका क्लिक वर…

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ संदर्भातील अधिक माहितीसाठी www.planetmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.

टीम ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’

अक्षय बर्दापूरकर (सीएमडी, प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेस प्रा. लि.)

पुष्कर श्रोत्री (सीईओ, प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेस प्रा. लि.)

आदित्य ओक (सीओओ, प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेस प्रा. लि.)

अमोद ओक (सीटीओ, प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेस प्रा. लि.)

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ संदर्भातील तुमचे प्रश्न, शंका खाली कमेंट बॉक्समध्ये मांडा. आम्ही त्याचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करू.

इतर प्रसार माध्यमांनी सुद्धा ह्या उपक्रमाला भरभरून दाद दिली.. त्यातल्याच काही निवडक बातम्या

अधिक माहितीसाठी आम्हाला सोशल मीडिया माध्यमांवर नक्की फॉलो करा.

फेसबुक

https://www.facebook.com/planetmarathi/

इंस्टाग्राम

https://www.instagram.com/planet.marathi/

ट्विटर

https://twitter.com/PlanetMOTT

Linkedin

https://in.linkedin.com/in/planet-marathi-2b8102165

वेबसाईट

http://www.planetmarathimagazine.com

http://www.planetmarathi.org

http://www.planettalent.org

5 thoughts on “The first ever Marathi OTT platform launching soon. Keep your self updated with one click. – प्रश्न तुमचे, उत्तर ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ चे

Share your valuable opinion

%d bloggers like this: